आम्ही देवाच्या दयेने सुखरूप आहोत

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
1 Oct 2009 - 1:54 pm

"
मिपा"वरील सभासद मित्रांनो,
हा लेख असा इथे लिहिणे कायद्यात बसत असेल अशी आशा करतो.
एक-एक करत खूप जणांनी खूप आस्थेने माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या सुरक्षित असल्याबद्दलची चौकशी केली व त्याने मी भारवून गेलो आहे. प्रत्येकाला आतापर्यंत वैयक्तिक उत्तरेही पाठविली, पण शेवटी असं जाहीररीत्या कळवायचं ठरविलं!
हा धरणीकंप सुमात्रा बेटाच्या पश्चिमेला "पाडांग"जवळ झाला. रिश्टर स्केलवर ७.९ म्हणजे चांगलाच मोठा होता. जीवित-वित्तहानी खूपच झालेली दिसतेय. सुरुवातीला ७५ माणसांच्या मृत्यूचा अंदाज होता, पण अजून बर्‍याच इमारतीखाली गाडली गेलेली माणसे, गाड्या वगैरे काढणे चालूच आहे व आताच आलेल्या आकड्यानुसार २५० लोकांचे मृतदेह मिळाले असून हा आकडा वाढतोच आहे!)
याच पश्चिम सुमात्रा बेटाच्या उत्तरेच्या बाजूला "बंदा आचे"जवळ ("Aceh" चा उच्चार "आचे" असा करतात इथल्या भाषेत!) झालेल्या धरणीकंपानेच जीवघेण्या त्सुनामीला जन्म दिला होता. त्यात दोन अडीच लाख लोक दगावले होते. पण यावेळी सुदैवाने त्सुनामी झाली नाही.
पण यावेळी जकार्ताला कांहीं जाणवले नाहीं. खरं तर आम्हालाही या धरणीकंपाबद्दल इथल्या दूरचित्रवाणीवरूनच कळलं.
आपण सगळ्यांनी इतक्या आस्थेने चौकशी केलीत याबद्दल मनापासून आभार! खरंच मिपावर अशी आस्थेने वागणारी मंडळी खूप आहेत हेही या फोरमचे मोठे यश म्हणायला हवे! व याचे श्रेय सभासदांना, संपादकमंडळाच्या अधिकार्‍यांनी घडविलेल्या या फोरमच्या "स्वभावा"ला व आपणा सर्व मराठी बंधू-भगिनींच्या प्रेमळ स्वभावालाच आहे.
वर जावा-सुमात्राच्या नकाशावर पाडांग, बंदा आचे व जकार्ता दाखवली आहेत. (पाडांगभोवती वर्तुळ काढलेले नाहीं, पण सुमात्राच्या पश्चिमेला असलेले हे शहर आपल्याला सहज सापडेल. (हा नकाशा माझ्या दुसर्‍या एका लेखासाठी बनविला होता त्यामुळे बरीच वर्तुळे "नको तिथे" काढली आहेत असे आपल्याला वाटेल म्हणून मुद्दाम लिहितोय!)
पुनश्च सर्वांचे आपल्या प्रेमाबद्दल आभार!
सुधीर

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

प्रभो's picture

1 Oct 2009 - 1:57 pm | प्रभो

काका,

तुम्ही देवाच्या दयेने सुखरूप आहात ही चांगली गोष्ट.........

-प्रभो

गणपा's picture

2 Oct 2009 - 1:57 pm | गणपा

अंमळ उशीराच टंकतोय.
पण परत एकदा भु़कंप झाला असे ऐकले.

(दुबैला राहाताना एकदा भु़कंपाच कंपन जाणवलेला) -गणपा

सखाराम_गटणे™'s picture

1 Oct 2009 - 2:00 pm | सखाराम_गटणे™

वाचुन बरे वाटले. ही खरड मी आधीच इअकडे - तिकडे वाचली होती.
१. त्या भागात किती भरतीय राहतात?

सुधीर काळे's picture

1 Oct 2009 - 11:15 pm | सुधीर काळे

ज्यांना expatriate म्हणतात अशी साधारणपणे ३००० कुटुंबे असावीत. याखेरीज सिंधी व्यापारी लोक, ज्यांना "लोकल सिंधी" म्हटले जाते, असेही खूप आहेत. पण इंडिया क्लबची सभासदसंख्या ६००च्या आसपास आहे. गेल्या वर्षी ती ७५० होती.
सुधीर
------------------------
हे देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतका विवेक मला दे!

