तेज दिपांचे उजळुन आले
दिप मनींचे झणी प्रकाशले..
तेजाळल्या त्या ज्योतींमधुनी
ओज तयांचे ओसंडूनी न्हाले..!!
दिपवाळीच्या आनंदामध्ये
आर्त मनांचे विरुनी गेले..
सुख-दु:खाच्या गंधासह मम
आयुष्य सुखे गंधावून गेले..!!
गाणे मनातले ओठी आले
दिपावलीसह फुलून गेले..
सुमन सुगंधी दिपावलीचे
दिपांसवे जिवनी दरवळले..!!
कानी निनादती तेच तराणे
सदैव एक ते आनंदी गाणे..
आले दिन सौख्याचे आले
सवे घेवुनी समृद्धीचे मेळे..!!
दिपावली शुभचिंतन !
विशाल.
प्रतिक्रिया
16 Oct 2009 - 6:06 pm | अवलिया
छान !
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
17 Oct 2009 - 8:55 am | पक्या
छान कविता. दिवाळीच्या भेटकार्डासाठी अगदी योग्य.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
17 Oct 2009 - 9:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान कविता. दिवाळीच्या भेटकार्डासाठी अगदी योग्य.
-दिलीप बिरुटे
18 Oct 2009 - 1:42 am | अश्विनीका
छान लिहीलयं.
दिवाळीच्या शुभेच्च्छा
- अश्विनी
18 Oct 2009 - 11:01 am | विसोबा खेचर
वा! सुंदर काव्य!
तात्या.
18 Oct 2009 - 11:41 am | विशाल कुलकर्णी
धन्यवाद ! सर्व मिसळपाववासीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"