सेव्हन हॅबीट्स

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
8 Oct 2009 - 9:46 am

पुस्तके वाचताना काही पुस्तके नुसतीच चाळायची असतात थोड्या वेळातच विसरून जायची असतात तर काही दीर्घ काळ डोक्यात घर करून बसतात .

इंग्रजी भाषेने अशा पुस्तकांच्या खजिन्याची किल्ली एकदा मला मिळवून दिली. कोणीतरी सांगितले आणि सहज म्हणून हाती लागले म्हणूनही मला एक रत्नाचा परिचय झाला.स्टीफन कोव्हे या लेखकाचा. स्वारी त्यांच्या मॅनेजमेन्ट थॉट्स मुळे परिचित आहे पण त्यातही सरताज म्हणता येईल अशा " सेव्हन हॅबीट्स ऑफ हायली इफेक्टीव्ह पीपल " या पुस्तकाचा.

मॅनेजमेंट शिकताना मानव या घटकाचा विशेष अभ्यास करायचा असतो. पण आपली मॅनेजमेंट शिकायची सुरुवातच होते ती ऍडम्स स्मिथ च्या टाईम ऍन्ड मोशन वर अधारीत उत्पादन प्रमेयाशी. कारखान्यात काम करणार्‍या कामगाराचा मानव म्हणून विचार करण्याऐवजी एक मशीन म्हणून विचार करायचा. त्याला भावना अहेत नाहीत याच्याशी कर्तव्य नाही.

लीडरशीप बद्दल तर काही विचारु नका. लीडरशीप म्हणजे लोकांवर वर्चस्व गाजवायचे हेच आडूनआडून डोक्यात भरवलेले असते

सेव्हन हॅबीट्स्.. हे पुस्तक बराच वेगळा विचार करते . पुस्तक वाचताना लेखकाच्या विचारांशी होतो त्यापेक्षाही स्वतःचाच नव्याने परिचय होतो.

पुस्तकाची सुरुवात करतानाच एक जुने उदाहरण नव्याने पुढे येते. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी.........

प्रॉडक्षन आणि प्रॉडक्षन कपॅबीलिटी एह दोन शब्द वारंवार येतात. पी ऍन्ड पीसी

प्रथम त्याबद्दल पाहु. सोन्याचे अंडे हे प्रॉडक्षन मानले तरे ते अंडे देणारी कोंबडी ही प्रॉडक्षन कपॅबिलीटी असते.

उत्पादन आणि उत्पादन करणारे यंत्र. प्रश्न हा येतो की नक्की लक्ष कशावर द्यायचे. कोंबडीवर की सोन्याच्या अंड्यावर?

कोंबडीवर लक्ष दिले तिला उत्तम खाऊपिऊ घातले आणि तिने अंडे दिले नाही तर ते व्यर्थ आहे. आणि कोंबडीकडून सतत नुसत्याच अंड्याची अपेक्षा केली आणि तिला खाऊ पिउ घातले नाही विश्रांती दिली नाही तर कोंबडी मरून जाईल.

एखाद्या लेथ मशीनवर केले जाणारे काम हे उत्पादन मानले तर लेथ मशीन हे प्रॉडक्षन कॅपॅबिलीटी आहे. नुसते मशीन चालवत राहिलो तर ते केंव्हातरी मोडून जाईल. मशीनला अधूनमधून विश्रांती दिली पाहिजे त्याची निगा राखली पाहिजे तर त्याची क्षमता टिकून राहील.

आपल्या शरीराचेही तसेच आहे. नुसते काम केले तर आजारी पडू आपले शरीर( प्रॉडक्षन कॅपॅबिलीटी) हरवून बसु. आहाराबरोबरच व्यायाम्/ विश्रांती ( शारीरीक + बौद्धीक ) शरीराला मिळायला हवी.

अशी सुरुवात झाल्यानंतर लेख पुस्तकाचा आढावा घेतो. त्याला तो इनसाईड आउट म्हणतो.

एखादी गोष्ट आपल्याला जशी दिसते ती इतराना तशी दिसेलच असे नाही. एखादा प्रश्न आपल्याला जसा भासतो तो इतराना तसाच भासेल असे नाही. इतरांची मते वेगळी असू शकतात. ती आपल्या मतांइतकीच बरोबर असू शकतात्.यासाठी तो एक चित्र दाखवतो. एकाच चित्रात दडलेले दोन वेगळे चेहेरे पाहिल्यावर हे मत सहज पटते.

