सुवर्ण गणेशाचा वरदहस्त -दिवेआगर

सुनिल पाटकर's picture
सुनिल पाटकर in जनातलं, मनातलं
14 Sep 2009 - 10:00 pm

सुवर्ण गणेशाचा वरदहस्त -दिवेआगर
निळाशार अथांग समुद्र ,गर्द माडाची बने, आणि नारळ सुपारीच्या झावळ्यात लापलेली ती सुन्दर कौलारू घरे …गावातून जाणारे सुन्दर रस्ते दुतर्फा हिरवाइने नटलेले.. कौलारू घरांबरोबर उठून दिसणारे काही टुमदार बंगले …असा रमणीय निसर्ग लाभालाय॥, तो दिवेआगर गावाला।
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे एक छोटसे गाव। अलिकडे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होतेय ।निसर्गाने दिलखुलासपणे दान दिलेल्या दिवेआगाराला परमेश्वराचाही वरदहस्त लाभाला आहे .येथील मुख्य आकर्षण आहे सुवर्ण गंणेश . द्रोपदी पाटिल या महिलेच्या बागेत जमीन खोदण्याचे काम सुरु असताना एक लोखंडी पेटीत गणपतीची सोन्याची मूर्ती सापडली .सुमारे १००० वर्षापूर्वीची ही मूर्ती असुन ५२ कशी सोन्याची १.३२ कि वजनाची आहे. १७-११-१९९७ रोजी ही मूर्ती सापडली सोबत काही सोन्याचे दागीनेही होते चमत्कार म्हणजे १७-११-९७ या दिवशी संकष्टी चतुर्थी होती .मराठीतील पहिला ताम्रपटही दिवेआगरमध्ये सापडला आहे. या निसर्गरम्य गावाला अरबी सागाराचा ५ कि।मि.चा अतिशय सुन्दर,स्वछ आंणि सुरक्षित किनारा लाभाला आहे.या किनार्‍यावर केवाड्याची बने आहेत .या गावात एकुण पाच ताम्रपट व एक शिलालेख सापडला आहे.सुवर्ण गणेश सापडलेल्या बागेत मराठीतील पहिला ताम्रपट सापडला आहे .येथील सुपारी सर्वोत्तम सुपारी मानली जाते .येथे विविध प्रकाराची फुलझाडे आहेत.अनेक रंगांच्या जास्वंदीची फूले व पपनासाची फळे पहावयास मिळतात .दिवेआगारचे नारळपाणीही दिवेआगारमध्ये माघ.शु.चार ला गंणेश जन्मोस्तव तर सुवर्ण गंणेशाचा प्रकटदिन कार्तिक वद्य ४ ला साजरा होतो. सिद्धनाथ , केदारनाथ यांच्या चित्र महिन्यात होणार्‍या यात्रेमध्ये माणसाच्या पाठिला गल टोचून गरागरा फिरवले जाते.हां खेळ पाहाण्यासाठी मोठी गर्दी होते. दिवेआगरमध्ये रुपनारायाण ,उत्तरेश्वर ,पंचमुखी महादेव यांची मंदिरे पाहण्याजोगी आहेत.
दिवेआगरमध्ये राहण्यासाठी एम.टि.डि.सी ,व खाजगी हाँटेल आहेत.घरगुती जेवण व राहण्याची सोय आहे .

प्रवासमाहिती

प्रतिक्रिया

अंतु बर्वा's picture

14 Sep 2009 - 10:16 pm | अंतु बर्वा

दिवे आगारला खरोखरच फार स्वच्छ किनारा लाभला आहे...
आतापर्यंत चार वेळा जाउन आलोय... आणी प्रत्येक वेळी पुन्हा येन्याचा संकल्प करुनच... :-) ... जमलं तर माझ्याकडचे काही फोटोज टाकीन या धाग्यावर...

सुनिल पाटकर's picture

14 Sep 2009 - 10:38 pm | सुनिल पाटकर

जरुर टाका

विशाल कुलकर्णी's picture

15 Sep 2009 - 10:19 am | विशाल कुलकर्णी

आम्ही देखील वेळ मिळाला की दिवेआगारला पळतो. विकांताचे दोन दिवस मस्त जातात. दिवे आगारला काढलेले काही फोटो ....

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

प्रभाकर पेठकर's picture

15 Sep 2009 - 10:45 am | प्रभाकर पेठकर

दिवेआगाराचे 'विशाल' दर्शन झाले.

आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

स्मिता श्रीपाद's picture

15 Sep 2009 - 11:55 am | स्मिता श्रीपाद

छान माहिती...
पण कॄपया तिथे पुण्यातून्/मुंबईतून जाण्यासाठी रस्ता,अंतर,रहाण्याच्या सोयी,हॉटेल्स चे टेलिफोन नंबर्स ईत्यादी माहिती पण द्यावी...

या वर्षी दिवेआगार ला जायचा विचार आहे :-)

चित्रा's picture

16 Sep 2009 - 5:34 am | चित्रा

फोटो छानच आहेत, वरून चौथा फोटो कसा काढला, का नंतर काही संस्करण केले आहे?

विशाल कुलकर्णी's picture

17 Sep 2009 - 3:02 pm | विशाल कुलकर्णी

प्रकाटाआ ;-)

विशाल कुलकर्णी's picture

17 Sep 2009 - 3:01 pm | विशाल कुलकर्णी

चित्रा, तो नॉर्मल फोटो आहे. समुद्रकिनारी पसरलेली रेती आहे ती. कसलेही संस्करण केलेले नाही.

स्मिता

पुण्याहुन येणार असाल तर साधारण १६५ किमी आणि मुंबईवरुन येणार असाल तर साधारण १८० किमी अंतर आहे. (बाय रोड)
गुगलमॅपवर पुर्ण मॅप मिळेल.

बस किंवा एस.टी. ने यायचे झाल्यास ....

राहण्यासाठी घरोघरी सोय आहे. काही हॉटेल्सही आहेत. गुगलुन बघा मिळेल बरेच काही. आम्ही तिथे श्री. केळकरांकडे उतरलो होतो.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

स्मिता श्रीपाद's picture

17 Sep 2009 - 3:55 pm | स्मिता श्रीपाद

धन्यवाद विशाल...

आपला अभिजित's picture

17 Sep 2009 - 3:37 pm | आपला अभिजित

ब्रोकन इमेज दिसत्येय!

शेजार्‍याचा क्यामेरा नेला होता काय?

अंतु बर्वा's picture

17 Sep 2009 - 8:22 pm | अंतु बर्वा

>>>ब्रोकन इमेज दिसत्येय!

पिकासाची लिंक दिली आहे. (पण मला अजुनही कळलेला नाहीये की वरील फोटोंप्रमाणे माझे फोटो ईथे का बरं दिसत नसावेत...?)

>>>शेजार्‍याचा क्यामेरा नेला होता काय?
अहो खरोखरच मित्राचा क्यामेरा नेला होता... :-) काय करनार नुकताच जॉब लागलेला होता ना...