माझा झंपक पणा

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
23 Sep 2009 - 10:16 am

त्या दिवशी सेशन जरासे लांबलेच. लोकांचे प्रश्न जसे संपतच नव्हते.
सगळे आटोपुन पुण्यातून निघायला रात्रीचे साडेनऊ वाजले.
स्वारगेटवर येऊन बस पकडली.
बसने कात्रज पार केले कंडक्टरने तिकिटे सर्वाना दिली गेल्याची खात्री केली आणि स्वतःचे हिषोब संपवुन गाडीतले दिवे बंद केले.
सेशन जोरदार झाला होता थोडे थकल्यासारखे झाले होते पण एखादे सेशन मनासारखे झाल्यानन्तर जो उत्साह असतो तसाच उत्साह वाटत होता.त्यामुळे झोप लागायचा प्रश्नच नव्हता.
काही वाचायचे तर अंधारात वाचायचे कसे. मी सेशनची उजळणी करत बसलो. एका श्रोत्याने एक मस्त प्रश्न विचारला होता. मी थोडासा अडखळलोच होतो त्यावर .
बोलताना मी म्हणालो होतो की आपली प्रत्येक गोष्ट ही रूटीन बनलेली असते. जेवण , कपडे , मित्र , पुस्तके या सर्वांचा एक पॅटर्न ठरुन जातो आणि सगळ्या गोष्टी साचेबंद होतात. आपल्या जगण्यात थोडे वेगळेपण असले तर जीवनाचा आनन्द घेता येतो.
त्या श्रोत्याने विचारले साचेबंदपणा कसा काय म्हणता? मग रोज जेवण घ्यायचे नाही काय. रोजच्या जेवणात आपण कुठे तेचतेच खातो. ते वेगळेवेगळे असतेच की.
आपण टीव्ही बघतो. तो वेगळेपणाच असतो.
तो म्हणत होता त्यात तथ्य होते.
तुमचे बरोबर आहे पण आपण जो विचार करतो त्याच्यात ही साचेबंदपणा आलेला असतो. उदा मनोरंजन सुद्धा आपण एका ठरावीक प्रकारचेच अपेक्षीत ठेवतो .
जेवताना आपल्याला जे पदार्थ नक्की माहित असतात तेच चाखतो. आवडते आणि नावडते देखील. रोज एका ठरावीक वेळेसच जेवतो. बरीच कुटुंबे शनिवारी संध्याकाळी हॉटेलात जातात. फ्रीक्वेन्सी थोडी कमी पण तरीही फ्रीक्वेन्सी ना.
बोलण्याच्या नादात मीथोडा पुढे गेलो आणि म्हणालो सेक्स/ कामजीवन हे सुद्धा आपल्यासाठी एक रूटीन बनलेले असते. मी कित्येक जोडपी अशी पाहिली आहेत की जी ठरावीक फ्रीक्वेन्सीने कामजीवन उपभोगतात. त्याचा ही मग कंटाळा येतो. खरे तर त्या रुटीनचा ठरावीक चाकोरीचा कंटाळा आलेला असतो. त्यामुळे आयुष्य नीरस वाटू लागते.
माणूस हे यंत्र नव्हे. पण आपण कामजीवन यंत्रवत जगतो.
त्या श्रोत्याने एकदम विचारले....त्यात बदल कसा आणणार? आणि सगळे हसले.
मी म्हणालो की आपण जे जगतो त्यातला साचेबंदपणा सोडण्यासाठी जे करतो त्यात बदल हवा
म्हणजे.....?
म्हणजे की आपण आनन्द ज्या पद्धतीने उपभोगतो त्यात थोडा बदल हवा. बाह्य साधने बदलण्यापेक्षा आपण आपल्या वृत्तीत बदल करायला हवा.
उदा: आपण विनोदसुद्धा एका ठरावीक पद्धतीचेच ऐकतो त्याचा पॅटर्न ठरलेला असतो. गम्मत करतो त्याचाही पॅटर्न ठरलेला असतो. कधितरी आपण आपल्या वयाला शोभेल असे न वागता लहान मुलांसारखे वागून पाहूयात त्यांच्या सारखी गम्मत करुयात. आपले जगण्यातले रूटीन मोडले की जगणे आनन्ददायी ठरते.
