मी काही दिवसांपासून एक विचार करतोय......
आपल्या भारताचे खरे मित्रदेश कोणते?
अमेरिका? तिचं इथे नांव काढू नका!!!! जरा मिपाची मागली पानं चाळून पहा!!! पार ठाण्यापासून ते थेट जाकार्तापर्यंत अमेरिकेला जहाल शिव्या दिलेल्या आढळतील!
एक सिंडी सोडली (म्हणजे तुम्ही सोडली आणि आम्ही धरली!!!) तर त्या अमेरिकेत आहेच काय?
मग मरो! ती अमेरिका जावो **त!
इंग्लंड आणि इतर पश्चिम युरोपीय देश? ते तर अमेरिकेचीच तळी उचलणार! लाचार साले!!!!!
चीन आणि पाकिस्तान! ते तर आपले उघड उघड शत्रूच म्हणायचे!!!
मग मला प्रश्न पडला की भारताचे खरेखुरे मित्र तरी कोणते?
बांगलादेश? तो तर आपल्या देशात त्याचे नागरीक घुसवतोय.....
नेपाळ? तो तर दहशतवाद्यांना आसरा देतोय....
श्रीलंका? त्यांनीच ना आपले १००० सैनिक मारले राजीव गांधींच्या काळात....
ब्रम्हदेश? शूऽऽऽ!!! मोठ्याने बोलूही नका!!! ते हुकुमशहा आपले दोस्त? जगात काय इज्जत राहील आपली?
मॉरिशस आणि आफ्रिकी देश? त्यांच्या मैत्रीला कोण विचारतंय? साली असून अडचण नसून खोळंबा!!!!
रशिया? त्यांना त्यांचंच जड झालंय, ते भारताशी काय भरीव मैत्री करणार?
जपान? आम्ही चार अणुबॉम्ब काय फोडले, हे आमचा छाती पिटून निषेध करायला लागले....
ऑस्ट्रेलिया? ते तर आमच्या लोकांना बडवतायत!!!!
मग मला सांगा, भारताचे मित्रदेश तरी कोणते?
आमचा तर काय भेजा चालत नाही....
तुम्हीसांगा...
सांगा मिपाकर मंडळींनो.....
(टीपः भूतान वगैरे सांगू नका हां गड्यांनो!! ज्या देशांच्या **त दम आहे असे देश सांगा!!!!:))
प्रतिक्रिया
23 Sep 2009 - 10:57 am | श्रावण मोडक
पिडां, तुमच्यासारखीच माझीही स्थिती आहे. सबब मत देत नाही. मतं काय येतात तीच पाहू.
सवाल भन्नाट!
23 Sep 2009 - 8:11 pm | धनंजय
विचार करायला लावणारी मांडणी.
प्रतिसाद उत्सूकतेने वाचतो आहे.
"मित्र"देशाकडून आपली काय अपेक्षा असते, असे निकष शक्यतेच्या विश्वात कोण्याही देशाला असू शकतात का? याबद्दल प्रतिसादक काही लिहितील अशी अंधुक आशा आहे, पण बहुधा फळणार नाही.
23 Sep 2009 - 11:00 am | विंजिनेर
मॉरिशस, मादागास्कर, टिंबक्टू इ. इ.
बाकी, कौल पापूलर होनार हे भविष्य लिहून घ्या (नाडीशिवाय सांगतो आहे ;) )
23 Sep 2009 - 11:10 am | सखाराम_गटणे™
पृथ्वीवर वरील देश जुने झाले.
आम्ही चंद्राचा - मंगळाचा विचार करतो.
तिथे कोणते देश आहेत हे समजले की लिहीनच येथे.
23 Sep 2009 - 11:14 am | पिवळा डांबिस
एक डबडं चंद्रावर टाकलं म्हणजे तिथे मुलांबाळांसकट स्थाईक झालं असं नाही....
तेंव्हा सध्या इथलाच विचार करणं उत्तम....
23 Sep 2009 - 11:16 am | अवलिया
ओ मालक.. आय्ओयु चं बघा आधी.... तिथलं..मग बघा इथलं ;)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
23 Sep 2009 - 11:18 am | पिवळा डांबिस
और मेरी एक चांदणी लागू...
आयओयूचा आणि भारताच्या मित्रांचा संबंध काय?
23 Sep 2009 - 11:19 am | अवलिया
माझी एक चांदणी लागु...
कशाबद्दल ते मी कशाला सांगु...
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
23 Sep 2009 - 11:27 am | सखाराम_गटणे™
मालक, 'डबडं ' तर खरे मुख्य आहे जीवणात.
ऐनवेळी 'डबडं' सापडले नाही की कसे वाटते ते पहा.
तीच खरी निशानी आहे.
24 Sep 2009 - 10:58 am | सखाराम_गटणे™
चंद्राच्या वहीवाटीचा ७/१२ कुठे मिळु शकेल?
तुमच्या देशात ७/१२ असतो का?
25 Sep 2009 - 5:32 am | शेखर
वहिवाटीसाठी चंद्रावर ७/१२ चि गरज नाही. डबड घेऊन जात आहेस तर जेवढा भाग पाहीजे आहे तेवढ्या भागा भोवती रांगोळी काढ. :)
शेखर
23 Sep 2009 - 3:25 pm | विजुभाऊ
मित्र कशाला हवेत.
