अॅन्टीगनी कडे वळण्यापूर्वी तीची पूर्वपिठीका पाहुयात.
सोफोक्लीज च्या नाटकांबद्दल एक विचित्र कुतुहल असते. त्यातली पात्रे ही पुर्णपणे मानवी वाटतात.
मानसशास्त्राचा गाढा अभ्यास या नाटकांमधून दिसून येतो
किंग इडिपस ( पु ल नी या नाटकाचे रुपांतर "राजा ओदीओपौस" असे केले आहे) उच्चाराचा भा अलहिदा.
किंग इडिपस नाटकात राजा इडिपस त्याच्या एका ( स्वतःच्या सख्ख्या आईशी अनवधानाने लग्न केल्याच्या/तीचे पासून शरीरसंबन्धातूनमूल होऊ दिल्याच्या) पापाचे परिमार्जन म्हणून स्वतःचे डोळे फोडून घेतो आणि तो नन्तर मरण पावतो.
त्या नन्तर त्याचा मेहुणा क्रेयॉन हा राज्याचा ताबा घेतो आणि राजाच्या मृत्यूपत्राप्रमाणे सहा सहा महिने आळीपाळीने दोघा राजपुत्रांकरवी राज्य चालवण्यास बांधील रहातो.
पहिला राजपुत्र राज्यावर असताना त्याची सहा महिन्यांची मुदत संपल्यानन्तर दुसरा राजपुत्र गादीवर हक्क सांगतो . पहिला त्याला नकार देतो.दुसरा बंडाळी करतो . दोन्ही राजपुत्रात तुंबळ लढाई होते दोघेही मरण पावतात. त्यापैकी एकाचा क्रेयॉन राजाच्या सन्मानाने अंत्यविधी करतो आणि दुसर्यावर राजद्रोहाचा आणि बंडाळीचा आरोप ठेऊन त्याचे प्रेत सडत ठेवतो.
अॅन्टीगनी हे नाटक या कथानकापासून पुढे सुरु होते. मग आपल्यापुढे एक असे कथानक उभे रहाते की ज्यात
नात्यांच्या घट्ट विणीची आणि कर्तव्याची एक उत्तम कथा मांडली जाते आणि ज्यात एकमेकांसमोर उभे रहाणारे दोघेही तात्वीकदृष्ट्या बरोबर आहेत
इडिपसची मुलगे अॅन्टीगनी आणि तिची मोठी बहीण आयमनी. अॅन्टीगनीचे प्रेम क्रेयॉनच्या मुलाशी आहे. ती त्याच्याशी लग्न करणार आहे त्या लग्नाला क्रेयॉनची सुद्धा मान्यता आहे.
दोन्ही राजपुत्र मेलेले आहेत प्रजेत बंडाळी माजली आहे. अशा अवस्थेत क्रेयॉन राज्य करायला घेतो.
तो बंडखोराना कडक शासन घडावे या मताचा आहे. त्यासाठी एका राजपुत्राचे( ज्याचे प्रेत त्यातल्यात्यात जरा बर्या अवस्थेत आहे) शाही इतमानाने अंत्यसंस्कार करवतो आणि दुसर्याला बंडखोर ठरवून त्याचे प्रेत राजधानीच्या वेशीवर सडत पडावे अशी सोय करतो. सडणार्या प्रेताचा वास नागरीकाना आणि बंडखोराना त्यांची जाणीव करून देईल यासाठी क्रेयॉन कोणाही नागरीकाला त्या सडणार्या प्रेताला मूठमाती देण्याची मनाई करतो. तसे कोणी केल्यास त्याला भिंतीत चिणून मारण्याची शिक्षा जाहीर करतो.
कोणाचेही प्रेत बेवारस पडून रहावे त्याला मूठ माती मिळू नये हे अॅन्टीगनीला अमानवी वाटते. प्रेताला अंत्यसंस्कार मिळालाच पाहिजे हे तिचे ठाम मत आहे.
त्यासाठी ती लपूनछपून रात्री वेशीवर जाते प्रेताला अंत्यसंस्कार देण्याचा प्रयत्न करते.
