शतघौतघृत हा विलक्षण प्रकार गायीचे दुध वापरुन बनवलेल्या तुपापासून करतात.
प्रक्रिया:
- जेव्हढे तूप घ्याल त्याच्या शंभरपट पाणी घ्या.
- ते पाणी एका पातेल्यात घेऊन त्यात तूप घाला व शंभर वेळा ते पाणी डावी-उजवी कडे फिरवा.
- शंभरवेळा झाले की पाणी फेकून द्या.
- असे शंभर वेळा करा.
= १०० * १००
- असे सिद्ध धूतलेले तूप जखमेवर वापरुन पहा. चूटकीसरशी जखम भरुन येते.
- ओठ फाटत असल्यास ओठांना लावा व चमत्कार पहा.
- चेहऱ्याला लावा आणि पहा कशी कांती चमकदार होते ते.
ही आयुर्वेदातील एक औषधकृती आहे. सुशृतसंहीता वाचा.
प्रतिक्रिया
25 Sep 2009 - 9:22 pm | दिपाली पाटिल
>> # असे सिद्ध धूतलेले तूप जखमेवर वापरुन पहा. चूटकीसरशी जखम भरुन येते.
# ओठ फाटत असल्यास ओठांना लावा व चमत्कार पहा.
# चेहऱ्याला लावा आणि पहा कशी कांती चमकदार होते ते.
हे सगळं करायला जीवंत रहायला पाहीजे ना...बरिच वर्ष लागत असतील नाही हे १००वेळा करायला...
दिपाली :)
25 Sep 2009 - 9:24 pm | अमृतांजन
शॉर्टकट आहेत. प्रचिती येऊ शकते तितक्याच प्रमाणात जितक्या प्रमाणात तूप घुसळून धुतले गेले.
नियमाप्रमाणे तरीही १५ दिवसात तयार करता येते.
25 Sep 2009 - 9:26 pm | अमृतांजन
बाय-द-वे, पुर्वी लढाया झाल्यानंतर जखमी सैन्यावर उपचार करायला केवळ आणि केवळ हेच औषध वापरले जायचे.
27 Sep 2009 - 8:14 am | हर्षद आनंदी
लढायानंतर वापरण्यासाठी अनेक औषधे.. किमान आत्तापेक्षा जास्त आणि लाभदायक होती. कित्येक मुळ्या, काढे, रस आणि काय काय..
जखमात जंतु-संसर्ग होऊ नये म्हणुन "सडलेले तुप" वापरले जायचे, जे अत्यंत जहाल औषध आहे.
शतधौतघॄत : छान वाटते ऐकायला
25 Sep 2009 - 9:27 pm | प्रभो
आम्ही बुआ पाणी + लोणी असलेलं कैलास जिवन लावतो....
हे पण बघुया ट्राय करून :)
(तुपाचा खायला उपयोग करणारा) प्रभो
25 Sep 2009 - 9:28 pm | चतुरंग
???
चतुरंग
25 Sep 2009 - 9:52 pm | दिपाली पाटिल
लढाई झाल्यानंतर १००% उपाय.. :D
दिपाली :)
25 Sep 2009 - 9:35 pm | अमृतांजन
हा धागा काढण्यामागचे प्रयोजन समजले नाही
माहिती द्यावीशी वाटली. बाकी काही नाही.
25 Sep 2009 - 9:41 pm | चतुरंग
अचानकच?
तुम्ही शतधौतघृताबद्दल कदाचित प्रथमच वाचलेत आणि एकदम चकित होऊन उत्साहाने हा धागा काढलेला दिसतो आहे! :)
(हरकत नाही शंभर प्रतिसाद येऊन धागा घुसळला गेला की बघूयात! ;) )
(सुश्रुत)चतुरंग
25 Sep 2009 - 9:52 pm | अमृतांजन
घ्या बुवा मांडवली करुन.
मला एकदा पोलिसाने वन-वे तून उलट्या बाजुने जाताना पकडले. मी लगेच त्याला दाखवायला लागलो की, ते बघ, ते बघ बाकीचे पण जाताहेत त्यांना का सोडतोयस. तो म्हणाला की, तुला पकडले आहे त्याचा विचार आपण आधी करुन. तेव्हा पासुन मी वाद घालणे टाळतो.
26 Sep 2009 - 3:46 am | शाहरुख
पण वन-वे तून जाणे टाळताय की नाही ??
शतघौतघृतची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !!
(आगाऊ) शाहरुख
25 Sep 2009 - 9:57 pm | अमृतांजन
तुम्ही शतधौतघृताबद्दल कदाचित प्रथमच वाचलेत आणि एकदम चकित होऊन उत्साहाने हा धागा काढलेला दिसतो आहे!
नाही राव, मी स्वत ते केलेले आहे. एकदम सॉल्लेट परिणाम्कारक आन्टीडोट आहे.