आत्मैव ह्यात्मनो बन्धु ह्यात्मैव रीपुरात्मना.
या उक्तीने चालले तर कोणी काही बिघडवु शकत नाही.
तो ब्रम्हदेश / उत्तर कोरीया /इराण यांचे कोणी काही बिघडवु शकलेले नाही.
आजच्या काळात तुमचे मित्र कोण हे तुमच्याकडून त्यांचा फायदा काय आहे किंवा तुमचे उपद्रव मूल्य काय आहे यावर अवलम्बून आहे.
अन्यथा अमेरीका कशाला त्या फालतू पाकिस्तानला जवळ करेल?
अमेरीकेच्या बर्याच कंपन्या इतर देशात आहेत त्यांच्या फायद्यासाठी अमेरीकन सरकार बरेच काही करत असते. विशेषतः तेल कंपन्या.
भारताने बाजार पेठ थोडी ताणून धरली तर अमेरीका नाक मुठीत धरून शरण येते किंवाथेट हल्ला करते.
इराकवर नक्की कशासाठी हल्ला केला हे बुश४३ काकाना विचारा म्हणजे याचे उत्तर मिळेल.
सद्दामने कुवेत पादाक्रान्त करताच विमाने आणि अस्त्रे सोडणारे तिबेटबाबत इतकी वर्षे मूग गिळून बसले आहेत.
तिबेट्मध्ये तेल मिळत असते तर त्याना लगेच लोकशाही आणि तीची परवड आठवली असती आणि जगाचे तारणहार बनून आकाशात झेपावले असते.
भारताला मित्र हवे असतील तर भारताने आपली उपद्रवक्षमता सिद्ध करायला हवी
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
24 Sep 2009 - 2:39 am | विकास
भारताला मित्र हवे असतील तर भारताने आपली उपद्रवक्षमता सिद्ध करायला हवी
आपल्या देशाला आणि (किमान सध्याच्या) सरकारला गांधीवाद जवळचा आहे असे ते या ना त्या रुपाने सांगत असतात. आणि असे वागणे हे गांधीवादाच्या विरोधात आहे. शिवाय आपण आपली उपद्रवक्षमता ही अंतर्गत वापरण्यात तरबेज आहोत. बाहेरचा संबंध आला की, "मेहमा जो हमारा होता है, वो जानसे प्यारा होता है" असेच म्हणणे पसंद करतो.
24 Sep 2009 - 6:29 am | सुधीर काळे
वाssssssssव! जीते रहो, विकास! अगदी मर्मावर बोट ठेवलं तुम्ही!! अगदी "पतेकी बात" सांगितलीत.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
23 Sep 2009 - 11:14 am | अवलिया
तुम्ही अजुन सूर्याच्याच ग्रहमालेत अडकले म्हाराज ! अशा शेकडो आकाशगंगा आणि करोडो ग्रहमाला आहेत. चंद्र मंगळ जूने झाले.
थिंक बिग मॅन !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
23 Sep 2009 - 11:30 am | सखाराम_गटणे™
काय करणार, आमची नाडी येथील तमिळ भाधेत आहे ना.
एकदा मंगळावरील भाढेत नादी मिलाळी की करु फुढचा विचार
23 Sep 2009 - 11:12 am | अवलिया
तुम्ही विचार करु शकता ? अरे वा ! ;)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
23 Sep 2009 - 11:16 am | पिवळा डांबिस
हे तुम्ही आम्हाला विचारतां? अरे वा!!!!
आम्ही अजून आमच्या प्रतिबिंबाशी गप्पा मारायला सुरवात केलेली नाही!!!!
:)
23 Sep 2009 - 11:17 am | अवलिया
हॅ हॅ हॅ
आम्हाला बाकी काही माहिती नाही पण एक माहिती आहे पिडाचा अवलिया आणि अवलियाचा पिडा मित्र आहे... तेव्हा बाकी दुनिया फाट्यावर.. कसे ?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
23 Sep 2009 - 11:20 am | पिवळा डांबिस
जणू एकमेकांची प्रतिबिंबच म्हणाना...
:)
23 Sep 2009 - 11:21 am | अवलिया
:)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
23 Sep 2009 - 11:33 am | मदनबाण
ह्म्म...आपल्या देशाने आपल्या आजुबाजुच्या देशांशी चांगले संबंध ठेवुन असायलाच हवे...पण तसे काही दिसत नाही,कारण जर तसे असते तर त्यांच्या देशातुन आपल्या देशात घुसखोरी,आपल्या विरुद्ध कारवाया आणि बनावट चलन बनवण्याचे धंदे फोफावले नसते...नेपाळ-चीन मैत्री ही आपल्या देशाला नंतर तापदायक ठरणार आहे...तेव्हा आत्ताच काहीतरी उपाय केले पाहिजे...श्रीलंकेशी उत्तम संबंध ठेवणे ही देखील काळाची गरजच आहे.
स्वतःची शक्ती वाढवली की दुसर्यावर अवलंबुन राहण्याची गरज राहणार नसली तरी उत्तम मित्र देखील हवाच हवा.
(आपले इस्त्रायलशी संबंध कसे असावेत बरे ? :?)
