..पट्टराणी..
------------
करु नको माझ्याकडे तु गं अशी पाठ राणी..
सोडु का ग सांग तुझ्या चोळीची मी गाठ राणी..
जीव होतो कासावीस,तू गं अशी रुसताच..
पहा माझ्याकडे आणि हास ना ग एकदाच..
तुझ्या कुशीमध्ये पुरी सरु दे गं रात राणी...
राग इतुका गे आला,वर धरीला अबोला..
रात विरहात जाई शिक्षा तुला आणि मला..
बोल ना ग माझ्याशी तु..बिलगुनि घट्ट राणी...
गुंफु दे गं हातामध्ये माझ्या तुझे दोन्ही हात
भिडु दे गं ओठालाही तुझे मधाचे गं ओठं..
लागु दे गं सुर आता..धुंद सप्तकात राणी...
दिस तर जातो जसा..रात नको विरहात..
मिठीतुनि पाहु दे ना..मंद कोवळी पहाट..
वाटे मग मी गं राजा..तु गं माझी पट्टराणी..
------------ योगेशु
प्रतिक्रिया
20 Sep 2009 - 1:02 pm | मी-सौरभ
सौरभ
:)