मिपाकरहो,
पुण्यापासुन १५०-२०० कि मी पर्यंतच्या परीसरातील समुद्र किनारे आणि तिथली व्यवस्था (खाणे-पिणे समग्र) अशी माहीती मिळेल का?
अलिबाग, श्रीवर्धन, दिवेआगर, हरी-हरेश्वर, मुरुड-जंजिरा, दापोली, मालवण, रत्नागिरी आदी भाग सोडुन, म्हणजे हे जगद्विख्यात किनारे बघुन झाले आहेत, इथे २-३ ट्रीप झाल्या आहेत. आता जरा हटके, जरा शांत असा किनारा हवा आहे. गावापासुन जरा लांब असला तरी चालेल, खाण्याची-रहाण्याची बरी व्यवस्था असली तर उत्तमच !!
कोलाडची माहीती कळली होती, पण कोलाडला बीच आहे का?
प्रतिक्रिया
25 Sep 2009 - 11:13 am | हर्षद आनंदी
१ ही प्रतिसाद नाही :S :S :S
बहिष्कार समजायचा का? :T :O :T :O
वाट बघतोय 8> 8> 8> 8> 8> 8> 8>
25 Sep 2009 - 11:17 am | विशाल कुलकर्णी
वर दादर चौपाटी, जुहु चौपाटी, मरिन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, वरळी सी फेसचा उल्लेख नाहीये.....! ;-)
बघायचे असल्यास स्वतःच्या जबाबदारीवर येणे. हां... राहण्या खाण्याच्या सोयीसाठी खारघरमध्ये कुलकर्ण्यांची मोफत खानावळ आहे. :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
25 Sep 2009 - 2:14 pm | प्रशांतकवळे
कोलाड ला बीच नाहीय..
अलिबाग जवळचे नागाव, किहिम, काशिद बघा..
प्रशांत
25 Sep 2009 - 3:00 pm | येडा अण्णा
किहीम बीचच्या जवळ आवास नावाचा बीच आहे. अतीशय छान आणी स्वच्छ बीच आहे. राहण्याची सोयही उत्तम आहे. महत्व्हाचे म्हणजे गर्दि नसते अजीबात.
25 Sep 2009 - 4:48 pm | सूहास (not verified)
मी अजुन गेलो नाही पण पुढच्या महिन्यात प्लान केला आहे..
बाकी गुगलल्यावर बरच काही मिळेल..
सू हा स...
25 Sep 2009 - 4:50 pm | प्रसन्न केसकर
तिथे एमटीडीसी चे गेस्ट हाऊसपण आहे. बुकिंग पुण्यातुन तसेच मुंबईतुन होते.
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
25 Sep 2009 - 4:57 pm | विशाल कुलकर्णी
मालवण पाशी तारकर्लीला छान समुद्रकिनारा आहे, राहण्याचीही उत्तम सोय आहे.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
25 Sep 2009 - 9:22 pm | घाटावरचे भट
कोळथरे - आडवाटेवरचं गाव आहे. मोबाईलची रेंजही नाही गावात. पण किनारा अत्यंत सुंदर आहे म्हणतात. शहरी / नेहेमीच्या पर्यटनविषयक सुविधा गावात नाहीत.
दापोलीजवळ हर्णै-मुरूड-कर्दे-केळशी असा समुद्रकिनार्यांचा पट्टा आहे त्यातलेही सगळे किनारे बघण्यासारखे आहेत. पैकी मुरुडला (हे जंजिरावालं मुरुड नव्हे. हे धोंडो केशव कर्व्यांचं मुरुड. इथेच बहुधा कनकादित्य नावाचं सूर्याचं मंदिर आहे. छान आहे.) यमटीडीसीचं हाटेल आहे. कर्द्याला मी गेलो होतो तेव्हा ३-४ प्रायव्हेट हाटेलं होती, आता ठाऊक नाही किती आहेत. केळशीबद्दल पण ठाऊक नाही. हर्णै बंदर मासेमारीचं बंदर आहे. ताजी ताजी मासळी मिळते.