मदनबाण.....
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
ISRO to launch 7 satellites in 20 minutes
http://www.timesnow.tv/videoshow/4327992.cms
Navy gets UAVs to counter sea threat
http://www.timesnow.tv/videoshow/4327991.cms
23 Sep 2009 - 11:41 am | पिवळा डांबिस
आपले इस्त्रायलशी संबंध कसे असावेत बरे ?
दोघांनाही एकेमेकांपासून घेता येण्यासारखं बरंच आहे....
पण मोठ्यानं बोलू नका बरंका! आपले लाडके अरब देश रागावतील!!!!
:)
24 Sep 2009 - 7:34 am | सुधीर काळे
खरं तर अरब राष्ट्रांनी सर्व बाजूंनी वेढलेला असतानासुद्धा अद्याप तग धरून असलेला देश म्हणून इस्रायलशी मैत्री करायला हरकत नसावी. नवे प्रयोग करून वाळवंटातही शेती पिकविणारा, अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा निर्माता व पिटुकला असला तरी धिटुकला असा हा देश आपल्याला खूप काही शिकवून जातो.
पण या "नळ्या"बरोबर एक "गाडा"ही येतो. त्यामुळे इस्रायलशी मैत्री म्हणजे अमेरिकेशीही मैत्री आलीच. पण अमेरिका इतकी आपल्या चीन-पाकिस्तानसारख्या "सख्ख्या" वैर्यांबरोबरच्या नात्यात गुरफटली आहे कीं तिचे डोके कुठे आहे व पाय कुठे आहेत हेच कधी-कधी कळत नाहीं. त्यामुळे हा सर्व प्रकार जरा कठीणच वाटतो.
खरं तर दोन निखळ लोकशाही राष्ट्रे म्हणून आपली नैसर्गिक गट्टी असायला हवी, पण अमेरिकेला स्वतःच्या देशात लोकशाही लागते व परदेशात त्यांच्या सोयीच्या कुठल्याही "शाही"ला ते पाठिंबा देतात. अगदी अयुब खानापासून ते मुशर्रफपर्यंत, मार्कोसपासून सुहार्तोपर्यंत व सौदी राजघराण्यापासून ते मध्य-पूर्वेतले सगळ्या अमीरां-शेखांपर्यंत. म्हणूनच जरा वांदा आहे.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
23 Sep 2009 - 11:47 am | भोचक
पिडा तुम्ही म्हणताय ते खरंय. आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांचे काही स्थान आहे,अशी मंडळी आपल्या बाजूने दिसत नाहीयेत हे खरंय. काही फुटकळ (आकार, ताकद या दृष्टिने) पण स्ट्रॅटेजिकली महत्त्वाचे काही देश मित्र म्हणावेत असे आहेत. त्यात अफगाणिस्तान, ताजिकीस्तान हे आहेत. नुकताच आपण मंगोलियाशी अणू करार केलाय. युरोपीय देश अमेरिकेच्या कच्छपी लागलेले असले तरी त्यात फ्रान्स आपल्या बाजूचा वाटतोय. ब्राझीलशीही आपले चांगले संबंध आहेत. पण मोठी म्हणता येतील अशी राष्ट्रे आपल्या बाजूने नाहीत, हे पटतंय. पंडित नेहरूंच्या तटस्थ देशांची चळवळ सुरू करण्याचा उद्देश अशा फुटकळ, अविकसित राष्ट्रांचीच एक ताकद तयार करण्याचा असावा. पण तो पूर्णत्वास गेला नाही हे दिसतेच आहे. शिवाय त्यातल्या चीननेच आपल्यावर आक्रमण केले. आता नव्याने ब्रिक म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना असा प्रयत्न होतोय, पण यातल्या चीनशी आपले संबंध पहाता, त्याला कितपत अर्थ आहे हा प्रश्न आहेच. थोडक्यात एवढी मांडणी करूनही बाकी शून्यच येतेय.
(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
हा आहे आमचा स्वभाव
23 Sep 2009 - 11:52 am | सहज
मोठा गहन प्रश्न आहे खरा. एकेकाळी बळचकर रशिया म्हणून खूश होत होतो :-) आता काय? :-(
असो मित्र बित्र कोणी नसते. असतात केवळ युत्या, काळ वेळ बघुन केलेल्या!
23 Sep 2009 - 11:55 am | मिसळभोक्ता
लय भारी रे पिडां !
पितृभू, पुण्यभूश्चैव वाले लोक उद्या सकाळी उगवतील, त्यांच्या वैचारिक दारिद्र्यपूर्ण प्रतिसादाची वाट पाहतो. तोपर्यंत, तू वैचारिक लिहितोस, त्यामुळे अत्यंत ब्राम्हणद्वेष्टा आहेस, त्यामुळे उपक्रमाच्या संपादकमंडळावर जाण्याच्या लायकीचा आहेस, हे सांगून ठेवतो.
अष्टविनायका तुझा महिमा कसा !
-- मिसळभोक्ता
23 Sep 2009 - 1:36 pm | विसोबा खेचर
मिभो, लेका तुला विन्या चावलेला दिसतोय! थांब, दोघाचीही नावं प्रियालीला सांगतो! :)
आपला,
(प्रियालीचा मित्र) तात्या.