या नन्तर लेखक सर्वोत्तम प्रभावी व्यक्तींच्या सात सवयींकडे वळतो.या सात सवयी बद्दल त्याने जगातील अनेक व्यक्तींच्या अभ्यासानन्तर लिहिले आहे.

बरेच लोक एका ठराविक मार्गाने जात असतात. कधीकाळी त्याना त्यांची चूक कळते. ते आपला मार्ग बदलतात.

स्टीफन कोव्हे एक मस्त उदाहरण देतो.

एका अंधार्‍या रात्री एक जहाज समुद्रात सफर करत असते. अंधारात नीट दिसत नसते जहाजाच्या कप्तानाला दूरवर एक दिवा दिसतो. बहुतेक दुसरे जहाज असावे. कप्तान रेडीओवर संदेश पाठवतो. आपन एकाच मार्गावर आहोत. धदक होईल तुम्ही मार्ग बदला.

दुसर्‍या बाजूने उलट उत्तर येते तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण तुम्हीच दिशा बदला. कप्तान चिडून पुन्हा संदेश पाठवतो. आम्ही लढाऊ जहाक आहोत. तुम्ही मुकाट्याने मार्ग बदला. उलट बाजूने उत्तर येते " आम्ही दीपस्तंभ ( दीपगृह)आहोत"

कप्तानाने मार्ग बदलला.

उत्तम सवयी या दीपस्तंभासारख्या असतात. त्या तुम्हाला अंधारात/धुक्यातही मार्ग दाखवतात. दीपस्तंभाशी टक्कर घेण्यात काहीच फायदा नसतो. दीपस्तंभाच्या खडकावर आदळून आपलेच तारु फुटते.

या सात सवयी......खरेतर त्या तशा एकमेकांपासून वेगळ्या करता येणार नाहीत.

पहिल्या तीन सवयी आहेत सेल्फ व्हिक्टरी म्हणजे स्वतः वर विजयमिळवण्यासाठी

दुसर्‍या तीन आहेत त्या सोशल व्हिक्टरी म्हणजे सामाज जिंकण्यासाठी

सातवी सवय वेगळीच आहे. ती या सहा सवयीनी मिळून बनलेली आहे.

पहिली सवय आहे. प्रोऍक्टीव्हीटी......मराठीत याला तेव्हढा योग्य शब्द मिळाला नाही. पण इनिशिएटीव्ह म्हणजे पुढाकार या पेक्षा थोडेसे पुढे जाऊन जी क्रिया येईल तशा प्रकारचा अर्थ अभिप्रेत आहे.

लेखक म्हणतो की एखादी गोष्ट स्वतः होऊन सुरु करणे ही एक सवय आहे.

बरेचदा आपण एखादी गोष्ट करतो ती कोणत्यातरी दुसर्‍या गोष्टीची प्रतिक्रिया म्हणून करत असतो. हे करण्यात ती गोष्ट करण्यात काय करावे यावर आपले कोणतेच नियंत्रण रहात नाही. जणू दुसरेच कोणितरी आपले नियंत्रण करत असते.

एखाद्या गोष्टीचे काय परिणाम होतील याचा अंदाज घेऊन आपण निर्णय घेतो. कधी कधी परिणामांचा विचार करून आपण निर्णय घेण्याचे टाळत असतो. पण निर्णय घेण्याचे टाळबे हा सुद्धा एक निर्णयच आहे हे आप्ल्या लक्ष्यात येत नाही.

कृती आणि परिणाम हे नाण्याच्या दोन बाजू आहेत. एखादी पेन्सील उचलण्याच्या अगोदर ती कोणत्या बाजूच्या टोकाकडून उचलायची हे आपण ठरवू शकतो पण त्या टोकाकडून पेन्सील उचलताना दुसरे टोकही पेन्सीलच्या सोबतच येते. पेन्सीलीचे एक टोक हे जर कृती मानले तर दुसरे टोक म्हणजे त्या कृतीचे परिणाम असते

कृती करताना त्या कृतीचे परिणाम आपण टाळू शकत नाही. कृती न करणे ही सुद्धा एक प्रकारे कृतीच आहे. त्याचे परिणाम टाळू शकत नाही.