सखाराम_गटणे™'s picture

1 Oct 2009 - 2:00 pm | सखाराम_गटणे™

वाचुन बरे वाटले. ही खरड मी आधीच इअकडे - तिकडे वाचली होती.
१. त्या भागात किती भरतीय राहतात?

सखाराम_गटणे™'s picture

1 Oct 2009 - 2:00 pm | सखाराम_गटणे™

वाचुन बरे वाटले. ही खरड मी आधीच इअकडे - तिकडे वाचली होती.
१. त्या भागात किती भरतीय राहतात?

सखाराम_गटणे™'s picture

1 Oct 2009 - 2:01 pm | सखाराम_गटणे™

वाचुन बरे वाटले. ही खरड मी आधीच इअकडे - तिकडे वाचली होती.
१. त्या भागात किती भरतीय राहतात?

महेश हतोळकर's picture

1 Oct 2009 - 2:02 pm | महेश हतोळकर

वाचून बरं वाटलं. हसमनीस कुटुंबीय पण सुखरूप असतील अशी अपेक्षा करतो.

दशानन's picture

1 Oct 2009 - 4:30 pm | दशानन

तुम्ही देवाच्या दयेने सुखरूप आहात ही चांगली गोष्ट.........

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

सुधीर काळे's picture

2 Oct 2009 - 7:49 am | सुधीर काळे

आपके 'शेर'की दाद देते हैं| बहुतही खूबसूरत है|
हमभी उर्दू शेर-ओ-शायरीका शौक रखते हैं, एकदम डिक्शनरी लेके! [अर्थ समजायला हवा ना? बर्‍याचदा शब्दसंपन्नता (vocabulary) कमी पडते!] पण माझ्याकडे एक "स्वर्गीय" डिक्शनरी आहे.....आईना-ए-गझल! फारच मस्त आहे.....!
सुधीर
------------------------
हे देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

प्रसन्न केसकर's picture

1 Oct 2009 - 5:27 pm | प्रसन्न केसकर

बातमी पाहिल्यापासुन तोच विचार मनात घोळत होता. आत्ता धागा पाहिला अन बरं वाटलं.

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

आपला अभिजित's picture

1 Oct 2009 - 5:32 pm | आपला अभिजित

भूकंप फारच भयानक झाला आहे. आणि जीवितहानी पण.
तुम्ही ठीक आहात, हे वाचून बरे वाटले.

विसोबा खेचर's picture

1 Oct 2009 - 5:55 pm | विसोबा खेचर

हा लेख असा इथे लिहिणे कायद्यात बसत असेल अशी आशा करतो.

इथे कायद्यात काय बसते आणि काय नाही हे येथे स्पष्ट लिहिलेले आहे. असे असताना वरील विधानाचे प्रयोजन कळले नाही. जर वरील प्रकटन हे आपले स्वत:चे नसेल तर ते या क्षणीही कायद्यात बसणार नाही! असो.

आपण व आपले कुटुंब सुखरूप आहात याचे मनापासून बरे वाटले.

संपादकमंडळाच्या अधिकार्‍यांनी घडविलेल्या या फोरमच्या "स्वभावा"ला व आपणा सर्व मराठी बंधू-भगिनींच्या प्रेमळ स्वभावालाच आहे.

??

असो...! :)

आपला,
(संपादक मंडळींनी घडवलेल्या या फोरमचा एक सभासद!) तात्या.

टारझन's picture

1 Oct 2009 - 7:39 pm | टारझन

प्रष्ण कसले पडलेत त्यात्या ? ह्याचं उत्तर आहे "काळे प्रणाली"

आपण सुखरूप आहात हे पाहुन अंमळ बरं वाटलं .. आजच्या ह्या मंगलप्रसंगी मी २ तंदूर आणि विसेक चपात्या जास्त खाणार !!

-(अंमळ बर वाटणारा) टारझन

प्रभो's picture

1 Oct 2009 - 7:42 pm | प्रभो

म्हणजे कोंबड्यांवर त्सुनामी ..=))

-प्रभो

विसोबा खेचर's picture

1 Oct 2009 - 11:59 pm | विसोबा खेचर

हा लेख असा इथे लिहिणे कायद्यात बसत असेल अशी आशा करतो.

अद्याप वरील खोडसाळपणाचा खुलासा नाही! असो...

तात्या.

सुधीर काळे's picture

2 Oct 2009 - 12:04 am | सुधीर काळे

यात कसलाही खोडसाळपणा नव्हता. माझा अशा नियमांबद्दल अजूनही जाम घोटाळा झालेला आहे. म्हणून विचारले. आता एकादी गोष्ट नाही कळली तर विचारायला हवेच, नाही का?
तुम्हाला उगीचच राग येतोय्!
सुधीर
------------------------
हे देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतका विवेक मला दे!