तेथे तैनात असणारे रक्षक अॅन्टीगनीला पकडतात आणि क्रेयॉनसमोर हजर करतात. स्वतःची होणारी सूनच अपराधी आहे हे पाहून क्रेयॉन तीला वाचवायचा प्रयत्न करतो तिची हरप्रकारे समजूत घालतो.
हट्टी अॅन्टीगनी काहीच ऐकत नाही तिचा हट्ट एकच असतो की प्रेताला मग ते कोणाचेही असो मूठमाती मिळालीच पाहिजे.
राजा क्रेयॉनचा हट्ट असतो की राजद्रोह्याला शासन झालेच पाहिजे. मग तो कोणीही का असो.
अॅन्टीगनी आणि क्रेयॉन दोघेही आपआपल्या जागी बरोबर आहेत. गुंता वाढत जातो. कोणीच माघार घ्यायला तयार नाही.
क्रेयॉन अॅन्टीगनीला पळून जाण्याचा सल्लाही देतो. त्याला प्रजेत या कृत्यामुळे आणखीनच बंडाळी माजेल असे वाटत असते. त्या शिवाय आपण जर शिक्षा ठोठावली तर ती आपल्याच सुनेला ठोठावी लागेल मग मुलावर त्याचा परीणाम होईल हे त्याला दिसत असते.
एकीकडे राज्यकारभार आणि दुसरीकडे कुटुंब्/नाती हा पेच क्रेयॉन्ला गुंत्यात टाकतो. अॅन्टीगनी काहीच ऐकायला तयार नसते. प्रेताला मूठमाती द्यायचीच मग तो राजद्रोही का असेना. एकदा माणूस मेला की त्याचे कर्म मरते .उरतो तो केवळ देह.जिवंतपणी केलेल्या कर्माची फळे मृतदेहाला का द्यायची . माणूसकी म्हणून का होईना प्रेताला मूठमाती मिळायलाच हवी. हा तिचा युक्तीवाद
क्रेयॉनचे सगळे प्रयत्न फोल ठरतात. अनाईलाजान अॅन्टीगनीला भिंतीच चिणून मारावे लागते त्या धक्याने तिचा प्रियकर हीमन मरतो. क्रेयॉनची बायको( हीमनची आई) पुत्रवियोग सहन न झाल्याने मरते . क्रेयॉन एकटाच उरतो.
नाटकाच्या शेवटी क्रेयॉन एका शिपायाला त्या दिवसाच्या मंत्रीमम्डळाच्या सभेची वेळ विचारतो आणि सभेला निघून जातो
साधारण दीड तास भर चालणारे नाटक वाचून सुन्न करणारा अनुभव येतो.
आणिबाणीच्या काळात डॉ लागु हे या नाटकाचे प्रयोग करत. लोक नाटकातल्या अॅन्टीगनीशी इंदीरा गांधीची तूलना करत डॉ.लागूना हव्या असलेल्या पेक्षा भलताच परिना मिळतो म्हणून डॉ.लागूनी नाटकाचे प्रयोग बंद केले.
अनेक नटानी अनेक संस्थानी या नाटकाचे अनेक प्रयोग केले आहेत.
प्रत्येक कलाकाराला संस्थेला आलेला अनुभव एकसारखाच आहे.
प्रयोग झाल्यानन्तर चांगल्या आणि चांगल्याच्या द्वंद्वात प्रेक्षक सुन्न झालेले असतात
प्रतिक्रिया
21 Sep 2009 - 12:06 am | मुक्तसुनीत
विजुभौ, परिचय आवडला.
अँटिगनीच्या व्यक्तिरेखेशी , आणीबाणीकालीन इंदिराबाइंशी तुलना नेमकी कशासाठी होत असावी याबद्दल मला कुतुहल वाटते. तुम्ही थोडे अजून विशद कराल का ?
21 Sep 2009 - 11:00 am | विजुभाऊ
एका प्राध्यपकानी मला हे पुस्तक वाचायला दिले. पुस्तक नीट कळावे म्हणावे म्हणून मी सरळ त्याचा अनुवाद्/रुपांतर केले. त्यानन्तर त्या रुपांतराचे मी वाचनाचे प्रयोग करायचो. कधीतरी डॉ लागुनी ते नाटक केले होते असे कळाले. डॉ लागुंशी त्याबद्दल चर्चा केल्यावर त्यानी मला नाटक करत असताना ७७/७८ सालात आणीबाणी असताना नाटकातल्या अॅन्टीगनी या व्यक्तीरेखेची तुलना लोक इंदिरागांधींशी करायचे असे सांगितले.
अॅन्टीगनी ही व्यक्तीरेखा एक बम्डखोर व्यक्तीरेखा म्हणून ओळखली जाते. ती प्रस्थापित व्यवस्थे विरुद्ध बंड करून ऊठते. तिला जे योग्य वाटते त्याच्या बाजूने जीव गेला तरी चालेल पण सत्याच्या बाजूने उभी राहीन . एकाकी लढा देईन या तिच्या बाण्यात आणि इंदिराजींच्या त्या वेळच्या परिस्थितीत बरेच साम्य होते. जनता पक्षाच्या राजवटीत इंदिरागांधीना तुरुंगात टाकले होते त्याना शासनाने टारगेट केले होते .
काँग्रेस पक्षातून त्याना बाहेरची वाट दाखवली गेल्यावर सुद्धा त्यांचे मनोधैर्य वाखाणण्यासारखे होते
कदाचित या साधर्म्यामुळे लोक अॅन्टीगनीशी इंदिरा गांधींशी तुलना करीत असावेत असे डॉ लागुंचे म्हणणे होते
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
21 Sep 2009 - 5:44 am | सुनील
नाटकाची सुंदर ओळख करून दिली आहे. इथे थोडी अधिक माहिती मिळते.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
21 Sep 2009 - 11:08 am | पुष्कर
मी मागच्या वर्षी मुंबईला पृथ्वी थिएटर मधे ह्या इंग्रजी नाटकाचा प्रयोग पाहिला. त्यात नसरुद्दिन शाहनी क्रेयॉनचं आणि त्याच्या बायकोनं (रत्ना पाठक?) अँटिगनीची भूमिका केली होती. अतिशय सुंदर काम केलंय दोघांनी.
21 Sep 2009 - 11:24 am | विजुभाऊ
तो प्रयोग मी ही पाहिला सत्यदेव दुबेनी बसवले होते. पण का कोणासठाऊक नासीरउद्दीन क्रेयॉनसारखा कर्त्व्यकठोर न वाटता समजूतदार वाटला आणि रत्ना पाठकसुद्धा पुस्तकात वाटते तेवढी बंडखोर वाटत नव्हती.
22 Sep 2009 - 9:43 am | विजुभाऊ
सोफोक्लीज ने लिहिलेल्या किंग इडीपस नाटकावरुन " इडीपस सिंड्रोम" हा शब्द प्रचलीत झाला त्याबद्दल नव्या धाग्यात सांगेन
22 Sep 2009 - 7:00 pm | अन्वय
छान माहिती.
आमच्या नाटककार मित्राला वाचायला देतो.
22 Sep 2009 - 10:05 pm | धनंजय
लागू प्रयोग करायचे ते भाषांतर कोणी केले होते? कुठे उपलब्ध आहे का?
23 Sep 2009 - 8:06 am | सुबक ठेंगणी
आवडली ओळख. (तुम्ही किंवा इतर कोणी केलेलं) अँटिगनीचे भाषांतर वाचायला आवडेल.
मात्र इडिपसची गोष्ट वाचून माणसापेक्षा दैवच बलवत्तर हे परत परत जाणवून त्याची खूप दया आली मला. आणि आता "इडिपस काँप्लेक्स"हे नाव देऊन तर त्याच्या हातून नकळत घडलेल्या कृत्याची काळाने फार मोठी शिक्षा दिली आहे असं पण वाटतं.