मी राहातो ठाण्याला.
तो राहतो साउथ अफ्रिकेला.
सध्या जरी कोच म्हणुन भारतिय क्रिकेट बरोबर असतो.
मला क्रिकेटपटु मधे स्वारस्य नाही.
मी क्रिकेट फारसे बघत नाही.
क्रिकेट थोडेफार कळते.
वर्ल्ड कप जिंकल्यावर( २ दा) सगळ्या भारतियांप्रमाणे मला सुद्धा आनंद झाला होता.
जिंकल्यावर टी.वी वर हायपर होणारे (धोनी के धुरंदर वैग्रे)आणि हरल्यावर देश पार धुळीला मिळाल्यागत अश्रुपतन करणारे टी.वी चे बातमीदार मला अस्वस्थ करतात. एकंदरीत क्रिकेट बरोबर फारसे सख्य नाही.
सध्याच्या दिनचर्येत वर्तमानपत्राला स्थान नाही.
संध्याकाळी वाचण्यात अर्थ नाही.
टी.वी. पासुन लांबच असतो.
जे काही थोडेफार मनोरंजन ते मिपावरच.
मला कळेना अचानक काय झाले?
मिपासदस्य मला "काय हो, मास्तर गॅरी कर्स्टर्न ठाण्याला आला होता का?" असा प्रश्न विचारायला लागले.
एकाने तर कहरच केला.
"गॅरी म्हणजे तुमचे प्रतिबिंब का?" असा प्रश्न विचारला.
( हा अवलिया नस्ते उद्योग करतो आणि डोक्याला त्रास मला)
मला काहीच कळेना.
मी माझ्या मिपावरील मित्राना विचारुन बघितले.
ते पण काही नीट सांगेनात.
त्यातल्या त्यात एकाने सांगितले की त्याने भारतिय टीम ला परफॉर्मन्स वाढवण्याकरता काही टीप्स दिल्या आहेत.
मी म्हणालो, "अहो, कोच आहे तो. त्याचे कामच आहे ते"
त्यात माझा काय संबंध?
मी मुलांना मार्क कसे वाढवायचे ते सांगतो(परफॉर्मन्स)
असा काही बादरायणी संबंध असेल तर माहीत नाही.
कृपया मला हा काय प्रकार आहे ते कुणी सांगेल का?
प्रतिक्रिया
25 Sep 2009 - 7:58 pm | दशानन
=))
=))
=))
आजकाल तुम्हालाच समुउपदेशाची गरज पडलेली दिसत आहे मास्तर.... ;)
***
राज दरबार.....
25 Sep 2009 - 11:22 pm | टारझन
काय पाण्चटपणा चाल्लाय हा मास्तर ? वेळ जात नाही का ? की लाईमलाईट पासून दुर चाल्लो ही चिंता सतावते ? तसंही नान्याने भविष्य सांगितलं होतं म्हणा ;)
सरळ बोला की कोणाकडून तरी वदवून घ्यायचंय ???
-(मास्तरच्या लहरीपणाचा अनुभव असलेला) टारझन
25 Sep 2009 - 8:10 pm | श्रावण मोडक
कालच्या बातमीवर आत्ता ही टिप्पणी तुमची... ;)
25 Sep 2009 - 8:19 pm | विजुभाऊ
हल्ली गॅरी हुजूरीदर्ग्यावर नवस फेडायला येतो?
25 Sep 2009 - 8:21 pm | विनायक प्रभू
अहो श्रामो नुस्त हसताय का?
काय ते सांगा की?
25 Sep 2009 - 8:52 pm | श्रावण मोडक
प्रतिबिंब हो प्रतिबिंबच!!!
25 Sep 2009 - 8:35 pm | घाटावरचे भट
>>मी मुलांना मार्क कसे वाढवायचे ते सांगतो(परफॉर्मन्स)
तुम्ही मुलांना ग्यारीने दिल्यात त्याच टिप्स देता का? आणि मुलं ऐकतात का (मुलं बहुधा ऐकतीलच ;), त्यांच्या आईबापांचं काय?)? :-?
25 Sep 2009 - 8:38 pm | प्रभो
मास्तर, मला टिपा हाव्यात..टिप नको.. :)
--(मास्तरचा शिष्य) टिपर्या प्रभो
25 Sep 2009 - 8:35 pm | निमीत्त मात्र
इथली चर्चा पाहिलीत का मास्तर? मला वाटतय तिथल्या काही खट्याळ प्रतिसादांमूळेच तुम्हाला हा प्रश्न विचारला जातोय :)
25 Sep 2009 - 11:05 pm | अवलिया
नवरात्राचे उपवास कडक दिसतायत.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
25 Sep 2009 - 11:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
इंटरनेटवरच वाचा ना पेपर.
नुस्तं त्याच्या नावाने गुगलला प्रश्न विचारा आणि पहिलीच बातमी पहा, उत्तर मिळेल.
अवांतरः कर्स्टनच्या त्या टिप्पणीवरून (काही) मिपाकर तुम्हाला विचारणार असतील तर त्यांचं जग फार लहान आहे असं समजायला हरकत नाही. किंवा तुमचे मिपाकर मित्र नेहेमीप्रमाणे टवाळी करत आहेत. एवढं काही मनाला लावून नका घेऊ!
अ-दिती
26 Sep 2009 - 9:08 am | विनायक प्रभू
टारझन?
26 Sep 2009 - 10:02 am | वेताळ
टारझन ला क्रिकेट खेळायला व पहायला आवडते.त्यात अनुभवाची गरज काय?
वेताळ
26 Sep 2009 - 10:02 am | वेताळ
टारझन ला क्रिकेट खेळायला व पहायला आवडते.त्यात अनुभवाची गरज काय?
वेताळ