26 Sep 2009 - 4:30 am | पाषाणभेद
सकाळ मधले बालाजी तांबे यांचा लेख वाचला का?
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
26 Sep 2009 - 11:16 am | युयुत्सु
मानवी जीवनातील प्रत्येक गोष्टीला प्रयोजन असतेच असे नाही...
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
अर्थ - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
------
25 Sep 2009 - 9:55 pm | अमृतांजन
ज्यांचा फायदा होईल त्यांनी जरुर कळवा- मिपावर.
25 Sep 2009 - 11:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तूप पाण्यात विरघळणार नाही, पण डिस्पर्स (मराठी/योग्य शब्द?) होणार नाही का? तसं झालं की पाण्याबरोबर ते वाहून नाही का जाणार?
>># असे सिद्ध धूतलेले तूप जखमेवर वापरुन पहा. चूटकीसरशी जखम भरुन येते.<<
हाय, दिल की जख्म भी भरती है क्या?
>># ओठ फाटत असल्यास ओठांना लावा व चमत्कार पहा.<<
कुणाच्या ओठांना लावलं की काय चमत्कार होतो?
>># चेहऱ्याला लावा आणि पहा कशी कांती चमकदार होते ते. <<
रोज आठ-नऊ तास झोपा आणि अर्धा पाऊण तास व्यायाम करा मग मलम, तूपं आणि तेलांची काही गरज नाही. शिवाय ... जाऊ दे ... इथे नको.
अदिती
26 Sep 2009 - 3:30 am | अमृतांजन
हाय, दिल की जख्म भी भरती है क्या?
एकदा आणि पैलांदाच. नंतरच्या जखमा भरुन देण्याची ग्यारंटी नाही.
पुन्हपुन्हा दिलाच्या जखमा होत असतील तर पाय घसरु नये म्हणून आम्ही स्पोर्ट शूज रेकमंड करतो. (ते च्व्कीक-च्व्कीक आवाज करणारे अमेरीकन बास्केटबॉलपटूंचे शूज सारखे).
रोज आठ-नऊ तास झोपा आणि अर्धा पाऊण तास व्यायाम करा मग मलम, तूपं आणि तेलांची काही गरज नाही.
वरील उपाय नॉर्मेल लोकांसाठी आहेत.
27 Sep 2009 - 12:30 am | शक्तिमान
>>वरील उपाय नॉर्मेल लोकांसाठी आहेत
+१
26 Sep 2009 - 12:49 am | महेश हतोळकर
•शंभरवेळा झाले की पाणी फेकून द्या.
•असे शंभर वेळा करा.
= १०० * १००
एवढं करण्यापेक्षा विकत का नाही घेत. बर्याच आयुर्वेदीक औषधांच्या दुकानात मिळते.
स्वानुभवाने सांगतो अतीरंजीत करून सांगीतलेले नाहीत.
26 Sep 2009 - 6:37 am | अवलिया
उत्तम माहिती. रोचक चर्चा.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
26 Sep 2009 - 12:06 pm | sneharani
हे तुप एका तांब्याच्या भांड्यात घेउन १०० पाण्यान धुवाव. असं कुठेतरी वाचल होत खरच त्याचे खुप फायदे आहेत.
शत = १००
धौत= धुतलेल
घृत = तूप
असाच अर्थ आहे ना?
26 Sep 2009 - 5:17 pm | विकास
हे तुप एका तांब्याच्या भांड्यात घेउन १०० पाण्यान धुवाव. असं कुठेतरी वाचल होत खरच त्याचे खुप फायदे आहेत.
सकाळमधील तांब्यांचे? ;)
26 Sep 2009 - 1:23 pm | मिसळभोक्ता
तुप हे स्निग्ध पदार्थामधले एक आहे. त्यात शंभर पट पाणी घालून काहीतरी विचित्र करण्यापेक्शा स्निग्ध पदार्थांचा सर्वाधिक फायदा ज्या क्रियांत होतो, तेथे तेलाऐवजी तुपाचा वापर करावा.
-- मिसळभोक्ता
26 Sep 2009 - 2:38 pm | विनायक प्रभू
लय भारी
26 Sep 2009 - 11:56 pm | डॉ.प्रसाद दाढे
मेलो मेलो... मिभो आणि मास्तर दोघांनाही साष्टांग दंडवत
27 Sep 2009 - 8:29 am | सुबक ठेंगणी
ह्याचा होमिओपथीमधल्या principle of dilution शी काही संबंध आहे का?
30 Sep 2009 - 1:26 pm | अमृतांजन
ह्याचा होमिओपथीमधल्या principle of dilution शी काही संबंध आहे का?
अजिबात नाही.
( अवांतर- हे वाचा-http://www.eanubhav.com/Dr%20Shantanu%20Abhyankar.htm)