जबरदस्त

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
22 Sep 2009 - 12:13 pm

"पश्या रात्री माझ्याकडे झोपायला येतोस का आज?" नंदु अगदी अजीजीने विचारत होता मला.

"साल्या कोणी ऐकले तर काय म्हणेल ? खी खी खी" मी तेव्हड्यात नंद्याची खेचुन घेतली.

"आय एम सिरीयस यार. आई बाबा बालाजीला गेल्यापासुन ३ दिवस मी काढले कसे तरी पण एक तर नविन घर आणी त्यातुन आज अमावस्या...."

"बर बर चल दस्ती बंद कर आता, १०.०० पर्यंत येतो मी बाटली घेउन" मी नंद्याला डोळा मारत म्हणालो.

साधारण १०.३० च्या सुमारास मी नंद्याच्या घरी पोचलो.

"का रे येव्हडा उशीर झाला ?"

"यार नंद्या, तुमच्या सोसायटीच्या कॉर्नरला कोणीतरी माणुस अचानक रस्त्यातच मरुन पडलाय रे, भवतेक त्याला जोरदार हार्ट अ‍ॅटॅक आलेला दिसतोय. मी जवळ जाउन बघितले, एकदम पांढरा पडला होता भितीने आणी डोळे सुद्धा काहितरी भयानक, अमानवी बघितल्यासाखे विस्फारलेले होते रे." मी बाटली बाहेर काढत काढत नंद्याला पुर्ण हकिगत सांगीतली.

इकडे ऐकता ऐकता आमच्या नंद्याही पांढरा पडत चालला होता. "ए गप बाबा, मरु दे त्या मरणार्‍याला. त्या टिपॉय खाली ग्लास, पाणी, बर्फ सगळे आणुन ठेवलय बघ."

मग तो विषय दुर करुन आमची मैफल मस्त रंगली, ४/४ पेग मस्तपैकी मारुन आम्ही जेवणावर ताव मारुन टि व्ही चा आनंद लुटत बसलो.

"नंद्या चल बे १२.०० वाजायला आले झोपु आता" मी जांभई देत म्हणालो.

थोडी का कु करत शेवटी नंद्या एकदाचा झोपायला तयार झाला. वरच्या बेडरुम मधल्या डबलबेड वर आम्ही मस्तपैकी ताणुन दिली. एकतर अपरीचीत जागा असल्याने माल तशी पटकन झोपही लागेना पण ४ पेग आणी दाबुन झालेल्या जेवणामुळे डोळे मात्र चांगलेच जडावले होते.

काही वेळाने मी अर्धवट झोपेत आहे का जागा आहे ह्या संभ्रमीत अवस्थेत असतानाच मला बाजुला काही हालचाल जाणवली. च्यायला हा नंद्या लोळतो का काय ? मी मान वळवुन नंद्याकडे पाहायचा प्रयत्न केला, त्याच वेळी खोलीतला अंधार एकदम दाटुन आल्यासारखा झाला, अजुनच गडद झाला. कसल्याशा तिव्र सुगंधाने ती खोली भरुन गेली, बर्फाळ वार्‍याचे झोत अंगावर शहारे आणु लागले.

अत्यंत कष्टाने मी मान वळवुन नंदु कडे बघितले आणी अक्षरश: उडालोच.... माझ्यापासुन दोन हातावर नंदु शांत झोपला होता पण त्याचे मुंडकेच गायब होते. माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना.

"घाबरला नाहीसना भावा?" अचानक उजव्या बाजुनी आवाज आला. बघतो तर नंद्याचे नुसते मुंडकेच हवेत तरंगत माझ्याशी बडबड करत होते.

"असे काय करतोयस ? घाबरलायस का तु? पाणी हवे का तुला? का दातखीळी बसलीये ?" नंद्याचे मुंडके आता खिदळत हसायला लागले.

"पश्या भावा तुझ्या हिंमतीची मात्र दिली पाहिजे हान ! भले भले फटकन प्राण सोडतात रे हे असले दृश्य बघुन. काहितर ठार वेडे होतात, तु मात्र त्या मानाने चांगलाच टिकलास की. तुला भिती नाही वाटते ?"

"भिती कसली रे नंद्या? उलट जो हुकुमी खेळ आपण कायम दाखवुन 'सावज' मिळवतो आज तोच खेळ कोणीतरी कल्पनेतही बसणार नाही असा दुसरा इतक्या सहजपणे दाखवतोय, हे बघुन असुया मात्र निश्चीतच वाटत आहे ! मी माझे मुंडके काढुन शेजारच्या टेबलावर ठेवता ठेवता म्हणालो.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

22 Sep 2009 - 12:22 pm | श्रावण मोडक

आभास, प्रतिबिंबं, प्रतिमा... दृष्टीभ्रम!!!
बाकी मागचं काही तरी अपूर्ण आहे का हो? त्याचं भूत - बित होत नाही का?