त्यानन्तर थोड्याशा इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. कार्यक्रम आटोपल्यानन्तरही लोकांचे नेहमीप्रमाणे स्वतःच्या समस्यांशी निगडीत खाजगी प्रश्न झाले.
आणि मी निघालो.
विचारल्या गेलेल्या प्रश्नांमधला माझ्या उत्तरांमधला आता साचेबंदपणा येत चालला होता.
काहीतरी वेगळे करुन बघायचे म्हणजे तरी काय?
मी माझ्याच विचारांत होतो. त्या अंधारात अचानक मला माझ्याकडे कोणीतरी रोखून टक लावून बघतय अशी जाणी झाली. मी इकडे तिकडे पाहिले.
बहुतेकजण एस्टीच्या तालावर मानाहलवत गाढ झोपले होते.
लोकाना बघता बघता माझे लक्ष्य समोरच्या सीटवरच्या दोन बायकांकडे गेले. ड्राव्हरच्या मागच्या उलट्या सीटवर बसलेल्या असल्या त्या दोघीना बसमधले सर्व चेहेरे दिसत असावेत. त्यांचे डोळे विलक्षण तेजाने चमकत होते. कुत्र्या मांजरांचे डोळे चमकतातना तसे काहिसे.
मला बहुते भास झाला असावा. मी पुन्हा त्यांच्या कडे पाहिले.त्या दोघींच्या माना हलत होत्या पण डोळे मात्र चमकत होते.
या बाया डोळे सताड उघदे टाकून झोपल्यात की काय मी मनात म्हणालो.
मनातले कुतुहल स्वस्थ बसु देईना. मी नीट निरखून पाहिले.
त्या दोघी झोपलेल्याच होत्या. त्यांच्या मिटलेल्या पापण्यांवर बसमधल्या निळ्या लाईटचा उजेड पडून त्या चकाकत होत्या.
मला मी घेतलेल्या कुशंकांचे हसू आले ....
घरी पोचलो. आणि त्या चमकत्या पापण्यां आठवतच हसत झोपलो.
सकाळी भल्या पहाटेच जाग आली. बहुधा पाच वाजले असावेत. अचानक एक भन्नाट आयडीय सुचली.
गम्मतीत थोडे नाविन्य आणले तर?
मी माझ्या मुलीची गम्मत करायची ठरवली.
तिच्या वॉटरकलरच्या बॉक्समधून पांढरा रंग ब्रशने माझ्या पापण्याना लावला. त्यावर दोन्ही पापण्यांवर काळी भरीव वर्तुळे काढली.
आता पापण्या मिटल्यावर त्यावर रंगवलेले वटारलेले डोळे दिसत होते. आरशात एकेक डोळा बंद करून खात्री करून घेतली.
हॉल मध्ये जाऊन झोपलो. थोड्या वेळाने माझी मुलगी येईल आणि ती मला उठवयाला येळ त्यावेळी धमाल गम्मत येईल अशा विचारत मी डोळे मिटले.
थोड्या वेळाने माझ्या वडीलांचा मोठ्याने ओरडल्याचा आवाज आला. मी जागा झालो वडील ते उभे होते त्या जागीच मोठ्याने ओरडत होते . ते खूप घाबरले होते. त्याना दरदरून घाम फुटला होता. मी त्यांच्या जवळ जायला लागलो तसे ते भूत पाहिल्यासारखे अजूनच जोरजोराने ओरडू लागले.
माझ्या रंगवलेल्या वटारल्या डोळ्यांचा तो परीणाम होता.
मी लहान असतो तर नक्की धपाटे खाल्ले असते या असल्या मस्करी साठी.
घरातले सगळे गोळा झाले ते आमच्या दोघांचे अवतार बघून खोखो हसू लागले.
आई ने डोक्याला हात लावला म्हणाली. झंपकच आहेस तू. इवढा मोठा झालास तरी अजून लहान मुलांसारखा राहिलास.
तो झंपकपणा आज आठवला तरी सगळेच जण कितीही मरगळलेलो असलो तरी एकदम रीफ्रेश होतो.