बहुतेकदा आपण केलेले कृती ही एखाद्या कृतीची प्रतिक्रिया असते. .पण मग प्रतिक्रीया कशी करायची त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे हा प्रश्न पडतो. स्टेफन कोव्हे यावर म्हणतो की प्रतिक्रीया कधीच स्वतंत्र नसते. ती क्रियेवर अवलंबून असते.क्रिया आणि प्रतिक्रिया यांच्या दरम्यान एक अवसर असतो. त्या वेळेचा वापर करून प्रतिसाद देता येतो. प्रतिक्रीया कशी द्यायची हे आपण ठरवू शकत नाही पण प्रतिसाद कसा द्यायचे हे मात्र आपण ठरवु शकतो.

एखाद्या गोष्टीचा परिणाम आपण आपल्यावर कसा होऊ द्यायचा हे आपण ठरवू शकतो.

शे दोनशे किमी वेगाने येणार्‍या चेंडूला घाबरून विकेट फेकायची ही प्रतिक्रीया झाली चेंडूच्या वेगाचा फायदा घेत त्याला सीमेपार भिरकावून द्यायचे हा झाला प्रतिसाद.

एखाद्या गोष्टीला प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतीसाद देणे जमले तर परीणाम आपल्या ताब्यात राहु शकतील.

पुढाकार घ्या असे सांगताना कोणत्या गोष्टीत पुढाकार घ्यायचा हे कसे ठरवायचे हे सांगताना कोव्हे म्हणतो की ज्या गोष्टींवर तुमचे थेट नियंत्रण राहु शकते त्यावर लक्ष्य केंद्रीत करा.

उदा: दिवसभराच्या चोवीसतासात माझ्या सभोवताली अनेक गोष्टी घडत असतात. त्यापैकी माझा ज्यावर ताबा असेल त्याच गोष्टीवर लक्ष्य केंद्रीत करावे.

टीव्ही वर बातम्या पहाणे , अभ्यास करणे , वर्तमान पत्र वाचणे , राजकारणाची चर्चा करणे. यात अभ्यास करणे या गोष्टीवर माझा कंट्रोल /प्रभाव राहू शकतो कारण टीव्हीवर बातम्या काय येणार आहेत राजकारण कसे चालणार आहे यावर माझा थेट काहीच प्रभाव नसतो

दुसरी सवय : बिगीन विथ द एन्ड इन माईन्ड . शेवट काय करायचा हे डोक्यात ठेऊन सुरवात करा

या सवयी बाबत बोलतान कोव्हे म्हणतो की कोणतेही काम करण्यापूर्वी यातून काय साध्य करायचे आहे ते ठरवूनच मग सुरुवात करा.

जगात कोणतीही गोष्ट दोनदा तयार होत असते. सर्वप्रथम ती मनात आरखडा रूपात बनते मगच ती प्रत्यक्षात येते.

ताजमहाल बनण्यापूर्वी त्याचा आराखडा कोणाच्या तरी मनात उतरला असेल नन्तर तो कागदावर आला असेल मग तो प्रत्यक्षात बनला असेल.

पुढाकार घेऊन कृती करायची ती कशासाठी करायची हे नक्की करायचे. त्यातून काय मिळणार आहे ते ठरवून मग कृती करायची. हे करताना कोणती कृती करायची ते कसे ठरवायचे हे सांगताना कोव्हे म्हणतो की आपल्या रोजच्या व्यवहारात बरीच कामे असतात. त्यात काही तातडीची असतात काही महत्त्वाची असतात. काही तातडीची आणि महत्त्वाची सुद्धा असतात.कोव्हे या कामांची १)तातडीची व मह्त्वाची ,२) कमी तातडीची पण महत्त्वाची, ३)तातडीची पण फारसे महत्त्व नसलेली , ४)कमी तातडीची कमी महत्त्वाची वर्गवारी करतो.

पहिल्या वर्गात बहुतेकदा क्रायसीस प्रकारची कामे असतात. दुसर्‍या गटात मेन्टेनन्स ( फिजीकल / बौद्धीक) येतो.

तिसर्‍या प्रकारा बहुधा सामाजीक कार्यक्रम वगैरे असतात. तर चौथ्या प्रकारात गॉसिपींग चकाट्या या गोष्टी येतात

पैकी दुसर्‍या गटात मोडणार्‍या गोष्टींवर लक्ष्य दिले तर क्रायसीस कमी होतात. आणि काय करायचे ते ठरवता येते.

तिसरी सवय : फर्स्ट थिंग फर्स्ट ......पहिले काम अगोदर करा.