विसोबा खेचर's picture

2 Oct 2009 - 12:08 am | विसोबा खेचर

माझा अशा नियमांबद्दल अजूनही जाम घोटाळा झालेला आहे. म्हणून विचारले. आता एकादी गोष्ट नाही कळली तर विचारायला हवेच, नाही का?

अहो काळेसाहेब, कृपया हे वाचा. नियम स्पष्ट आहेत.

तात्या.

सुधीर काळे's picture

2 Oct 2009 - 12:00 am | सुधीर काळे

तात्यासाहेब!
ज्याला इंग्रजीत एकाद्या संस्थेचं culture म्हणतात त्याबद्दल मी बोलत होतो. मिसळपावचे culture चांगले आहे व यामागे कुणाचे तरी कष्ट असणारच. या फोरमचे मालक म्हणून तुम्हाला व तुमच्या सहकार्‍यांना सभासदांचा पिंड घडविण्याचे मी क्रेडिट दिले. तुम्ही नक्कीच कष्ट घेतले आहेत!
मग रागावलात कां व इतकं curtly मला का झापलंत? कळले नाहीं.
<<इथे कायद्यात काय बसते आणि काय नाही हे येथे स्पष्ट लिहिलेले आहे. असे असताना वरील विधानाचे प्रयोजन कळले नाही.>>
आपल्याला वाटते तितके ते स्पष्ट नाहींय् व हुशार लोक नियम वाकवून त्यांना हवं ते करतातच! मी स्वत: फारसा हुशार नाहीं त्यामुळे पदो-पदी अशी शंका येत रहाणारच. तरी त्याचे निरसन करावे.
पण माझी कांहींही तक्रार नाहीं व मी पुरावा पण नाहीं दाखवणार. शोधलात तर तुम्हालाच सापडेल.
कदाचित आमची सीमित बुद्धिमत्ता याचे कारण असू शकेल. पहा ना? खरडवही व खरडफळा यातला फरक मला अजूनही कळला नाही व जिथला मजकूर तीन दिवसात पुसला जाण्याबद्दल उल्लेख आहे तिथे ९४ पानांचे वर्षा-दीड वर्षांचे संदेश अजूनही तसेच "शाश्वत" रूपात कसे पडून आहेत हेही कळले नाहीं.
म्हणून शंका आली कीं मला नीट समजले नसल्यामुळे माझं चुकतंय की काय ते विचारावे!
बाकी काही नाही. राग मानू नये.
सुधीर
------------------------
हे देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतका विवेक मला दे!

विसोबा खेचर's picture

2 Oct 2009 - 12:02 am | विसोबा खेचर

खुलाश्याबद्दल धन्यवाद काळेसाहेब! :)

तात्या.

सुखरूप आहात ऐकून बरे वाटले.

मिसळभोक्ता's picture

1 Oct 2009 - 8:50 pm | मिसळभोक्ता

आपण सुखरूप आहात हे वाचून बरे वाटले.

बहासा इण्डोनेशिया मध्ये, बेटांना पुलाउ म्ह्णतात का हो ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

चतुरंग's picture

1 Oct 2009 - 8:57 pm | चतुरंग

फारच मोठा भूकंप होता. इथे अमेरिकन सामोआ मध्ये वाटलागलीये लोकांची त्सुनामीने.

पुलाउ म्हणजे बेटच - हा बघा दुवा
आणि शब्द संस्कृतातून आलाय म्हणते आहे डिक्शनरी.

चतुरंग

सुधीर काळे's picture

1 Oct 2009 - 11:26 pm | सुधीर काळे

होय. आपली माहिती खरी आहे.
शिवाय सेरिबू पुलाउ म्हणजे thousand islands! अशा बेटांचा समूह इंडोनेशिया व सिंगापूर यांमधल्या जावा समुद्रात आहे.
पण पुलाउंची (खायच्या) "पुलव्या"शी गल्लत करू नये!
दह्याला "सुसू आसम" (म्हणजेच आंबट दूध) म्हणतात! दुधाला शब्द "सुसू" हाच आहे! म्हणजेच कुणाच्या आनंदात विरजण घालायला आपल्याला 'तो' विधी "सुसू"त करावा लागेल! Just pulling your leg.
सुधीर
------------------------
हे देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतका विवेक मला दे!

मिसळभोक्ता's picture

2 Oct 2009 - 2:20 am | मिसळभोक्ता

म्हणजेच कुणाच्या आनंदात विरजण घालायला आपल्याला 'तो' विधी "सुसू"त करावा लागेल!

