अलिप्त

अजिंक्य's picture
अजिंक्य in जे न देखे रवी...
15 Sep 2009 - 8:08 pm

न देणे, न घेणे, फुकाचे न खाणे,
कुणाच्या न वाटेत येणे मुळीही,
बरे काम माझे, बरी वाट माझी,
स्वत:च्याच विश्वात मश्गूल आम्ही ||१||

असे वाटले की लिहावे जरासे,
लिहावे जरा, पाठवावे कुठेसे,
तया सोडुनी या जगाच्या भरोसे,
विचारात होऊ पुन्हा दंग आम्ही ||२||

कधी आवडावीत काव्ये कुणाची,
दिसावी कधी झेप कोणा मनाची,
जरी दाद देऊ तया ताकदीची,
मनाच्या महाली असू गुंग आम्ही ||३||

न लाटात आम्ही, न वाळूत आम्ही,
सदा एकटे सागराच्या किनारी,
जसा सूर्य चाले सकाळी दुपारी,
तसे राहतो या अलिप्तात आम्ही ||४||

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

15 Sep 2009 - 10:00 pm | क्रान्ति

न लाटात आम्ही, न वाळूत आम्ही,
सदा एकटे सागराच्या किनारी,
जसा सूर्य चाले सकाळी दुपारी,
तसे राहतो या अलिप्तात आम्ही

मस्त! सही कविता आहे अगदी!

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

बेसनलाडू's picture

15 Sep 2009 - 10:42 pm | बेसनलाडू

कविता आवडली.
(स्वच्छंद)बेसनलाडू

प्राजु's picture

16 Sep 2009 - 12:22 am | प्राजु

एकदम सह्ही!!!

न लाटात आम्ही, न वाळूत आम्ही,
सदा एकटे सागराच्या किनारी,
जसा सूर्य चाले सकाळी दुपारी,
तसे राहतो या अलिप्तात आम्ही ||४||

हे खास!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अजिंक्य's picture

16 Sep 2009 - 9:03 am | अजिंक्य

मनःपूर्वक धन्यवाद.
अजिंक्य.

फ्रॅक्चर बंड्या's picture

16 Sep 2009 - 10:28 am | फ्रॅक्चर बंड्या

जसा सूर्य चाले सकाळी दुपारी,
तसे राहतो या अलिप्तात आम्ही

मस्तच

प्रशान्त भूशेट्टे's picture

16 Sep 2009 - 1:08 pm | प्रशान्त भूशेट्टे

खुप छान लिहिलीस!!!!!

स. न. वि. वि.'s picture

16 Sep 2009 - 3:11 pm | स. न. वि. वि.

व्वाह मालक...!! दिल्खुश हो गया...!!! ही तर ग झ ल जमुन आलीय...!!!

स. न. वि. वि.'s picture

16 Sep 2009 - 3:13 pm | स. न. वि. वि.

व्वाह मालक...!! दिल्खुश हो गया...!!! ही तर ग झ ल जमुन आलीय...!!!

अजिंक्य's picture

17 Sep 2009 - 2:29 pm | अजिंक्य

मनःपूर्वक आभार.
अजिंक्य.