सायली पानसे's picture

22 Sep 2009 - 12:22 pm | सायली पानसे

तुला पण बिपिन भयकर्ते ची लागण झाली का?? छान कथा...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Sep 2009 - 12:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ओय? क्रमशः हरवलं का तुझी उतरली नाही त्यामुळे अर्धवट गोष्ट तशीच प्रकाशित केलीस?

आणि त्या आधीच्या गोष्टीचं काय झालं?? का ती विसरूनच गेलास?? तात्या, असल्या गोष्टी अर्धवट टाकून नवीन गोष्टी लिहीणार्‍यांना एक सज्जड दम द्या हो.

अदिती

श्रावण मोडक's picture

22 Sep 2009 - 12:26 pm | श्रावण मोडक

तात्या, असल्या गोष्टी अर्धवट टाकून नवीन गोष्टी लिहीणार्‍यांना एक सज्जड दम द्या हो
हाहाहाहाहाहाहाहाहा... अदिती, काम नाहीये का? विनोद सुचू लागलेत ते...

अवलिया's picture

22 Sep 2009 - 12:25 pm | अवलिया

हा हा हा मस्त रे.... च्यामारी धरुन फटाक !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

निखिल देशपांडे's picture

22 Sep 2009 - 12:27 pm | निखिल देशपांडे

च्यायला ईतक्यालवकर संपली क्रमशः कुठेय... जरा चार पाच भाग पाडायचे...
बाकी जुन्या कथेचे काय??? ती कधी पुर्ण करणार

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

नंदन's picture

22 Sep 2009 - 12:30 pm | नंदन

डोकं बाजूला ठेवून वाचायचा का हो हा लेख? ;)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहज's picture

22 Sep 2009 - 12:43 pm | सहज

हा हा हा!

कुठल्या कथेवरुन प्रेरणा घेतलीस का रे? :-)

स्वाती दिनेश's picture

22 Sep 2009 - 2:47 pm | स्वाती दिनेश

डोकं बाजूला ठेवून वाचायचा का हो हा लेख?

:) नंदनसारखेच..
स्वाती

सखाराम_गटणे™'s picture

22 Sep 2009 - 12:53 pm | सखाराम_गटणे™

मस्तच.

नंदू's picture

23 Sep 2009 - 7:31 pm | नंदू

तो मी नव्हेच

नंदू

विनायक प्रभू's picture

22 Sep 2009 - 12:52 pm | विनायक प्रभू

दस्त

विशाल कुलकर्णी's picture

22 Sep 2009 - 12:57 pm | विशाल कुलकर्णी

मस्त !
छोटीशीच पण परिणामकारक !
आवडली :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

विशाल कुलकर्णी's picture

23 Sep 2009 - 10:56 am | विशाल कुलकर्णी

हा कोण? पशा किं नंद्या ....
किं परा .....? ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

पाषाणभेद's picture

22 Sep 2009 - 12:57 pm | पाषाणभेद

छान छान.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.

- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

हर्षद आनंदी's picture

22 Sep 2009 - 1:13 pm | हर्षद आनंदी

राजे, तुम्हाला भुते भारी आवडतात बॉ !
अशी पिणारी भुते कुठे असतात, मला तर नंद्याच्या जागी राजेच दिसतात, जरा जास्त झाली की भुत येते
(ह. घ्या)

विजुभाऊ's picture

22 Sep 2009 - 2:37 pm | विजुभाऊ

वा मस्त रे.......डोके काढुन हसत बसलोय

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Sep 2009 - 2:48 pm | llपुण्याचे पेशवेll

पर्‍या लेका पण तू जाताना माझा पाय घेऊन गेलास तो तर परत दे. तुझा पाय फारच लहान आहे रे पुरत नाही मला. मला माझा पाय परत दे. आणि त्या नंद्याकडूनही माझ्या उजव्या हाताचे लांब वाढलेले बोट पण परत घ्यायचे आहे. ते नसल्याने ण लिहायची अंमळ गैरसोय होत आहे बघ. :)

अवांतर: आयडीया लै भारी. आणि कथाही.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984

गुंडोपंत's picture

22 Sep 2009 - 3:35 pm | गुंडोपंत

मस्त लघु कथ आहे.

मी माझे मुंडके काढुन शेजारच्या टेबलावर ठेवता ठेवता म्हणालो.

हा शेवट आवडला.
शेवट अनपेक्षित असल्याने भारी झाली आहे कथा.

"भिती कसली रे नंद्या? उलट जो हुकुमी खेळ आपण कायम दाखवुन 'सावज' मिळवतो आज तोच खेळ कोणीतरी कल्पनेतही बसणार नाही असा दुसरा इतक्या सहजपणे दाखवतोय, हे बघुन असुया मात्र निश्चीतच वाटत आहे !

