भिंगोरी..

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
14 Oct 2009 - 10:58 pm

क्षणांत खाली क्षणांत वरती
श्वास झुलतो झुल्यावरी
आभासांच्या मागे भिरभिर
मन झाले गं भिंगोरी..

खळबळ मनांत धडधड उरांत
चाहूल ही हृदयांतरी
कधी आकाशी कधी जळाशी
पाऊल माझे अधांतरी

कशी आवरू कशी सावरू
साद घालते कुणीतरी
क्षणांत येथे क्षणांत तेथे
चित्त नसे थार्‍यावरी

किती करावे नवे बहाणे
नशा चढावी मनावरी
उगा रूसावे उगा हसावे
राग लटका कधीतरी

ओढ लागुनी स्पंद रूजावे
माझ्या उरीचे तुझ्या उरी
सोन स्वरांनी गीत सजावे
प्रित फ़ुलावी जन्मांतरी

- प्राजु

शांतरसकविता

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

14 Oct 2009 - 11:15 pm | श्रावण मोडक

प्रीत फुलत जाताना... वा!

मीनल's picture

15 Oct 2009 - 3:48 am | मीनल

मस्त आहे.
मीनल.

अवलिया's picture

15 Oct 2009 - 6:53 am | अवलिया

मस्त आहे .... :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विसोबा खेचर's picture

15 Oct 2009 - 7:57 am | विसोबा खेचर

वा वा!

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Oct 2009 - 8:10 am | llपुण्याचे पेशवेll

छान छान. मस्त आहे कविता.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984

मदनबाण's picture

15 Oct 2009 - 8:20 am | मदनबाण

मस्त... :)

मदनबाण.....

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो|

प्रशांत उदय मनोहर's picture

15 Oct 2009 - 8:20 am | प्रशांत उदय मनोहर

मस्त.
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

सहज's picture

15 Oct 2009 - 8:27 am | सहज

शांता शेळके यांच्या "काय बाई सांगू" गाण्याची आठवण झाली.

प्राजुतै चाल लावून ह्या गाण्याची फीत डकव.

प्रशांत उदय मनोहर's picture

16 Oct 2009 - 10:15 am | प्रशांत उदय मनोहर

प्राजुतै चाल लावून ह्या गाण्याची फीत डकव.

अहो सहजराव/सहजदादा/सहजकाका/सहजअजोबा,
ते डिपार्टमेंट प्राजुतैकडे नै कै! देवकाकांकडे आहे. ;) त्यांना सांगा चाल लावून इथे फीत डकवायला. :)

आपला,
(सुरेख बोलीचा आणि चालीचा) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

श्रीकृष्ण सामंत's picture

15 Oct 2009 - 8:56 am | श्रीकृष्ण सामंत

कविता आवडली.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्राजु's picture

15 Oct 2009 - 7:29 pm | प्राजु

सर्वांचे मनापासून आभार.. :)
- प्राजक्ता पटवर्धन
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

15 Oct 2009 - 11:38 pm | धनंजय

पहिले कडवे तर अगदी लक्षात राहील असे.

मनीषा's picture

16 Oct 2009 - 5:52 am | मनीषा

आभासांच्या मागे भिरभिर
मन झाले गं भिंगोरी.. छान !

बेसनलाडू's picture

16 Oct 2009 - 5:58 am | बेसनलाडू

छान अल्लड कविता आहे. आवडली. शेवटचे कडवे विशेष आवडले. माझ्या उरीचे स्पंद तुझ्या उरी रुजणे ही कल्पना भारी! ओढ, तळमळ/अस्वस्थता ओळींमधून जाणवते आहे.
(बागायतदार)बेसनलाडू

चन्द्रशेखर गोखले's picture

17 Oct 2009 - 11:28 pm | चन्द्रशेखर गोखले

खूपच सुंदर !!

फ्रॅक्चर बंड्या's picture

20 Oct 2009 - 6:51 pm | फ्रॅक्चर बंड्या

खुप छान...
शेवटचे कडवे आवडले