मग, आम्ही तो विधी कुठे करतो, असं वाटलं ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

पारंबीचा भापू's picture

2 Oct 2009 - 4:02 pm | पारंबीचा भापू

कुटं बी करा की! आमाला नका सांगू, पगा!
भापू

विकास's picture

1 Oct 2009 - 10:20 pm | विकास

आपली खुशाली ऐकून बरे वाटले.

आपण देवदयेने सुखरूप आहात असे म्हणालात म्हणून विचारावेसे वाटते ३३ कोटींपैकी नक्की कुठला? ;)

संपादकमंडळाच्या अधिकार्‍यांनी घडविलेल्या या फोरमच्या "स्वभावा"ला...

:T तुम्हाला आता शुभेच्छा! (कदाचीत आता देव वाचवू शकेल असे वाटत नाही!) ;)

निमीत्त मात्र's picture

1 Oct 2009 - 11:24 pm | निमीत्त मात्र

आपण देवदयेने सुखरूप आहात असे म्हणालात म्हणून विचारावेसे वाटते ३३ कोटींपैकी नक्की कुठला?

की प्रमोद देव, चित्रा देव, रमेश देव, कपिल देव ह्यातला? ;)

सुधीर काळे's picture

1 Oct 2009 - 11:30 pm | सुधीर काळे

सरशी तिथे पारशी या चालीवर जो "पावेल तो देव"!
सुधीर
------------------------
हे देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतका विवेक मला दे!

अवलिया's picture

1 Oct 2009 - 11:14 pm | अवलिया

आपली खुशाली ऐकून बरे वाटले.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

निमीत्त मात्र's picture

1 Oct 2009 - 11:25 pm | निमीत्त मात्र

आपली खुशाली ऐकून बरे वाटले.

ऋषिकेश's picture

1 Oct 2009 - 11:45 pm | ऋषिकेश

वाचुन बरे वाटले. काळजी घ्या (मुळ कंपानंतर आफ्टरशॉक येऊ शकतात म्हणून म्हटलं)

ऋषिकेश
-------
नवी स्वाक्षरी बनविण्यास टाकली आहे

पाषाणभेद's picture

2 Oct 2009 - 7:58 am | पाषाणभेद

धन्यवाद देवाला, आपण ठिक आहात ते.
----------------------------------
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
(तुरूंगात फावल्या वेळेत आम्ही लोकांना नावे, स्वाक्षर्‍या टाकून देतो. गरजूंनी संपर्क करावा. वाजवी सरकारी किंमत. सरकारी वेळेत डिलीव्हरी मिळेल.)

अरुण मनोहर's picture

2 Oct 2009 - 2:00 pm | अरुण मनोहर

नेहमीच सुखरुप ह्रावा, सलामतकान.

अमोल केळकर's picture

2 Oct 2009 - 4:55 pm | अमोल केळकर

आपली खुशाली कळली. काळजी घ्या.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

पिवळा डांबिस's picture

3 Oct 2009 - 1:28 am | पिवळा डांबिस

आपण आणि आपले कुटूंबिय सुखरूप आहांत हे वाचून आनंद झाला...
काळजी घ्या...

सुधीर काळे's picture

6 Oct 2009 - 8:58 am | सुधीर काळे

आजच्या बातमीप्रमाणे नुकत्याच झालेल्या पाडांग येथील भूकंपात ६०० पेक्षा जास्त माणसे दगावली असून जोरदार पावसामुळे मदतकार्यात खूप अडथळे येत आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढेल अशी भीती आहे.
पडझड झालेल्या ढिगार्‍याखाली कुणी जिवंत असण्याची शक्यता शून्यावर आली असली तरी मृतदेह काढण्याचे कार्य चालूच रहाणार आहे.
(वरील चित्रात मदतकार्यात भाग घेणारा एक दमलेला कार्यकर्ता पडझड झालेल्या "आंबाचांग" हॉटेलच्या डिगार्‍यावर बसून विश्रांती घेत आहे.)
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

विसोबा खेचर's picture

6 Oct 2009 - 10:25 am | विसोबा खेचर

खूप वाईट वाटले...

तात्या.

मॅन्ड्रेक's picture

6 Oct 2009 - 11:51 am | मॅन्ड्रेक

at and post : janadu.


A newly graduated student walks in front of a damaged building at the Padang State University campus in Padang, West Sumatra, on Saturday.
A graduation ceremony for 2,064 of the university’s students had to be held in a tent because most of the university’s buildings were destroyed in the recent earthquake.-Jakarta Post photograph
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!