हे वाक्य मोट्ठे झाले आहे. त्या ऐवजी छोट्या छोट्या वाक्यांनी उत्सुकता अजून थोडी ताणली असती तरी चालली असती.

खरंतर पुर्ण मोठ्या कथेचा प्लॉट आहे यात.

एकुणच कथा आवडली, आणिक येवू द्या!

आपला
गुंडोपंत

दशानन's picture

22 Sep 2009 - 3:47 pm | दशानन

=))
=))

किती विनोदी कथा आहे यार... लै भारी आवडली बॉ !

;)

***
राज दरबार.....

सूहास's picture

22 Sep 2009 - 4:44 pm | सूहास (not verified)

मस्त..

अनपेक्षीत शेवट..

सू हा स...

धमाल मुलगा's picture

22 Sep 2009 - 4:56 pm | धमाल मुलगा

पर्‍या, लेका तरी तुला सांगत होतो, मी शिकवलेली ही डोकं काढायची कला उठसुठ सगळ्यांना शिकवू नकोस म्हणुन...पण ४ पेग झाले की तुला भान कुठलं रहायला...
आता निदान ते उलटे पाय तरी लपवत जा...

अवांतरः काय बे, अचानक हा काय झटका आला तुला?

प्रसन्न केसकर's picture

22 Sep 2009 - 5:04 pm | प्रसन्न केसकर

रहस्य कथांचे पेव फुटलय का इथे? पण भारी कथा. चालु द्या! पण वेळ काढुन जुनी अपुर्ण कथा पण पुर्ण करा!

---

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

भोचक's picture

22 Sep 2009 - 6:01 pm | भोचक

पर्‍या 'बिनडोक' असली तरी मस्तय कथा. तुझी ही गंमतीदार-भय(?) कथा आवडली. कथेच्या शेवटच्या वाक्यात रहस्य पेरण्याची क्लृप्ती लाजबाब.

बाय द वे. हिंदीत लघुकथा नावाचा प्रकार आहे. तशा लघुभयकथा हा प्रकार मराठीत रूजायला काही हरकत नाही, असं सध्या मिपावरच्या लघुभयकथा वाचून वाटतेय. रत्नाकर मतकरींच्या पानी-दोन पानी अशा कथा आहेत. पण बाकी कुणी प्रयत्न नाही केले.

(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
ही आहे आमची वृत्ती

भोचक's picture

22 Sep 2009 - 6:01 pm | भोचक

पर्‍या 'बिनडोक' असली तरी मस्तय कथा. तुझी ही गंमतीदार-भय(?) कथा आवडली. कथेच्या शेवटच्या वाक्यात रहस्य पेरण्याची क्लृप्ती लाजबाब.

बाय द वे. हिंदीत लघुकथा नावाचा प्रकार आहे. तशा लघुभयकथा हा प्रकार मराठीत रूजायला काही हरकत नाही, असं सध्या मिपावरच्या लघुभयकथा वाचून वाटतेय. रत्नाकर मतकरींच्या पानी-दोन पानी अशा कथा आहेत. पण बाकी कुणी प्रयत्न नाही केले.

(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
ही आहे आमची वृत्ती

लवंगी's picture

22 Sep 2009 - 6:35 pm | लवंगी

शेवट अनपेक्षित..

डोक आहे हे सिद्ध केलस

आवडली. अजुन येवुदे पर्‍याभाऊ.
वेताळ

स्वाती२'s picture

22 Sep 2009 - 7:51 pm | स्वाती२

मस्त!

अमोल जाधव's picture

22 Sep 2009 - 8:23 pm | अमोल जाधव

भावा मस्तच रे.

टारझन's picture

22 Sep 2009 - 8:32 pm | टारझन

काय झालं राजकुमार साहेब ? आज अचानक राज कपूर कसे काय झालात ?

-(मणोजकुमार) टारझन

रेवती's picture

22 Sep 2009 - 9:41 pm | रेवती

का रे बाबा असं करायला लागलाहेस?
राजकुमारपणा सोडून राजकुमारगिरी झाली ही!;)

रेवती

क्रान्ति's picture

23 Sep 2009 - 8:30 am | क्रान्ति

भुताटकी चाललीय रे परा? वाचूनच हार्ट अ‍ॅटॅक यायचं काम झालंय हे तर! बरं झालं रात्री नाही वाचली! ;)

थोडक्यात पण मस्त लिहिलीस! शेवट खरंच अगदी अनपेक्षित!

क्रान्ति
राम राम राम राम!
अग्निसखा
रूह की शायरी

दिपक's picture

23 Sep 2009 - 9:36 am | दिपक

प्रतिक्रिया द्यायला माझे मुंडके शोधत आहे.!!!

हा मिळाले.

मस्त रे परा. :)

शक्तिमान's picture

27 Sep 2009 - 1:29 am | शक्तिमान

परा...
मस्त!
कमालीचा अनपेक्षित ...