त्यांनी आयुष्यभर गांधीवाद जोपासला....
....असं ते म्हणतात.
त्यांना 'गांधीगिरी' भावली नाही.
आम्ही म्ह्टल, " तुमचा विरोध नक्की कशाला ? "
तुम्ही उभं आयुष्य 'गांधीं'च्या मागे
'वाद' लावून जगलात.
पण वादाने प्रश्न सुटत नाहीत......
..
...
आम्ही त्यांच्या मागे 'गिरी' उभा करतोय.
आधी लोकांना हिमालयाची भव्यता दिसू दे...
मग गंगेचे फायदे हळू हळु कळतीलच...............