25 Sep 2009 - 4:51 am | पिवळा डांबिस
तोपर्यंत, तू वैचारिक लिहितोस, त्यामुळे अत्यंत ब्राम्हणद्वेष्टा आहेस,
आँ? हे काय बॉ नवीन?
काकांमध्ये गफलत झाली काय?:)
ब्राम्हणद्वेश्टा?:)
आजवर आमच्या एकंदर अवताराकडे बघून आम्ही कोकणस्थ ब्राम्हण (खरे तर तो दोन अक्षरी ज्वालाग्राही शब्द!!) आहोत का असं अनेक जणांनी विचारलंय. (मग आम्ही त्यांना बांगड्याच्या हुमणाची रेसेपी वर्णन करतो ते सोडा!!!:))
पण आयच्यान सांगतो, आम्हाला आजवर कोणीच ब्राम्हणद्वेष्टा म्हणालेलं नाही हो!!! आज तुम्ही पहिल्यांदाच!!!!:(
कशामुळे तुम्हाला असं वाटलं? आमच्या आडनावामुळे का? ते आमचं आडनांव नेहमी मार खातंय बघा....
आम्ही तर आता ते नांव बदलून "नेने" नांव घ्यायचं ठरवतोय बघा...
फिरंग्यांना उच्चारायलाही सोपं...
आणि तेव्हढीच (आपल्या) माधुरीशी जवळीक!!!
आमचा त्या मुलीवर भारी जीव हो!!!!
:)
25 Sep 2009 - 10:07 am | चतुरंग
पिडांना लई भारी गुगली पडलाय! अहो पिडा ह्या वाक्याला वेगळाच आंतर्जालीय संदर्भ आहे!
मिसळपाव बरोबरच तुमचा दुसर्या कुठल्या मराठी संस्थळावर जाण्याचा 'उपक्रम' असेल तर येईल कदाचित लक्षात! ;)
(मिसळक्रमी)चतुरंग
24 Sep 2009 - 1:42 am | निमीत्त मात्र
पितृभू, पुण्यभूश्चैव वाले लोक म्हणजे कोण हो? ;)
24 Sep 2009 - 3:25 am | प्रियाली
भलतेच जात्यांध बॉ तुम्ही मिसळभोक्ते, तुम्हाला धम्मकलाडूच द्यायला हवा. ;) पण तरीही तुमच्या बौद्धिक प्रामाणिकपणाचे कौतुक वाटले.
24 Sep 2009 - 3:28 am | मिसळभोक्ता
म्हणजे जे प्राच्यविद्या संस्थेच्या विनाशावर टपलेले आहेत ते ?
-- मिसळभोक्ता
24 Sep 2009 - 3:30 am | प्रियाली
कृपया, विनाश वगैरे शब्द वापरू नये. कोणत्याही शब्दांची पहिली अक्षरे विना असतील तर "विना"कारण अनेकांना त्रास होतो असा अंदाज आहे.
23 Sep 2009 - 11:59 am | दिलीप वसंत सामंत
मित्र ? ते फक्त बलदंडानाच असतात शेळपटाना नाही. आपल्या देशाने परकीय राष्ट्राशी संबंधित अशा कोणत्या बाबतीत स्वतःचे अस्तित्व,
ताकद दाखवून दिली आहे ? चीन, अमेरिका यांची पाकिस्तान ला मदत, ऑस्ट्रेलियातील हल्ले, पाकिस्तानातून येणारे दहशतावादी, घुसखोर, मल्टीनॅशनल कंपन्यांची दादागिरी, चीनचे रोजचे नवे नवे दावे, इ. इ.
23 Sep 2009 - 12:09 pm | सखाराम_गटणे™
>>मित्र ? ते फक्त बलदंडानाच असतात शेळपटाना नाही.
चुक.
पाकिस्तान कोण बळकट आहे.
पण त्याचे उपद्रव मुल्य चांगले आहे.
23 Sep 2009 - 12:37 pm | समंजस
या पृथ्वी वर असलेल्या कुठल्याही बलदंड (आर्थिक/सामरीक दृष्टीने) देशाला भारता सोबत मैत्री करण्याची गरज नाही. त्यांच काहीही अडत नाही/बिघडत नाही. आणी ह्याच मुळे असला कुठलाही देश भारताचा मित्र नाही/होणार नाही. फक्त असलेच देश काय, इतर लहान/दुर्बल देशही भारताला मित्र मानत नाही. उदा. नेपाळ, श्रीलंका, भुतान, बांगलादेश. जेव्हा केव्हा संधि मिळते तेव्हा हे देश सुदधा भारताला धमकी द्यायला कमी करत नाही. बांगलांची घुसखोरी, नेपाळ माओवादींची पशुपतीनाथ मंदिरातील भारतीय मुळाच्या पुजार्यांना मारहाण, श्रीलंका सरकार कडुन हजारो तामिळांची अटक, परवड आणी या बाबत असलेल्या युनो/भारत च्या आक्षेपांना काहीच भिक न घालणे हे तर आपण बघतच आहोत. इतर सर्व देशांना माहीत आहे की भारत देश फक्त निषेध नोंदवण्या पलीकडे काहिच करू शकत नाही. भारताचे कोणीच मित्र नाही. मैत्री केल्या जाते ती बरोबरच्या किंवा स्वता: पेक्षा मोठया(आर्थिक/सामरीक दृष्टीने) असलेल्या व्यक्ती (देश) सोबत.