ऐकायला हे वाक्य जरा विचित्रच वाटते पण कोव्हे यात कोणत्या कृतीला अग्रक्रम द्यायचा आणि तो अग्रक्रम कसा ठरवायचा हे सांगतो.

आपण आपल्या जगण्यात कोणती तरी गोष्त केंद्रस्थानी ठेवून आपली धोरणे कृती ठरवत असतो.

हे केंद्रस्थान प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळे असते. ते कुटुंब , सामाजीक संस्था , नोकरी , धर्म ,मुले पत्नी , मित्र अशा अनेक प्रकारचे असु शकते. कित्येकांच्या बाबतीत शत्रु हे केंद्रस्थान असते. त्यांची प्रत्येक कृती शत्रुला केंद्रस्थानी ठेऊनच घडत असते.शत्रु अमूक करतो म्हणून मी असे करतो. असे त्यांच्या बाबतीत होत असते.

( रावण आणि कर्ण ही या प्रकाराची उदहरणे) आपण अपल्या जगण्याचा केंद्रबिंदू ओळखला तर त्या संदर्भातले काम करायला आपल्याला आवडतच असते. साहाजीक त्यात यश मिळण्याचे प्रमाण अधीक असते.
इतर चार सवयींबद्दल पुन्हा कधितरी.
हे पुस्तक एका दमात वाचता येत नाही. एकेक पान डोक्यात मुरवत जावे लागते . पुस्तक वाचताना आपण स्वतःलाच वाचत असतो.
वाचक एक वेगळाच अनुभव घेत जातो. पानागणीक तो संपन्न होत जातो.

वाङ्मयसमीक्षा

प्रतिक्रिया

ज्ञानेश...'s picture

8 Oct 2009 - 10:06 am | ज्ञानेश...

सकाळी सकाळी एक चांगला लेख वाचायला दिल्याबद्दल विजुभाऊंचे आभार.

अशी काही 'सेल्फ हेल्प' प्रकारची पुस्तके आधी वाचली होती, आणि त्यातला फोलपणाही जाणवला होता.
हे बहुचर्चित पुस्तक मात्र वेगळे असावे, असे आपल्या लेखावरून वाटते. उर्वरित चार सवयींचाही परिचय करून द्यावा, ही विनंती!

"Great Power Comes With Great Responsibilities"

अजय भागवत's picture

8 Oct 2009 - 10:07 am | अजय भागवत

चांगले समिक्षण केले आहे तुम्ही.

"एका अंधार्‍या रात्री एक जहाज समुद्रात सफर करत असते. अंधारात नीट दिसत नसते जहाजाच्या कप्तानाला दूरवर एक दिवा दिसतो. बहुतेक दुसरे जहाज असावे. कप्तान रेडीओवर संदेश पाठवतो. आपन एकाच मार्गावर आहोत. धदक होईल तुम्ही मार्ग बदला.
दुसर्‍या बाजूने उलट उत्तर येते तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण तुम्हीच दिशा बदला. कप्तान चिडून पुन्हा संदेश पाठवतो. आम्ही लढाऊ जहाक आहोत. तुम्ही मुकाट्याने मार्ग बदला. उलट बाजूने उत्तर येते " आम्ही दीपस्तंभ ( दीपगृह)आहोत"

...आणि ते जहाज त्यावर आपटून फुटते

हे उदाहरण मी "मुल्ये इतकी घट्ट असतात की, त्यावर कशाचाही हल्ला झाला तरी ती जागची हलत नाहीत." अशा आशयाच्या बद्दल ऐकले होते.

पुण्यात मला अशी एक व्यक्ति माहित आहे की, स्टीफन कोवीला समक्ष भेटून आली आहे. हे पुस्तक वाच्ल्यानंतर तो इतका भारला गेला की, पदरचे पैसे मोडून फक्त त्याला भेटण्यासाठी अमेरीकेला जाऊन आला.

त्यानेच सांगितले की, स्टीफन कोवी इ-मेलला कधीच उत्तरे देत नाही - त्याचा सहकारी देत असे. त्याला गमतीने म्हणालो की, ही त्याची कदाचित आठवी सवय असावी!

