वस्तरा टी

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
16 Sep 2009 - 7:14 pm

"बाबा, नविन गाडी आली आहे बाजारात. लय भारी आहे. घेउ का"
नउ महिने झाले आधीचा रणगाडा घेउन. आता परत.
" ती छोटु ला देउ. आमचे अंडरस्टँडींग आहे. मी वापरायची नंतर त्याला द्यायची"
काय सांगतोस? तो पण तुझ्या लायनीला आला का? हे केंव्हापासुन?
"तुम्ही 'शोषीत महिला उद्धार 'संघाचे अध्यक्ष झालात तेंव्हापासुन"
अरे पण आता वस्तरा टी मोहीम सुरु आहे ना?
" अहो बाबा, वस्तरा टी नाही ऑस्टॅरीटी मोहीम. तुमची सदावर्ते बाईंची शिकवणी फुकटच गेली. इंग्लिश चे वांदे तसेच आहेत".
हो रे बाबा. काल मिटींग मधे साहेब इंग्लिश मधेच बोलला. त्यामुळे सगळे डोक्यावरुन गेले. पण एवढे कळले की सगळ्यांनी आता साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी चा विचार करायला पाहीजे. त्यामुळे आता ते गाडीचे सध्याला सोडुन दे.
" काय ठरले मिटींग मधे"
मिटींग झाल्यावर सगळ्यांनी शपथा घेतल्या. गोंडेकर त्याची सातामधली २ कुत्री एका कुत्र्याश्रमाला दान करणार आहे. त्याने बचत होईल म्हणतो. तु पण असेच काहीतरी सुचव. टीवी वाल्यांना बोलवु.
" बाबा, तुम्ही गडुस -मुंबई एस टी मधना प्रवास करा."
वेडा आहे का मी?
"अहो बाबा पुर्ण प्रवास करायचा नाही. फक्त १० किलोमिटर. चॅनेलवाले गेले की परत आपल्या मर्सीडिज मधे. महांडळाच्या अध्यक्षाला फोन करतो. त्यातल्या त्यात चांगली गाडी लावायला सांगतो."
हां मग चालेल.
आणखी दुसरे काय? तो धोंडे शास्त्री आजपासुन साधे सँडविच खाणार आहे. रशियन सॅडविच बंद. पाच सेक्रेटरी च्या ऐवजी आता दोनच. वांधे होणार बाबा त्याचे. रशियन सँडविच ची सवय वाईट रे.
" तुम्ही एक काम करा. उद्यापासुन ऑफिसला सायकल ने जा."
सिक्युरिटीचे काय?
"ते येतील मागुन गाडीने सिविल ड्रेस मधे. कोणाला काही कळणार नाही, फुल टू पब्लिसिटी"
ही चांगली कल्पना आहे. आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे विमानाने इकॉनॉमी मधुन प्रवास करायला पाहीजे असे ठरले आहे. माझे बुड कसे धरणार त्या सिटमधे.?
" अहो बाबा काही काळजी करु नका. मधला हात वर करायचा. बाजुची सीट रीकामी ठेवायची"
लय भारी डोक चालवतो तु.
" आणखी एक काम करु. संडासातले ए.सी काढुन टाकु. रेल्वे लाईनीच्या बाजुला बसलेली जनता बघुन तुमचे रुदय परिवर्तन झाले असे म्हणु"
व्वा. क्या बात है. दोन महीना कळ काढ. ही नौटंकी संपु दे. जिल्हा विकास योजना काढतो. तुझी गाडी आणि आईचा चपलाहार, आणि पदक हार दोन्ही निघेल.
" ठीक आहे. बाबा माझा तुमच्यावर विश्वास आहे, दोन महीने वाट बघतो."

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

रेवती's picture

16 Sep 2009 - 7:19 pm | रेवती

हम्म! बर्‍यापैकी समजलं.
कालच वाटलं की प्रभूसर एकदम गायब झाले की काय?:)

रेवती

अवलिया's picture

16 Sep 2009 - 7:20 pm | अवलिया

निवडणुकीला उभे रहाताय काय मास्तर..!
शुभेच्छा !!!

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विनायक प्रभू's picture

16 Sep 2009 - 7:34 pm | विनायक प्रभू

निवडणुकीला फक्त प्रामाणिक माणसे उभी राहाता अवलिया शेठ.

संजय अभ्यंकर's picture

16 Sep 2009 - 9:32 pm | संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

दशानन's picture

16 Sep 2009 - 7:22 pm | दशानन

क्या बात है ;)

संदीप चित्रे's picture

16 Sep 2009 - 7:22 pm | संदीप चित्रे

>> दोन महीना कळ काढ. ही नौटंकी संपु दे. जिल्हा विकास योजना काढतो. तुझी गाडी आणि आईचा चपलाहार, आणि पदक हार दोन्ही निघेल.

ह्या वाक्यांतच सगळं आलं !

सूहास's picture

16 Sep 2009 - 7:39 pm | सूहास (not verified)

सू हा स...

परिकथेतील राजकुमार's picture

16 Sep 2009 - 7:41 pm | परिकथेतील राजकुमार

वाह गुर्जी एकदम फर्मास !

बाकी तुम्ही कुठली गाडी वापरताय सध्या ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

विनायक प्रभू's picture

16 Sep 2009 - 8:05 pm | विनायक प्रभू

माझी आपली बस नंबर्१@१

योगी९००'s picture

16 Sep 2009 - 8:55 pm | योगी९००

मस्तच...

खादाडमाऊ

पिवळा डांबिस's picture

16 Sep 2009 - 10:26 pm | पिवळा डांबिस

यापासून प्रेरणा घेऊन आता आम्हीसुद्धा यापुढे मटणात बटाटे घालायचे नाहीत असे ठरवले आहे...
तेव्हढीच बचत.... बटाट्यांची!!!

पाषाणभेद's picture

17 Sep 2009 - 2:38 am | पाषाणभेद

तुमच्या मतदारसंघात दौर्‍यावर होते काय मास्तर? नाय कुठे प्रतिसादातपण दिसला नाही म्हणून विचारतो.

आपल गुपीत अस का उघड करताय?

राजकारण्यांची असली चालूगीरी एखादाच शशी थरूर सारखा बोलून जातो.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.

- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या