कुठला देश मुर्ख आहे? :|
23 Sep 2009 - 12:14 pm | अभिजा
माझ्या मते तिबेट आणि नेपाळ हे भारतवर्षाचे जुने मित्र आहेत. संस्कृती मिळती-जुळती आहे, आणि भारताची अनेक आध्यात्मिक, सांस्कृतिक मुळं तिथे रुजली आहेत. पण आता वेगळीच समस्या भेडसावत आहे. आपले मित्र देश कोणते आहेत हा मुद्दा फारसा गंभीर नाही. आपली मित्र 'राज्य' कोणती आहेत हे तपासणे आता गरजेचे वाटू लागले आहे. देशाभोवती एकच कुंपण आहे म्हणून अखंड देश म्हणायचे. अन्यथा उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दक्षिण भारतातील काही राज्ये, ह्यां मध्ये आपापसात किती स्नेह आहे हे आपण जाणतोच. जोवर आपण आपल्याच डोळ्यातील मुसळ पाहात नाही, तो पर्यंत दुस-यांच्या डोळ्यातील कुसळ शोधणे व्यर्थ आहे असे वाटते.
23 Sep 2009 - 12:39 pm | विशाल कुलकर्णी
राजकारणात (मग ते राष्ट्रीय असो वा आंतर्राष्ट्रीय) कोणीही कायमचा मित्र नसतो किंवा कायमचा शत्रुही नसतो. (अपवाद चीन आणि पाकसारखे देश) इथे प्रत्येक जण परिस्थितीनुसार, आपापल्या स्वार्थानुसार आपला स्टान्स बदलत राहतो. :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
23 Sep 2009 - 12:44 pm | नंदन
अहो गरजच काय म्हणतो मी? सिंह कधी कळपाने शिकार करतो का? आम्हांला कोणाच्याही मैत्रीच्या भिकेची गरज नाही. आम्ही सिरियस, अल्फा सेंच्युरी आणि अँड्रोमेडालाही फाट्यावर मारतो.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
23 Sep 2009 - 12:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हा प्रतिसाद, त्याचं शीर्षक नक्की कोणत्या भाषेत आहे? कदाचित वाचण्यासारखा असला तरी इंग्रजीच्या प्रभावाखाली असलेल्या मराठीमुळे झोप आली ... सबब प्रतिसाद वाचला नाही, त्यामुळे अवांतराचं बीज टाकून जात आहे!
(सिरीयस - व्यास, अल्फा सेंच्युरी - मित्रतारा, अँड्रॉमीडा - देवयानी असे मराठी शब्द हे अनिवासी लोकं का वापरत नाहीत कोण जाणे!)
23 Sep 2009 - 12:56 pm | श्रावण मोडक
खरं तर हिला किंवा नंदनला काय म्हणायचं आहे हे समजलेलंच नाही. म्हणूनच +१. असंच लिहित रहा. ;)
23 Sep 2009 - 12:59 pm | अवलिया
मोड्कांनी प्रतिसाद का दिला आहे कळले नाही पण त्यांचे कधी चुकत नाही. म्हणुन सहमत
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
23 Sep 2009 - 1:00 pm | निखिल देशपांडे
अतिशय चांगले अवांतर प्रतिसाद
नंदन ह्यांनी त्यांचा नेहमीच्या पद्धतीने प्रत्येक शब्दाचा विकी (wiki) चा दुवा दिला असता तर अहुन ज्ञानात भर पडली असती.
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
23 Sep 2009 - 12:57 pm | llपुण्याचे पेशवेll
वा वा. नंदन आणि अदिती तुमचे प्रतिसाद वाचणे ही एक मेजवानीच असते. तुमच्या अवांतरातूनही बरीच माहीती मिळते. छान छान असेच अवांतर लिहीत रहा.
पुण्याचे पेशवे
23 Sep 2009 - 1:02 pm | श्रावण मोडक
वा वा. नंदन आणि अदिती तुमचे प्रतिसाद वाचणे ही एक मेजवानीच असते. तुमच्या अवांतरातूनही बरीच माहीती मिळते. छान छान असेच अवांतर लिहीत रहा.
असेच बोल्तो. काय लिहावे हे सुचत नव्हते म्हणून आधी फक्त +१ लिहिले होते.
23 Sep 2009 - 9:42 pm | सुधीर काळे
कुठल्याही फोरमवर पहा! कुणी ना कुणी निवासी भारतीय अनिवासी भारतियांवर घसरत असतो! कधी मातृभूमीची सेवा करण्याऐवजी आम्ही परकीयांची सेवा करत आहोत म्हणून बोल लावतात, तर कुणी आम्हाला डॉलर-हंटर म्हणून हिणवतात, तर कधी आम्ही कांही इंग्रजी शब्द वापरले तर कधी चुकीचे मराठी लिहिले म्हणून (श्री. नंदन अनिवासी भारतीय आहेत कां?), किंवा कधी आणखी काही कारणाने. जणू काही निवासी भारतियांच्या घरी देवी सरस्वती (मराठी शारदा) कायम वावरत असते.