विजुभाऊ's picture

8 Oct 2009 - 2:00 pm | विजुभाऊ

त्याने आठव्या सवयीबद्दल वेगळे पुस्तक लिहिले आहे.
एट्थ हॅबीट :फ्रॉम एफेक्टीव्हनेस टू ग्रेटनेस.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

पर्नल नेने मराठे's picture

8 Oct 2009 - 10:08 am | पर्नल नेने मराठे

L) झालय वाचुन विजुभाउ
चुचु

अनुप कोहळे's picture

8 Oct 2009 - 10:50 am | अनुप कोहळे

एका ईमेल ग्रुपवरील सदस्याची खालील स्वाक्षरी येथे सर्मपक वाटते.
Management is dropping last character...Manage-men
Still Better, drop one more.... Manage-me

ह्या Manage-me वर स्टिफन कोव्ही ने सांगीतलेल्या काही सवई आधारीत आहेत असे मला वटते.

स्वाती२'s picture

8 Oct 2009 - 4:39 pm | स्वाती२

छान ओळख. या पुस्तकाचेच भावंड Living the 7 Habits . मला दोन्ही आवडली.

प्राजु's picture

8 Oct 2009 - 8:54 pm | प्राजु

पुस्तक ओळख आवडली.
- प्राजक्ता पटवर्धन
http://praaju.blogspot.com/

अनिरुध्द's picture

8 Oct 2009 - 11:20 pm | अनिरुध्द

ओळख आवडली. फारच छान लिहीलंय.

स्वाती राजेश's picture

9 Oct 2009 - 4:09 pm | स्वाती राजेश

एका नविन पुस्तकाची छान ओळख करून दिलीत...
परिक्षण छान आहे.....

अमोल केळकर's picture

9 Oct 2009 - 4:27 pm | अमोल केळकर

पुस्तकाचा सारांश आवडला
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

आशिष सुर्वे's picture

9 Oct 2009 - 9:16 pm | आशिष सुर्वे

बर्‍यापैकी उत्सुकता निर्माण केलीत..
लगेच पुस्तक घेऊनही आलोय!!

धन्यवाद..
-
कोकणी फणस

वाटाड्या...'s picture

10 Oct 2009 - 5:10 am | वाटाड्या...

मित्रहो...

ह्या ७ सवयीविषयी पि.पि.टी. माझ्याकडे आहे. कोणाला हवी असल्यास सांगा..मी पाठवीन..नक्कीच वाचुन आचरण्यायोग्य...

- वा..

मैत्र's picture

10 Oct 2009 - 10:15 am | मैत्र

सुमारे दहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा वाचलं. मग मित्राने भेट दिल. तेव्हापासून अनेकदा वाचलं.
हे पुस्तक एका दमात वाचता येत नाही. एकेक पान डोक्यात मुरवत जावे लागते . पुस्तक वाचताना आपण स्वतःलाच वाचत असतो.
वाचक एक वेगळाच अनुभव घेत जातो. पानागणीक तो संपन्न होत जातो.

हे अगदी खरं आहे. तसंच एक दोन वेळा वाचून कल्पना स्पष्ट झाल्यावर, कुठलाही भाग (हॅबिट) काढून वाचायला छान वाटतं. एक एक मुद्दा पटत उमजत जातो. आपल्या आयुष्याशी, विचारांशी संबंध जुळत जातात.

महत्त्वाचा मुद्दा जो सुरुवातीला मांडला आहे - पर्सनॅलिटी एथिक आणि कॅरॅक्टर एथिक - की हे पुस्तक इतर सेल्फ हेल्प पेक्षा खूप वेगळं आहे.
या मूलभूत गोष्टींना क्विक फिक्स नाही. ही वेळ घेणारी आणि प्रयत्नाने करण्याची बाब आहे. यात टेक्निकस नाही विचार आहेत.

प्रत्येक सवय आणि त्यामागचे मुद्दे असे स्वतःशी विचार करण्याचे आहेत.

एका उत्तम पुस्तकाचा चांगला परिचय करुन दिल्याबद्दल धन्यवाद. काही अजून संदर्भ दिले तरी उत्तम.

क्रान्ति's picture

10 Oct 2009 - 9:01 pm | क्रान्ति

परिचय करून दिला आहे चांगल्या पुस्तकाचा. अवश्य वाचायला हवंय.

क्रान्ति
अग्निसखा

भाग्यश्री कुलकर्णी's picture

11 Oct 2009 - 1:09 pm | भाग्यश्री कुलकर्णी

अगदी असेच म्हणते.

विजुभाऊ's picture

12 Oct 2009 - 10:34 am | विजुभाऊ

हे पुस्तक अनुभवायचे आहे. केवळ वाचन या पुस्तकाच्या बाबतीत अशक्य ठरते.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत