रान

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
25 Sep 2009 - 9:05 am

ज्याच्या सावलीचा धरावा विश्वास
विषवल्ली कवटाळे त्या वृक्षास
जळला मोहर, झडली पालवी,
दिसे रिता, पर्णहीन तो भकास

विषवल्ली तरारली, फोफावली,
वाढत चालली; वेढत चालली
घनदाट गर्द हिरव्या रानाला,
एकेका वृक्षाची गिळत सावली

रान कुठे आता? उद्ध्वस्त स्मशान
घोंघावतो वारा एकटा बेभान
उघडे-बोडके निष्पर्ण सांगाडे
फांदीफांदीवर भुतांचे थैमान

क्षणात अवघे चित्र पालटेल
वठल्या वृक्षाला धुमारा फुटेल
मिटतील विध्वंसाच्या खाणाखुणा,
पुन्हा रानात या गारवा दाटेल

मन रान, विषवल्ली अहंभाव
वेड्या, कर तिचा वेळीच पाडाव
जाळ तिची बीजं, तोड तिच्या फांद्या,
आणि जिंकून घे आयुष्याचा डाव

करुणशांतरसकविता

प्रतिक्रिया

विशाल कुलकर्णी's picture

25 Sep 2009 - 10:42 am | विशाल कुलकर्णी

"मन रान, विषवल्ली अहंभाव
वेड्या, कर तिचा वेळीच पाडाव
जाळ तिची बीजं, तोड तिच्या फांद्या,
आणि जिंकून घे आयुष्याचा डाव "

खरय, नेमकी वेळ साधणे महत्वाचे. ती हातातुन निसटली की मग केवळ पश्चाताप करणेच हातात राहते.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

श्रावण मोडक's picture

25 Sep 2009 - 12:29 pm | श्रावण मोडक

विचारात टाकणारी.

अविनाश ओगले's picture

25 Sep 2009 - 8:41 pm | अविनाश ओगले

फक्त उध्वस्त हा शब्द उद्ध्वस्त असा लिहायला हवा.

क्रान्ति's picture

26 Sep 2009 - 8:25 am | क्रान्ति

चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! संपादन केलं आहे. :)

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

अन्वय's picture

26 Sep 2009 - 12:24 am | अन्वय

शेवटचा आशावाद
आवडला.
छान जमलीय कविता

सुबक ठेंगणी's picture

26 Sep 2009 - 8:33 am | सुबक ठेंगणी

असंच म्हणते.
"वाढत चालली...वेढत चालली" ही शब्दरचना खूप आवडली :)

दशानन's picture

26 Sep 2009 - 9:29 am | दशानन

छान कविता.

***
राज दरबार.....

श्रीकृष्ण सामंत's picture

26 Sep 2009 - 6:07 am | श्रीकृष्ण सामंत

मझा कोकण आठवला

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

सहज's picture

26 Sep 2009 - 10:40 am | सहज

मला मायकेल जॅक्सनचे अर्थ गाणे आठवले.

सोनम's picture

27 Sep 2009 - 12:53 pm | सोनम

कविता आवडली. खुपच छान होती.