आम्ही अनिवासी भारतीय आम्हाला मराठी नीट न येण्याचं समर्थन तरी करू शकतो (करत नाही, पण करू शकतो) कारण आम्हाला निवासी भारतियांइतकं चांगलं, अर्वाचीन व दर्जेदार मराठी वाचायला मिळत नाहीं. पण निवासी भारतियांच्या वाईट मराठीला काय समर्थन आहे?
तरी असं उगाच घसरू नये.
ज्यांचं मराठी चांगलं आहे ते कुठेही गेले तरी चांगलंच लिहितात (उदा. सुबक ठेंगणी), पण आमच्यासारखे काही लोक जरासे "१९-२०" प्रतीचं मराठीच लिहितात व लिहीत रहाणार. आम्ही भारतात राहिलो असतो तरीही आमचं मराठी असं "१९-२०"च राहिलं असतं कारण मूलतः मराठी साहित्याऐवजी इंग्रजी साहित्य वाचायचा आमचा शौक. पण ही तर आपली-आपली पसंतीची गोष्ट आहे.
मुख्य मुद्दा हा कीं आमचं मराठी चांगलं नसण्याचा व आम्ही अनिवासी भारतीय असण्याचा काहीही संबंध नाहीं.
आमचं मराठी पुरेसं चांगलं नसेल व मराठी भाषेवरील प्रभुत्वाच्या न्यूनतम पात्रतेचा (minimum qualification) काही दंडक (norm) असेल आणि आम्ही त्या दंडकरेषेच्या खाली असू तर तात्यासाहेबानी आमचे सभासदत्व जरूर रद्द करावे. आमची काही तक्रार नाही. (तात्यासाहेब. कृपया यावर कृती करा)
तरी जरा सबूरीनं घ्यावं.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
24 Sep 2009 - 1:55 am | घाटावरचे भट
माझ्या मते अल्फा सेंच्युरी नव्हे तर अल्फा सेंटॉरी - मित्रतारा आणि सिरियस - व्याध असं हवं, नाही का?
घ्या, एक दुवा पण दिला. अर्थात नंदनरावांइतका आमचा व्यासंग नसल्याने आम्हाला एकच दुवा सापडला. बाकी दुव्यांसाठी विनोद दुआंना भेटा.
24 Sep 2009 - 10:05 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मित्र भट, अंमळ चूकच झाली टंकताना! चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल आपले आभार.
आमचं आणि विनोदाचं वावडंच, पण तरीही दुव्यांना विरोध नाही. हा घ्या देवयानी दीर्घिकेचा आणि हा घ्या मित्रतार्याचा दुवा.
(भटोश्रीची मैत्रिण) अदिती
23 Sep 2009 - 1:02 pm | दिपक
म्हणजे सर्वात मोठ्या ताऱ्याचे नाव ’फाटा’ आहे तर.!
:)
23 Sep 2009 - 1:18 pm | भोचक
यासंदर्भात इथे छान लेख आहे. विषय काहीसा अवांतर वाटला तरी भारत-चीन-पाकिस्तान विषयी आहे. चीनला आशियात सत्ता समतोल राखायचा आहे. त्यासाठी पाकिस्तान त्यांना हवा आहे. बाकी त्यांना पाकशी दोस्तीत काहीच रस नाही. थोडक्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर मैत्री वगैरे परस्पर फायद्यावरच जास्त ठरते.
जमल्यास हेही वाचा.
(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
हा आहे आमचा स्वभाव
23 Sep 2009 - 1:42 pm | चिरोटा
सहमत. ह्या मैत्रीमागे केवळ संबंधीत राष्ट्रापासुन होणारा फायदा लक्षात घेतला जातों. नितीमुल्ये,नैतिकता वगैरे आंतराष्ट्रीय राजकारणात गुंडाळून ठेवलेली असते(बर्याच वेळा ती ठेवावी लागते).अमेरिकेचेच उदाहरण घ्या-२० वर्षापुर्वीपर्यंत रशियाविरुद्ध लढणारे अफगाणी 'लढवय्ये,मुजाहुद्दीन' होते.९/११ नंतर Clash of civilization/they hate us वगैरे थियर्या पुढे आल्या.(अमेरिकेला घातलेली ही शेवटची शिवी!!!!)
भारताचे परराष्ट्र धोरण दुसर्या राष्ट्रात नाक न खुपसणे आहे. निदान असे ते म्हणतात तरी.!! जगात लोकसंख्येने दुसर्या असलेल्या भारताला पेट्रोल पुरवणार्या अरब राष्ट्रांशी पंगा घेवून चालणार नाही.जगातील बहुतांशी देश तसे संबंध ठेवूनच आहेत.
बरेच आहेत.ज्या राष्ट्रांत भारतियाना प्रवासी व्हिसा सहज मिळतो ती राष्ट्रे भारताची मित्र मानायला हरकत नाही. अमेरिका,रशिया,ब्रिटन,कॅनडा ,फ्रांस्,जर्मनी हे देश कुठल्या ना कुठल्या कारणाने भारताचे मित्र आहेतच्.मैत्री अनेक प्रकारची असते-राजकिय्,आर्थिक्,सामाजिक्,सांस्क्रुतिक,लष्करी.
