[ एका कोलेज च्या एका मोठ्या क्रीडांगणाचा एक कोपरा.त्या ground चं कुंपण, भिंत, गेट आणि त्यामागचा रस्ता...प्रेक्षकांसमोर एक दोन बेंच आणि त्यासमोरून गेलेला जोगिंग ट्रॆक...ground ला चालत चक्कर मारणार्या स्त्रिया, मध्यमवयीन माणसे आणि काही खेळाडू अधून मधून दिसावेत...groundवर क्रिकेट सामना चालू आहे.पडदा उघडतो तेव्हा मनीष आणि माधवी स्टेजवर दिसतात....]
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>माधवी - मनीष्चे लग्न ठरले आहे, आणि मनीषने अधिक चांगल्या पगाराची नोकरी धरली पाहिजे असा सतत आग्रह माधवी करत आहे,.माधवी सतत मनीष्ची तुलना सुमेधशी करत आहे, (सुमेध - सानिका ही कॊलेजातील फ़ेमस जोडी आणि तो कसा श्रीमंत, हॆंड्सम, सर्वगुणसंपन्न आहे वगैरे)त्यामुळे मनीष वैतागून गेला आहे...
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
प्रतिक्रिया
3 Mar 2008 - 1:20 am | भडकमकर मास्तर
ते असो, हे लेखन सुचायचे कारण म्हणजे ९२ किंवा ९३ साली पुण्यातील एका प्रसिद्ध कॉलेजातील कॅम्पस मध्ये भर दिवसा एका विद्यार्थ्याने आपल्या मैत्रिणीला पिस्तुलातून गोळी चालवून ठार केले होते...आता डीटेल्स आठवत नाहीत पण त्या काळात घटना फारच धक्कादायक वाटली होती हे ही खरे....... मग समजा त्याच जोडीला आदर्श जोडी मानणार्या एका दुसर्या जोडीवर याचा कसा कसा परिणाम होईल, हा विचार करता करता वरील दीर्घांक सुचला आहे...
30 Dec 2008 - 1:19 pm | धम्मकलाडू
तन्वी (की जान्हवी?) तुपे या मैत्रिणीला ज्याने गोळी घालून आत्महत्या केली तो प्रसन्न पंडित. ही आमदार विठ्ठल तुपे यांची मुलगी. प्रसन्न पंडितच्या कुटुंबाची कहाणी एकंदरच दुर्दैवी... पुन्हा कधीतरी...
.
दीर्घांकाला शुभेच्छा.
() धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
3 Mar 2008 - 1:51 am | धनंजय
संवादाची शैली आवडली.
पण प्रतिसाद काय द्यायचा त्याबद्दल थोडा किंकार्यविमूढ आहे.
साहित्यिक प्रतिसाद हा की नक्कीच आवडले. संवाद अत्यंत पटण्यासारखे उतरले आहेत.या पात्रांच्याविषयी कुतुहल जागे झाले आहे.
पण एका विशिष्ट जोडप्यातील खटका चित्रित करणे हा तुमचा नाट्यप्रवेशामागचा हेतू नाही, हे स्पष्ट दिसत आहे. उलट तुम्हाला "महत्त्वाकांक्षा विरुद्ध अल्पसंतोष" या मोठ्या मुद्द्याला हात घालायचा आहे. आणि मला वाटते की तुम्ही "तो 'अल्प' नसून खराखरचा संतोष आहे", आणि "महत्त्वाकांक्षा ही घातक आहे" अशा दोन निष्कर्षांप्रत पोचता. हे या विशिष्ट पात्रांच्याबाबतीत खरे असू शकेल असे वाटते, यात तुमचे साहित्यिक कौशल्य आहे. पण माझ्या मते या पात्रांच्या पलिकडे तुम्ही मला हे निष्कर्ष पटवू शकले नाहीत. माधवी ही एक सौम्य लेडी मॅक्बेथ आहे, तिच्यामध्ये खूप स्त्रियांचे सामान्यीकरण थोडेफार जमते [मला पटत नाही तरी]. मनीष मॅक्बेथसारखा इरेला पेटतो, की नाही, ते आपल्याला या प्रवेशात कळत नाही, तो अजून निराशेतच बोलतो आहे. सुमेध हा केवळ एक माथेफिरू युवक असू शकतो - त्याचे कुठलेच सामान्यीकरण करता येत नाही. त्याची व्यक्तिरेखा मनीष-माधवींच्या बोलण्यात हवी तेवढी खुललेली नाही. माधवीला "पॉझिटिव्ह" वाटणारा, "धट्टीकट्टी श्रीमंती"चा उदाहरण वाटणारा सुमेध हा माथेफिरू का - याचा तार्किक संबंध लागत नाही. माधवीला व्यक्तिपरीक्षा नीट करता येत नसेल, तर सुमेधचा खरा परिचय करून देणारे एखादे पात्र या नाट्यप्रवेशात यायला हवे होते.
