(बरे का, बरे का)

चित्रा's picture
चित्रा in जे न देखे रवी...
19 Sep 2009 - 12:54 am

आमचाही प्रयत्न. - प्रेरणा आणि

अता झोप येईल नक्की अकाली, बरेका बरेका
शिणलीत गात्रे अर्ध्या दुपारी, बरेका बरेका

मला गाठुनी ती अशी काही घेरी, कुणा काय सांगू
हापिसातूनी मज नेई घरी ती, बरेका बरेका

तिचे बुद्धिवंतांशी होतेच तंटे कळता मला अन
जमले मला होणे तिच्या हवाली, बरेका बरेका

नवे स्वप्न येता सहार्‍यास माझ्या म्हणाले स्वत:शी
जुन्या पांघरूणास नवी शान आली, बरेका बरेका

जुन्या त्या उशीला डोके मिळाले अखेरीस माझे
चला रात्रीची हीच सुरूवात झाली, बरेका बरेका

तिच्या गर्दडोहातल्या त्या स्थळी फसले अशी मी
उठूनी बसावे अशी बुद्धी गेली, बरेका बरेका

जरी वेळ माझा गेला बरासा, खरे सांगते मी
तुझ्या ओरड्यानेच जाग आली, बरेका बरेका

हास्यविडंबन

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

19 Sep 2009 - 1:59 am | चतुरंग

खल्लास!! :)
अभ्यासू आणि बर्‍याचदा गंभीर लेखन करणार्‍या साक्षात चित्राताईंनाही विडंबनाची लागण व्हावी हा मी विडंबनपंथाचा विजय समजतो!!
लगे रहो चित्राताई!!
जालावरी ह्या मिळे माल कच्चा, मुळी नाही तोटा बरे का बरे का! ;)

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Sep 2009 - 2:19 am | बिपिन कार्यकर्ते

साक्षात चित्राताई विडंबनाच्या क्षेत्रात!!! आणि इतके सुंदर विडंबन!!! वावावा!!!

=))

बिपिन कार्यकर्ते

रेवती's picture

19 Sep 2009 - 2:31 am | रेवती

काय चित्राताई? तू सुद्धा?
झोप चांगली लागलीये.:)

रेवती

चित्रा's picture

19 Sep 2009 - 3:40 am | चित्रा

धन्यवाद, मंडळी. पण विडंबन कसले? ओळीवर ओळ पाडत नेली आहे. (खरोखरच, म्हणजे वर योगेश यांची कविता ठेवली, आणि दोन कडव्यांच्या मधल्या जागेत माझ्या ओळी लिहीत गेले!) :)
अन कळाले मला की हे कठिण काम आहे, बरे का, बरे का?!

असो. तरी (जरा अधिकच) प्रोत्साहन दिल्याबद्दल आभारी आहे.

लवंगी's picture

19 Sep 2009 - 3:55 am | लवंगी

:)

श्रावण मोडक's picture

19 Sep 2009 - 4:58 am | श्रावण मोडक

माझी तर 'झोप उडाली'. हे क्षेत्र समृद्ध होत चाललं.

सहज's picture

19 Sep 2009 - 7:22 am | सहज

:O

जरी मान्य नाही फल जोतिषाचे, अता वाटते की
त्या शनि गोचरमधे तथ्य आहे, बरेका बरेका!!!

विसोबा खेचर's picture

19 Sep 2009 - 7:23 am | विसोबा खेचर

जरी वेळ माझा गेला बरासा, खरे सांगते मी
तुझ्या ओरड्यानेच जाग आली, बरेका बरेका

मस्त! :)

तात्या.

क्रान्ति's picture

19 Sep 2009 - 8:36 am | क्रान्ति

मस्त विडंबन!

"युरेका युरेका" किती कल्पना तू नव्या जागवील्या,
झोपेतही छान कविता मिळाली, अरे वा, अरे वा!;)

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

मदनबाण's picture

19 Sep 2009 - 8:54 am | मदनबाण

मस्त... :)

मदनबाण.....

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

दशानन's picture

19 Sep 2009 - 9:13 am | दशानन

हिहिहिहि !

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

अवलिया's picture

19 Sep 2009 - 9:32 am | अवलिया

बापरे !!!! :O

तुम्ही सुद्धा विडंबनात... ???? X(

नान्या दुसरे क्षेत्र शोध बाबा आता... लै काम्पिटीशन झाली... ! :?

काय करावे ???? हां एकतर वैचारिक लिहावे किंवा निमित्तानिमित्ताने निगेटिव्ह प्रतिसाद द्यावे... उडण्याचीही धास्ती नाही.. कसे ?? ;)

बाकी विडंबन झ क्का स !!! :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

कानडाऊ योगेशु's picture

19 Sep 2009 - 1:49 pm | कानडाऊ योगेशु

अदितीतैंच्या धाग्यावर सविस्तर प्रतिसाद दिलाच आहे.
विंडंबन आवडले. ह्यानिमित्ताने माझ्या साधारण रचनेची दखल घेतली गेली .
(दोन्ही घरचा कावळा उपाशी) पित्रा

चित्रा's picture

19 Sep 2009 - 5:21 pm | चित्रा

नाही हो, साधारण नाही, तुमच्या रचनेत काही लय/ठेका जाणवला, म्हणून विडंबन करावेसे वाटले. बाकी काही नाही. आणि हा माझा पहिलाच प्रयत्न आहे - विडंबनाचा. नाहीतर एरवी ताल, काना, मात्रा, सूर, लय, ठेका यांच्याशी माझा काहीएक संबंध नसतो, हे वरच्या प्रतिक्रियांमधून कळले असेलच. ;)

बाकी माझ्या नावाचे विडंबनही वेळेला धरूनच होते.

भोचक's picture

19 Sep 2009 - 6:08 pm | भोचक

चित्रातै, मस्त विडंबन. =)) :loll=))
(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
ही आहे आमची वृत्ती

प्राजु's picture

19 Sep 2009 - 8:20 pm | प्राजु

:O
सॉल्लिड चित्रा ताई.. विडंबन करणार्‍यांना आता जबरदस्त कांपिटीशन हाय !!!!
जरी वेळ माझा गेला बरासा, खरे सांगते मी
तुझ्या ओरड्यानेच जाग आली, बरेका बरेका

हे मस्त!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/