दुसर्याच्या घरात न डोकावण्याची प्रथा भारताप्रमाणे इतर देश ही पाळतात. तेव्हा भारतात बाँबस्फोट झाले किंवा दहशतवादी घुसले तर इतर मित्र राष्ट्रांनी भारताच्या वतीने पाक/बांग्लादेशला दम भरावा अशी अपेक्षा भारताने करणे व्यर्थ आहे. नक्षलवाद्,काश्मीर्,फुटेरतावादी चळवळी हे प्रश्न भारतालाच सोडवावे लागतील.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
23 Sep 2009 - 1:36 pm | विसोबा खेचर
ए डांबिसा, नंदनसायबाला शब्द दिलाय रे! त्या दिसापासून आजपुत्तर आपुनने अमेरीकेला गाली दिलेली नाय! :)
तात्या.
23 Sep 2009 - 2:15 pm | अमृतांजन
ईंडीया,
मालदींव,
वेस्ट इंडीज,
इंडोनेसिया
अंटार्टीका.,
आईसलांड,
रशिया,
जपान,
इस्रायल
जर्मनी
--असे सगळे की ज्यांच्याकडून आपण माल विकत घेतो.
23 Sep 2009 - 2:29 pm | धमाल मुलगा
काय रे मोठ्या मुलांनो, काय गडबड आहे?
आत्ता कुठे शांतता झालीये असं वाटेपर्यंत परत नवा वाद? अरे मला जरा सुखानं जगु द्याल की नाही?
ते असो, कुणाला शिव्या देताय? मी पण येऊ का? ;)
-धम्या.
हल्ली आमचा अवलिया फार पियाला लागला आहे असं ऐकुन आहे. त्यामुळेच मित्रदेशांच्या चर्चेतही अशी प्रतिबिंबं आणु पाहतोय. :D
बाकी, आमच्या देशाला काही कुणा तथाकथित मित्रदेशांची गरज नाही. आम्ही जगाला फाट्यावर मारतो. :D
-(साधा फुलचंदप्रेमी) धम्या.
-------
च्यायला, डांबिसकाका, खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हो...एकही देशाचं नाव डोळ्यापुढे येईना बघा. :?
23 Sep 2009 - 5:31 pm | परिकथेतील राजकुमार
धम्याशी सहमत आहे.
संपुर्ण जगाला फाट्यावर मारणारे विरपुरुष ज्या देशात आहेत त्या देशाला मित्रांची आणी शत्रुंची काळजी करण्याची गरजच काय ?
मैंड इट !!!
©º°¨¨°º©क्विकगन परागन ©º°¨¨°º©
आमचे राज्य
23 Sep 2009 - 5:42 pm | छोटा डॉन
मला वाटते की जर्मनी आपला मित्र देश असावा ( नसल्यास माझी वैयक्तीक हरकत नाही हे जाता जाता नमुद करतो, तसेच तिथल्या युरोच्या नोटांच्या रंगाबाबत आणि उबेबाबत माझे ज्ञान अगदीच तुटक आहे हे ही आग्रहाने नमुद करतो ) ...
हिटलरने म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी "२ रे महायुद्ध" छेडले होते अशी आतल्या गोटातली बातमी आहे, तशा अर्थाच्या ( पक्षी : आर्य , इथले उच्चवर्णिय विचार वगैरे ) चर्चा "कुठेतरी" वाचल्याचे स्मरते.
संदर्भ नाही म्हणुन जास्त लिहीत नाही, बाकी चालु द्यात ...
तसेच सध्या आमचा आवडता खेडाळु "इब्राहिमोविच" हा स्विडीश असल्याने स्विडनही आपला दोस्त असेल वाटते, शिवाय आज मी डब्यात बटाट्याची भाजी आणि लिंबाचे लोणचे आणले आहे हे आहेच ...
------
( मैत्रिपुर्ण ) छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
24 Sep 2009 - 10:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
डान्रावांना बिनशर्त पाठींबा घोषित करत आहोत. शिवाय जर्मन लोकांना शाहरुख खान आवडतो हे ही एक समर्थनार्थ कारण आहेच.
(रा.को.) अदितीताई अवखळकर पाटील.
23 Sep 2009 - 10:32 pm | सुधीर काळे
राजकारणात कधीच शाश्वत मित्र नसतात, फक्त शाश्वत हितसंबंध असतात अशी इंग्रजी म्हण आहे. (In politics, there are no permanent friends, but only permanent interests.)
त्यामुळेच निक्सनच्या कारकीर्दीत अमेरिकेने चीनबरोबरची खूप जुनी दुष्मनी/वैर सोडून चीनशी नवीन मैत्री केली व त्या मैत्रीतून सोविएत रशियाचा (USSR) काटा काढला. चीननेही रशियाबरोबरची मैत्री स्वतःचे हितसंबंध संपले हे जाणून बंद केली व अमेरिकेची मैत्री 'कबूल' केली. स्वतःला most favoured nation हा दर्जा द्यायला भाग पाडून आपली अमेरिकेतली निर्यात वाढवून आर्थिक संपन्नतेचा एक नवा विक्रम करून दाखविला. पण आता अमेरिकेकडे त्यांचे कर्ज फेडण्यासाठी व नवा माल रोखीने विकत घेण्यासाठी रोकड नाही हे लक्षात येताच त्यांनी जागतिक व्यापारासाठी डॉलर ऐवजी एक नवे चलन असावे ही मागणी जगापुढे मांडायला मागेपुढे पाहिले नाहीं.