असो. मला खुद्द अल्पसंतोष/अतिमहत्त्वाकांक्षा अशी टोकाची वर्गीकरणे खर्या आयुष्यात पसंत नाहीत, पण नाटकात जरूर चालवून घेईन. पण ती वर्गीकरणे तुम्ही अधिक पटवायला पाहिजेत.
3 Mar 2008 - 2:30 am | भडकमकर मास्तर
उलट तुम्हाला "महत्त्वाकांक्षा विरुद्ध अल्पसंतोष" या मोठ्या मुद्द्याला हात घालायचा आहे. आणि मला वाटते की तुम्ही "तो 'अल्प' नसून खराखरचा संतोष आहे", आणि "महत्त्वाकांक्षा ही घातक आहे" अशा दोन निष्कर्षांप्रत पोचता.
अचूक्...परफेक्ट........इतक्या मोजक्या शब्दांत मलासुद्धा हे सांगता आलं नसतं.
पण माझ्या मते या पात्रांच्या पलिकडे तुम्ही मला हे निष्कर्ष पटवू शकले नाहीत.
मान्य....पण या पात्रांपुरते तरी असे निष्कर्ष जाणवले , हे ही खूपच झाले.. :)
माधवीला "पॉझिटिव्ह" वाटणारा, "धट्टीकट्टी श्रीमंती"चा उदाहरण वाटणारा सुमेध हा माथेफिरू का - याचा तार्किक संबंध लागत नाही. माधवीला व्यक्तिपरीक्षा नीट करता येत नसेल, तर सुमेधचा खरा परिचय करून देणारे एखादे पात्र या नाट्यप्रवेशात यायला हवे होते.
आक्षेप मान्य, त्यावरील सोल्यूशनही विचार करायला लावणारे.... ( तो अति पझेसिव आहे, आणि कदाचित संशय घेऊन माथेफिरूपणे तो तिला मारतो, अशी गोष्ट डोक्यात ठेवून लिहिले...( आठवणीतील मूळ घटना वर लिहिलीच आहे)पण एकदा मारण्याच्या कारणांचे डीटेल्स द्यायला लागलो की मुख्य गोष्ट त्याच्याशी संबंधित नाही , त्याचा फापटपसारा वाढायचा धोका संभवतो, असे वाटले होते)
असो. मला खुद्द अल्पसंतोष/अतिमहत्त्वाकांक्षा अशी टोकाची वर्गीकरणे खर्या आयुष्यात पसंत नाहीत, पण नाटकात जरूर चालवून घेईन. पण ती वर्गीकरणे तुम्ही अधिक पटवायला पाहिजेत.
मलाही टोकाची वर्गीकरणे आवडत नाहीत.... सगळ्या बायका अश्या असतात किंवा सगळे पुरुष असेच असतात , असली.... कथेमध्ये तेवढी पात्रे त्या त्या स्वभावाची आहेत असे समजावे झाले...आणि वरील पात्रे शेवटी का होईना आपापल्या चुका समजून घ्यायच्या प्रयत्नांत आहेत, निदान असा एखादा प्रसंग त्यांना स्वतःला आणि जोडीदाराला समजून घ्यायला मदत करतो, इतकेच अपेक्षित....
3 Mar 2008 - 10:23 am | मनिष
मला फारच आवडले हे...फक्त सुमेधकडून हत्या हे खूपच "far fetched" वाटले. तो प्रसंग मलाही माहित आहे, पण त्याचा इथे संबंध नाही (नसावा) असे वाटते. सुमेधच्या महत्वा़कांक्षी स्वभावाला फुट्णारे काटे वेगळ्या पद्ध्तीने दाखवता येतील का ते बघ (अरे-तुरे चालेल ना? मला राव, पंत, अहो जाहो चा वीट आला आहे).
4 Mar 2008 - 12:03 am | भडकमकर मास्तर
अरे-तुरे चालेल ना?
अरे तुरे अगदी लई वेळा चालेल....तेच बेष्ट..
सुमेधकडून हत्या हे खूपच "far fetched" वाटले
आता मलाही तसंच का वाटायला लागलंय ?? बर्याच जणांनी अशी प्रतिक्रिया दिली, त्यांना मी माझ्या कॉलेज-काळात घडलेला तो प्रसंग सांगतो आणि हे शक्य आहे की नाही ते विचारतो....ते म्हणतात, शक्य आहे पण त्याची गरज नाहीये ना या गोष्टीला.... :)
सुमेधच्या महत्वा़कांक्षी स्वभावाला फुट्णारे काटे वेगळ्या पद्ध्तीने दाखवता येतील का ते बघ
हो, शक्य आहे,...पण ते सांगताना फोकस हलायला नको म्हणून मी त्याबद्दल बोललोच नाही....असो...यदाकदाचित ही गोष्ट दोन अंकी करायचे ठरले तर हा अँगल चांगला वाटेल......धन्यवाद...
4 Mar 2008 - 2:21 am | अभिज्ञ
हि घटना ९३-९४ मधे फर्गसन महाविद्यालयात घडल्याचे स्मरणात आहे.
ले़खकाने ह्या घटनेच्या पार्श्वभुमिवर केलेलि नाट्यनिर्मिती एक वेगळाच अनुभव देउन जाते.
वातावरण निर्मिती उत्क्रुष्टा जमवलि आहे.
दोन्हि पात्रा॑मधले स॑वाद अप्रतिम लिहिले आहेत.
काहि जणाना नाटकाच्या शेवटी आलेले अनपेक्षित वळण थोडेसे अवघड वाटत असेल,परन्तु
नाट़काचा हा एक छोटासा भाग असल्याने त्यावर एकदम भाष्य करणे योग्य होणार नाही.
आणि जर नाटकाच्या परिभाषेत बोलायचे झाले तर ह्यात वावगे असे काहि वाटत नाहि.
भडकमकर साहेब,आगे बढो.अशाच उत्तम उत्तम कलाक्रुति येउ द्यात.
आमच्या सारख्या मराठि मातिपासून दूर राहणार्याना हे "नाट्य वाचन" एक सुखद अनुभव देउन जाते.
आणी गूळाने मुन्गळाचि वाट कशाला बघायचि?
(एक मराठि नाट्यवेडा) अबब.
4 Mar 2008 - 11:54 am | आंबोळी
अबब अत्यन्त मोलाच सल्ला दिलात सतलजला ! आसो.
" हट्टिकट्टि गरीबी आनि लुळीपान्गळी श्रिमन्ति " हाच मुद्दा माझ्या द्रुश्तिने अधोरेखित होतो आहे. ( माझ्या अल्प्बुध्धिचा दोश) . पन वर उल्लेखिल्याप्रमाने शेवटचा टर्न फारच शार्प आसल्यने प्रेसेन्टेशन बाळबोध वाटते. सुमेध - सानिक ही पात्रे म्हणावी तेवधी एस्टब्लिश होत नाहीत. त्यामुळे खून पचायला अवघड जातोय. " अति पझेसिव " पणा खुलवून सुमेधच्या महत्वा़कांक्षी स्वभावाला फुट्णारे काटे वेगळ्या पद्ध्तीने दाखवले आसते तर आजुन मजा आली आसती असे वाटते. असो.
मनिश-माधवी यान्चे सन्वाद छान जमले आहेत. पण त्यान्च्या सन्वादाच प्रवाह शेवटी कुठे जाणार ते लक्शात येते.... एन्ड प्रेडीक्टेबल वाटतो. (कदाचित तुला धक्का द्यायचा नसेल....). पण दोघानची पात्रे छान जमुन आलि आहेत. दीर्घांन्काच्या द्रुश्टिने विचार्करता विषय , पात्रे , सन्वाद चान्गले जमले आहेत.
याचा प्रयोग कधी करणार आहात ते जरूर कळवा.... आम्हि नक्की येउ.
जाता जाता....
सुमेध्-सानिका , मनिष्-माधवी अशी यमकी नावे वाचुन ६०-७० च्या दशकातिल बा-वाचकाची निद्रादेवीच्या राज्यात प्रवेश्याची सोय करणारी पुस्तके आणि त्यातील पात्रे आठवून पुन्हप्रत्ययाच आनन्द मिळाला..... धन्यवाद!
5 Mar 2008 - 12:16 am | भडकमकर मास्तर
जाता जाता....
सुमेध्-सानिका , मनिष्-माधवी अशी यमकी नावे वाचुन ६०-७० च्या दशकातिल बा-वाचकाची निद्रादेवीच्या राज्यात प्रवेश्याची सोय करणारी पुस्तके आणि त्यातील पात्रे आठवून पुन्हप्रत्ययाच आनन्द मिळाला..... धन्यवाद!
हाहाहाहा...हे पटले.... आमची पात्रांची नावे ठरवण्यात लई टाईम जातो....
आणि टाईम घेऊनसुद्धा आम्ही हे असे करतो...
...सगळे वेळेत जुळून आले तर पुढल्या महिन्यात पुण्यात सुदर्शन ला प्रयोग होईल....
30 Dec 2008 - 1:37 am | भडकमकर मास्तर
प्रयोग दीर्घांक स्पर्धेमध्ये सुदर्शन रंगमंच ... दिनांक ३ जानेवारी २००८ ,दुपारी १२ वाजता....
स्पर्धेसाठीचा हा प्रयोग विनामूल्य आहे...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
30 Dec 2008 - 2:39 am | llपुण्याचे पेशवेll
३ जानेवरी २००८ का २००९?
पुण्याचे पेशवे
Since 1984