'खोका' वदून गेल्या, आता नडेन म्हणतो

llपुण्याचे पेशवेll's picture
llपुण्याचे पेशवेll in जे न देखे रवी...
20 Oct 2009 - 12:29 pm

दिवाळी नंतर आलेल्या विडंबनाच्या बहरात आमचेही एक कण्हेरीचे फूल. प्रेरणा: रंगाकाकांनी पाडलेले हे विडंबन . बाकी मात्रा-बित्रा नियमाप्रमाणे आधीच फाट्यावर मारल्याने त्यात सदर काव्य बसणार नाही याची काळजी घेतलेली आहे.

'खोका' वदून गेल्या, आता नडेन म्हणतो
काढून आयड्यांना खंदा लढेन म्हणतो

गुद्दा अवांतरातला हा मी सोसणार नाही
जे जे दिलेस ठोसे सारे फेडेन म्हणतो

सारेच कंपू माझे ना उतरले स्थळी या
बसलेत खनपटीला ते वापरेन म्हणतो

माझ्याघरी कसा मी ढोसत आज बसलो!
काव्य बुधवाराचे आता लिहेन म्हणतो

कंपूच सारे फुटले, ना दोष आयड्यांचा
कंपू असा स्वतःचा आता करेन म्हणतो

ती आमिषे 'पदा'ची असती सदाच खोटी
बिरुदे आता तशीही लावीन स्वतःच म्हणतो

माझ्याच लेखनाची सारी टवाळी आहे
तोही लाथ पेशव्या तुला घालीन म्हणतो

शांतरसविडंबन

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

20 Oct 2009 - 12:32 pm | प्रमोद देव

आज आमचं काय खरं नाही...असेच म्हणतो! :)

चेतन's picture

20 Oct 2009 - 12:32 pm | चेतन

काय पेशवे आज मंगळवारीचं.....

ते ट च्या ठिकाणी द चुकुन तर नाही झाल. ;)

चेतन

चेतन's picture

20 Oct 2009 - 12:34 pm | चेतन

काय पेशवे आज मंगळवारीचं.....

ते ट च्या ठिकाणी द चुकुन तर नाही झाल. ;)

चेतन

अवांतर: तुम्हाला हे ही घाणेरीचं फुल अर्पण

सहज's picture

20 Oct 2009 - 12:34 pm | सहज

ऐ शाबाश!

अवलिया's picture

20 Oct 2009 - 12:36 pm | अवलिया

लगे रहो. :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

नंदन's picture

20 Oct 2009 - 12:41 pm | नंदन

पिडांकाका, रंगाकाका आणि आता पुपेकाका - आपलं पुपे -- दिवाळी दिवाळी आऽऽऽऽऽऽली असं पुन्हा म्हणावसं वाटावं असं फर्मास लेखन! नाना आणि मिभोकाका - तुम्हीही उतरा की मैदानात.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मदनबाण's picture

20 Oct 2009 - 12:51 pm | मदनबाण

व्वा... पेशवे...बुधवारच्या आधीच जोश वाढलेला दिसतो... ;)

मदनबाण.....

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

निखिल देशपांडे's picture

20 Oct 2009 - 12:59 pm | निखिल देशपांडे

लै भारी रे पुप्या....

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

श्रावण मोडक's picture

20 Oct 2009 - 2:19 pm | श्रावण मोडक

नड बापू नड, तुला नडलंच पाहिजे!

टारझन's picture

20 Oct 2009 - 3:46 pm | टारझन

ती आमिषे 'पदा'ची असती सदाच खोटी
बिरुदे आता तशीही स्वतःच लावीन म्हणतो

=)) =)) =))

-

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Oct 2009 - 4:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुपेफुफा आहेत. :)
लगे रहो.

प्रभो's picture

20 Oct 2009 - 4:59 pm | प्रभो

पुप्या, हाण तिच्यायला

जबरा रे...

--प्रभो

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Oct 2009 - 5:10 pm | llपुण्याचे पेशवेll

सर्व रसिक प्रतिसादकर्त्यांचे आणी नाकर्त्यांचेही आभार आभार आणि आभार....
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984