आपल्याला नेहमी कमजोर ठेवायला चीनने पाकिस्तानशी दोस्ती केली. पाकिस्ताननेही लोटांगण घालून आपल्या प्रदेशाचा (काश्मीरमधला) तुकडाही चीनला देऊन टाकला व चीनशी मैत्री केली. त्यांच्याबरोबर अण्वस्त्रांबाबत देवाण-घेवाणही केली (कुणी कुणाला काय दिले हे जरा गुलदस्तातच आहे).
मी कधीच अमेरिकेच्या परराष्ट्रनीतीवर सरसकट टीका केलेली नाही. बुश-४१ व बुश-४३ व त्याआधी रेगन साहेबांनी पाकिस्तानला सच्चा साथीदार मानून त्याचे नको तितके लाड केले व आता पाकिस्तान हे अमेरिकेचे "अवघड जागेचे दुखणे" झालेले आहे. धरले तर चावते व सोडले तर पळते या परिस्थितीत अमेरिका तरी काय करू शकणार?
मी ओबामांवर त्यांनी आपल्याला व पाकिस्तानला एका पंक्तीत बसवले एवढ्या एका मुद्द्यावरूनच टीका केली व मी त्यांना एक निषेधपत्रही पाठविले. त्याचा लगेच उपयोग होणार नाही हे माहीत असून सुद्धा.
मी बर्याचदा लिहिले आहे कीं ओबामा हा एक चांगला माणूस वाटतो म्हणून आपण आपले अमेरिकेबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी पावले टाकावीत. हे माझे मत आजही आहे.
पाकिस्तान एका दृष्टीने भाग्यवान आहे कारण त्याचे भौगिलिक स्थानच त्याला महत्व प्रप्त करून देते.
पण पाकिस्तानची कुठल्याही मूल्यांवर न आधरलेली परराष्ट्रनीती, लोकशाही व लष्करशाहीमधील कायमचा "खो-खो"चा खेळ, लाचलुचपतीचा बुजबुजाट अशा कारणांमुळे तो देश हळू-हळू तालीबानच्या कह्यात चालला आहे. आज स्वात प्रांतात शारिया कायदा लागू करायलासुद्धा पाकिस्तान सरकार तयार झाले यावरून त्या सरकारची असहायता सहज कळते.
पाकिस्तानी राजकारणात फक्त जमीनदारांचीच सद्दी आहे. एकीकडे लष्करातही उच्च (श्रीमंत) घराण्यातील लोकांची निवड व राजकारणातही तीच गोष्ट व दुसरीकडे अमेरिकेकडून मिळालेले अब्जावधी डॉलर्स कुठे खर्चले गेले याचा पत्ता नाही हे सर्व तालीबानच्या पथ्यावर पडेल व ते राष्ट्र आज-ना-उद्या तालीबानच्या अधिपत्याखाली असेल. आज जसे "हमास"ने गाझा पट्टीत पाय रोवले आहेत तस्सेच. कारण? पॅलेस्ताईन ऑथॉरिटीचे अध्यक्ष महमूद अब्बास यांचे इस्रायलसंबंधी बोटचेपे धोरण. इस्रायल जॉर्डन नदीच्या पश्चिम किनार्यावर (जिथे जेरुसलेमही आहे) आज धडाधड वसाहती उठवत आहे व त्याविरुद्ध लढाई न करता अब्बाससाहेब गुळमुळीत वाटाघाटी करत आहेत हेच चित्र दिसतेय आज.
या सर्व गोष्टींमुळे अमेरिकेला आपली गरज जास्त-जास्त लागणार आहे व जसे चीनने धूर्तपणे आपले फासे टाकले तसे टाकू शकणारे राजकीय नेतृत्व आपल्याला हवे आहे. जबरदस्त एकीही हवी. आजच्या मितीस या दोन्ही गोष्टी आपल्या दृष्टिपथात येत नाही आहेत, पण ती गरज तोंडावर आली आहे.
आपले मित्र कोण या प्रश्नापेक्षा आपले शत्रू कोण हा प्रश्न जास्त योग्य वाटतो. या प्रश्नाला आपण सहजपणे चीन व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे व आपल्यातील एकीचा अभाव हे उत्तर देऊ शकतो. बाकीचे सगळे "सरशी तिकडे पारशी" यासारखे देश आहेत. आपण जर नेत्रदीपक प्रगती केली तर आपल्यामागे सर्व जग येईल.
असो. ही माझी जराशी भ्रमंती!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
24 Sep 2009 - 10:55 am | सखाराम_गटणे™
माझ्या मते भारत आणि इंडिया एकमेकांचे मित्र झाले तरी पुरेसे आहे.
25 Sep 2009 - 6:08 am | प्रशांत उदय मनोहर
भारताचा मित्रदेश. (आणि आता इटलीसुद्धा ;) )
(मिपाकर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई