"समूहात गाणं म्हणजेच तल्लीन होऊन गाणं.सहमूहात गाताना इतर वाद्दांची जरूरी भासत नाही.तसंच सर्वांमधे सामिल होऊन गाणं म्हटल्याने स्वतःला समूहात विलीन झाल्यासारखं वाटतं."
मी मधे खानोलीला जत्रा पहायला गेलो होतो.जत्रेला खूपच मजा आली.त्यानंतर मी एक आठवडा खानोलीत मुक्काम केला होता.विषेश करून मला खानोलीची समुद्रचौपाटी खूपच आवडते.आणि जास्तकरून घाटीच्या माथ्यावरून फेसाळलेला तो समुद्र पाहून मन प्रसन्न होतं.आठ दिवसाच्या मुक्कामात मी रोज घाटीवर चढून जात असे.रोज कोण ना कोण तरी गावातले प्रतिष्टीत बरोबर फिरायला यायचे किंवा वाटेत भेटायचे.असेच एकदा मला प्रमोद खानोलकर आणि त्यांचे स्नेही विजय खानोलकर भेटले.घाटी चढून जाताना आमच्या गप्पा झाल्या.ह्या दोघानी गावात एक भजन मंडळ स्थापलं होतं. आणि त्या भजन मंडळाची आणि संगीताची ते मला माहिती देत होते.
प्रमोद खानोलकर मला म्हणाले,
"आमच्या गावात भजन मंडळ आहे.गावातल्या जास्तीत जास्त लोकांना ह्यात सामील करून घेण्याच्या उद्देशाने मी आणि माझा हा मित्र कार्याला लागलो.त्यासाठी गाण्याचा अनुभव असण्याची जरूरी नाही हे आम्ही सर्वांना अगोदरच सांगितलं.
आमच्या भजन मंडळातले काही लोक तर कधीच पूर्वी गाईले नव्हते.आता आमच्या ह्या मंडळात जवळ जवळ पंधरा वीस लोक सामील झाले आहेत.
मी म्हणालो,
"मला वाटतं,गाण्याचे खूप फायदे आहेत.दिर्घ आयुष्य लाभण्याची ती एक गुरूकिल्ली आहे,शरिराला सौष्ठव येतं,स्वभाव संतुलीत राहतो,नवीन मित्र मिळतात,बुद्धिला चालना मिळते,हजरजबाबी व्हायला होतं.कुठेतरी माझ्या वाचनात आलं की संगीताने,आणि नृत्याने जीवन आनंदी आणि निरोगी राहतं."
प्रमोद खानोलकर माझ्या माहितीत भर घालीत म्हणाले,
"खरं तर,त्यात शारिरीक फायदे पण खूप आहेत.मुळात गाताना फुफ्फुसाचा एव्हडा वापर होतो की दिवसाभर्यात तेव्हडा वापर होणार नाही.उच्चस्वरात गाईल्याने गांभिर्यता कमी वाटून,संतुष्ट व्हायला होतं. समुहात गाईल्याने समुहाबद्दल जागरूकता येते.तल्लीन व्हायला होतं.मी-पण कमी होऊन आम्ही-पण येतं. समानुभूति येते ,नैतिकता वाढते.
रोज संध्याकाळी आमचा कार्यक्रम असा असतो.भरपूर पिण्याच्या पाण्याचे तांबे आणून ठेवतो, काही अल्पोहार असतो, भजनाची काही पुस्तकं असतात, काटेकोरपणे वेळेची आठवण ठेवतो आणि सुरवातीला थोडा जोश आणतो.
गाण्याची निवडही काटेकोर असते.शब्दसंपन्न असलेली,स्वर संपन्न असलेली,तालमेल असलेली,गाण्यात प्रकटन असलेली गाणी निवडतो."
विजय खानोलकर म्हणाले,
"आणि ज्यावेळी लोक तालमेल ठेवून लांब सूरात गातात तेव्हाच खरी मजा येते. उच्चस्वरात गाणं हेच काही सर्व नसतं. त्याला आणखी दोन पेहलू आहेत.पहिला ताल.सर्वानी मिळून ताल धरला की रोमांचकता येते आणि गाण्याची गती जेव्हा वाढते तेव्हा ते जास्त प्रभावशाली वाटतं.पण दुसरी गोष्ट जपावी लागते ती गाण्यातला भाव.गाण्यातला ताल आणि स्वर यांची सुसंगती सांभाळताना गाण्यातला भाव प्रभावी असावा लागतो.एकाच सूरात गाणं म्हटलं जात असताना आणि वेगवेगळी लय सांभाळताना जर सगळं जुळून आलं तर ब्रम्हानंदच होईल."
मला पण थोडसं बोलावं असं वाटलं.मी म्हणालो,
"अशा तर्हेची समुहातली गाणी जर का शाळेत गाईली गेली तर मला वाटतं, लहान मुलांच चारित्र विकसीत करता येईल, आणि त्याहीपेक्षा त्यांच्याकडून सहकार्याला प्रोत्साहन मिळेल. तुम्ही त्या दृष्टीने तुमच्या गावातल्या शाळेत हा प्रयोग करून पहावा."
हे सगळं ऐकून मला गावात कसे लोक आपला वेळ घालवतात आणि भजनासाठी भजन नसून त्याचा सामाजीक दृष्टीने कसा विचार करतात हे खानोलकरांकडून ऐकून बरं वाटलं.मी त्यांना म्हणालो,
"तुमचा संगीता बद्दलचा अभ्यास माझ्या दृष्टीने खूपच खोलवर आहे.मला तुमच्याकडून बरचसं शिकायला मिळालं.तुमच्या नवीन नवीन प्रयोगाला माझ्या शुभेच्छा"
श्रीकृषण सामंत
प्रतिक्रिया
15 Sep 2009 - 9:17 am | प्रकाश घाटपांडे
गावात हरिपाठ व भजन नेहमीच व्हायचे. बाळमिस्त्री आपल्या भसाड्या आवाजात तल्लीन होउन भजन म्हणत असत. पखवाज अच्युत, पेटीवर झुंबरशेट किंवा दिना
तुहा इठ्ठ लबरवा तुहा माध वबरवा
तुहा इठ्ठल बरवा तुहा माधव बरवा
यात 'ल' आणि 'व' तोडण्याची मजा ही भजनाच्या लयीत ऐकताना मजा यायची.
स्मृतीरंजनात जगलेल्या आयुष्याचे नवे अर्थ उलगडु लागतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
15 Sep 2009 - 4:35 pm | नरेंद्र गोळे
सुंदर विवेचन!
समुहात गात असतांना परस्परांचे सूर,
परस्परांच्या सुरांशी आपसुकच सुसंगती साधत जातात.
उच्चारा, श्रवणांच्या पद्धतींना
सामुहिक सुसंगतीचे आपसुकच वळण लागते.
तल्लीनता प्राप्त होते, संतोष दुणावतो.
भीड चेपते आणि आत्मविश्वास बळावतो.
समुहगानांची परंपरा असणार्या आपल्या संस्कृतीचा,
समष्टीजीवन हा तर पायाच आहे.
आपल्या समुहाच्या सामुहिक गायनाने,
समाज अधिकाधिक समृद्ध होवो हीच प्रार्थना!
15 Sep 2009 - 4:49 pm | नरेंद्र गोळे
सामुहिक उच्चारवाकरता हा एक संकल्प!
15 Sep 2009 - 10:37 pm | हेरंब
दीर्घ शब्द दिर्घ लिहिल्याचे खटकले.