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

23 Sep 2009 - 10:21 am | पिवळा डांबिस

झंपकच आहेस तू. इवढा मोठा झालास तरी अजून लहान मुलांसारखा राहिलास.
तू कधी मोठा होणार रे विजुभाऊ?
:)

पर्नल नेने मराठे's picture

23 Sep 2009 - 10:22 am | पर्नल नेने मराठे

:D
चुचु

प्रमोद देव's picture

23 Sep 2009 - 10:28 am | प्रमोद देव

:)

विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

वेताळ's picture

23 Sep 2009 - 10:34 am | वेताळ

झंपकच आहे तुम्ही.
वेताळ

अवलिया's picture

23 Sep 2009 - 11:05 am | अवलिया

मोठे व्हा विजुभाउ... लवकर मोठे व्हा !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

टारझन's picture

23 Sep 2009 - 7:00 pm | टारझन

ए ... काहीतरीच काय नान्या ... नको त्या वेळेस मोठे झाल्याने अँबेरेसमेंट होते म्हणे ..

-(हायड्रॉलीक) टारझन

रामदास's picture

23 Sep 2009 - 11:24 am | रामदास

निज शैशवास जपणे बाणा विजूचा असे.

पिवळा डांबिस's picture

23 Sep 2009 - 11:28 am | पिवळा डांबिस

निज शैशवास जपणे...
हट्ट विजूचा असे...
(आम्ही समजावून समजावून थकलो....आता तुम्ही ट्राय करा रामदासस्वामी!!! बघू तुमच्या करूणाष्टकांचा काही इफेक्ट होतोय का!!!!)
:)

झकासराव's picture

23 Sep 2009 - 11:41 am | झकासराव

आता पापण्या मिटल्यावर त्यावर रंगवलेले वटारलेले डोळे दिसत होते>>>
पायरेट्स ऑफ कॅरीबियन मधला जॉनी डेप आठवला एकदम.
:)

भोचक's picture

23 Sep 2009 - 12:14 pm | भोचक

मस्त झंपकपणा. च्यायला असं रूटीन सोडून कधी तरी जगायलाच हवं. मी आणि माझा एक भाऊ नाशिकला असताना असं कधी कधी करायचो. भर हिवाळ्यात पहाटे उठायचो नि घरातून चालत निघायचो. गंगेच्या काठावरची मंदिरं पालथी घालत. दर्शन, निरिक्षण करत भटकत बसायचो. कंटाळा आला की घरी. मजा यायची. एरवीही आम्ही असं करतो. कुठेही जायचं असलं की ठरवत नाही. सुटीच्या दिवशी गाडी काढून पुढे गेलो की ठरवायचं कुठे जायंच ते. त्यातला अनपेक्षितपणा मस्त वाटतो. (भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?

हा आहे आमचा स्वभाव

स्वाती राजेश's picture

23 Sep 2009 - 6:40 pm | स्वाती राजेश

मस्त लिहिले आहे...पण जरा बेताने... :)

असाच एक प्रसंग मी शॉपिंग मॉल मधे गेले होते...
खरेदी केली...कार्ड मशीन मधे घातले....आणि सगळे सामान घेतले आणि कार्ड काढून घेतले..आणि मी बिलाची मागणी केली....ते वयस्कर गृहस्थ म्हणाले, अहो पैसे दिल्याशिवाय कसे बिल देऊ?....मी म्हटले, मी कार्डवरून दिले आहेत...मी जरा वाद घातला....
शांतपणे चेहर्‍यावर स्माईल करून ते म्हणाले, तुम्ही कार्ड, पिन नं. घालायच्या अगोदरच काढून घेतले....
तेव्हा मी सॉरी म्हणून पैसे दिले...त्यात १५ मि. गेली....
पुन्हा माफी मागितली, तेव्हा जाताना ते म्हणाले, ओ.के. आजचा दिवस ह्या प्रसंगा वरून लक्षात राहील.... :)

लक्षात राहण्यासारखी एक गोष्ट. ते गृहस्थ साधारण ६० चे असावेत...ते तिथे काउंटर वर काम करत होते...आणि त्यांना मी विचारले की, तुम्ही इथे कसे काय काम करता? तेव्हा त्यांनी जे उत्तर दिले ते असे....
यावयात नाविन्य, वेगळेपण असे काहीतरी हवे असते...मी आठवड्यातून एक दिवस येतो...आणि आठवडाभरची पुंजी (पैशाची नव्हे तर अनुभवांची) जमा करतो आणि माझ्या लाडक्या बायकोबरोबर शेअर करतो..... :)

पण जरा जपूनच, असले बदल अंगाशी यायचे कधीतरी!

(नबदल)चतुरंग

प्राजु's picture

23 Sep 2009 - 8:32 pm | प्राजु

खरंय!!
हे असले प्रकार एप्रिल फुल च्या वेळी होतात.. बर्‍याचदा अंगाशीही येतात.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लवंगी's picture

24 Sep 2009 - 4:49 am | लवंगी

=)) =)) मजेशीर आहात तुम्ही विजुभाऊ