तिसरा डोळा?- विचार करा!

अजय भागवत's picture
अजय भागवत in जनातलं, मनातलं
4 Oct 2009 - 11:26 am

मेंदूचे संशोधक असे सांगतात की, मानवाच्या मेंदूचे जे प्रमुख भाग असतात, (लोब) त्यात पुढील मेंदू (फ़्रंटल लोब) व मागील मेंदू (टेंपरल लोब) ह्यांचे कार्य फार महत्वाचे असते. गोरीला, जावा मानव, व आधुनिक मानव ह्यांच्या मेंदूचे आडवे छेद घेऊन अभ्यासल्यास असे दिसते की, त्यांच्या टेंपरल लोबमधे फारसा फरक नाही; पण पुढील मेंदू जावा मानवात गोरीला पेक्षा मोठा आहे. परंतू आधुनिक मानवाच्या पुढील मेंदूचा आकार जावा मानवाच्या पुढील मेंदूपेक्षा दखल घ्यावी इतका मोठा आहे.

गोरीला
गोरीला

जावा मानव
जावा मानव

आधुनिक मानव
आधुनिक मानव

टेंपरल लोबचे कार्य माहिती लक्षात ठेवणे, आकलन करणे हे असते तर, फ़्रंटल लोबचे काम नवीन गोष्टींचा विचार करण्याचे असते. मानवाच्या बाबतीत इतर प्राण्यांच्या अनुषंगाने विचार करता मानवाची विचार करण्याची क्षमताच त्याला वेगळेपण देते.

जरी आधुनिक मानवाचा फ़्रंटल लोब गोरीला पेक्षा बराच मोठा असला तरी तेव्हढेच महत्वाचे नाही. फ़्रंटल लोबवर असलेल्या घड्याही (घड्यांची संख्या) तितक्याच महत्वाच्या असतात. ह्या घड्यांची संख्या हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे. परंतू, असे म्हणतात की, सामन्य व्यक्ति त्याच्या मेंदूच्या शक्तीच्या फक्त १८% क्षमतेचा वापर करते; उरलेली ८२% क्षमता वापरलीच जात नाही. हे जर खरं असेल तर लाजिरवाणं आहे.

पुढील कोटी अगदीच टाकावू नाही असे वाटते- शंकराच्या तिसऱ्या डोळ्याचा जो आशय आहे, तो कदाचित हाच असावा की, फ़्रंटल लोबचा जास्त वापर जो करेल, त्याला जणू काही तिसरा डोळाच प्राप्त होईल. त्याला अशी काही वैचारीक नजर मिळेल की, जे दोन डोळ्यांनी "दिसत" आहे, त्यास अधिक विचार करुन त्याला एक नवा, भक्कम, असा अर्थ प्राप्त करु शकेल.

जाता-जाता- जापानीज भाषेत "घड्या" ह्या शब्दाला "शिवा" म्हणतात!!!

विज्ञानविचार

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

4 Oct 2009 - 11:31 am | सखाराम_गटणे™

दिवसभर पोटासाठी कि-बोर्ड बडवल्यानतंर, मिपावर येउन तिसरा डोळा वापरतो.,

असो, लेक उत्तम, आव्दला

टारझन's picture

4 Oct 2009 - 11:49 am | टारझन

तुम्ही फक्त शंकराच्या तिसर्‍या डोळ्याचा विचार करताय :)
आम्ही आपल्यादेवांना दे ४/६/८/१०/१२/१६/२० हात कसे बसले असावेत ? त्यांच्या सांगाड्याची रचना कशी असावी? एकाच खोबणीतून एवढे हात निघण्याची करामत कशी केली असेल ? इत्यादी वांझोटे प्रश्न डोक्यात आहेत :)

बाकी हे ८२%-१८% ही टक्केवारी कशी काढतात हो ?

अजय भागवत's picture

4 Oct 2009 - 11:57 am | अजय भागवत

>>बाकी हे ८२%-१८% ही टक्केवारी कशी काढतात हो ?

प्रश्न चांगला आहे. मी ही वर "हे खरे असेल तर..." असे लिहिले आहे.

टारझन's picture

4 Oct 2009 - 12:15 pm | टारझन

"हे खरे असेल तर..." असे लिहिले आहे.

हो .. ते ठिक, वाचलेच ... पण मग ह्यात लाजिरवानं काय आहे ते कळेल काय ? :) आता सगळेच माणसं तेवढा मेंदू वापरतात , जर सगळीच माणसं विवस्त्र फिरली असती तर विवस्त्र फिरणं सुद्धा लाजिरवाणं नसतं राहिलं !

अजय भागवत's picture

4 Oct 2009 - 12:19 pm | अजय भागवत

>>आता सगळेच माणसं तेवढा मेंदू वापरतात , जर सगळीच माणसं विवस्त्र फिरली असती तर विवस्त्र फिरणं सुद्धा लाजिरवाणं नसतं राहिलं !

तुमचा मुद्दा खरंच विचारत टाकणारा आहे. :-)

विजुभाऊ's picture

5 Oct 2009 - 3:30 pm | विजुभाऊ

इंग्रजीत " थर्ड आय" ले. लोम्बसंग राम्पा.
मराठीत त्रुतीय नेत्र . ले. डॉ निषिकान्त श्रोत्री.
वाचा. त्या तिसरा डोळा मिळालेल्या व्यक्तीचे अनुभव लिहिले आहेत