"वाढदिवसच्या हार्दीक शुभेच्छा" आशाताई शतायुषि होवोत आणि त्यांचे गाणे त्यांच्या हयातीत आमच्या नातवंडांनाही ऐकायला मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना .
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
माझ्याही शुभेच्छा!
या निमित्तानी आशाताइनी गायलेली काही आवडती गाणी -
कादंबरी - अंबर की इक पाक सुराइ
ग्रेट गँबलर - दो लब्झों की
ये रात फिर न आयेगी - यही वो जगह है
आपण तर साला जाम मानतो या बयेला..!
घरात मोठी बहीण एवढी उत्तम गाणारी म्हटल्यावर एखाद्या बयेचा धीरच खचला असता. पण आशाताईंनी अपार मेहनत, कष्ट करून, मोठ्या जिद्दीने स्वत:चे असामान्यत्व सिद्ध केले, स्वत:चा असा एक खूप मोठा चाहता वर्ग बनवला. आज परिस्थिती अशी आहे की जी गाणी आशाताईंची आहेत ती केवळ त्यांचीच आहेत आणि त्यांवर खास त्यांच्या गायकीची अशी एक मुद्रा आहे...
जिद्द, मेहनत, कष्ट या बाबतीत ज्यांना आदर्श मानावं, संगीताच्या दुनीयेत स्वत:चं नाव सुवर्णाक्षरांनी कोरणार्या आमच्या मराठमोळ्या आशाताईंना माझा मानाचा मुजरा...!
त्यांना वाढदिसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. ईश्वर त्यांना सुखाचे, उत्तम प्रकृतीस्वास्थ्याचे आयुष्य नेहमीच देवो अशी प्रार्थना..
(आशाताईंचा चाहता) तात्या.
ह्या मंगेशकर कुटुंबाला प्रतिभेचा खास दैवी स्पर्श झालेला आहे. त्याच बरोबर त्यांची जिद्द, मेहनत, कष्ट हे सर्व आहेच. हे जे काही त्यांना लाभले आहे, त्यासाठी त्यांना खूप झगडावे लागले आहे. पंजाबी आणि बंगाल्यांनी जम बसवलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान, केवळ स्वःगुणांच्या बळावर मिळवणार्या मर्हाठी आशाबाईंना सलाम!!
त्यांच्या आयुष्याचा ह्यापुढील प्रवास सुकर होवो; उत्तम शारिरीक स्वास्थ्य व मनःशांती त्यांना लाभो, अशी देवाजवळ प्रार्थना करतो.
नाट्यसंगीतापासून ते लावणीपर्यंत, सुगम संगीतापासून ते चित्रपटसंगीतापर्यंत अनिर्बंध वावर असलेल्या आणी गेली पाच तपं यच्चयावत गानप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या ह्या गानतपस्विनीला मानाचा मुजरा! =D>
(अभीष्टचिंतक)चतुरंग
आशाताईंना वाढदिवसाच्या सस्नेह शुभेच्छा
एक सुधारणा सुचवू इच्छितो.. आशाताईंचा आज ७६ वा वाढदिवस आहे.. ७७ वा नाही.
असो, त्या 'सदाबहार' आहेत ह्यात शंकाच नाही!!
-
कोकणी फणस
प्रतिक्रिया
आशाताई
+१
"वाढदिवसच्
हेच म्हणते..
+२
चला रिन्ग
"वाढदिवसच्
माझ्याही
सलाम..!
अगदी असेच म्हणतो
अगदी ! अगदी !!
शुभेच्छा..
आशाताईंना लक्ष लक्ष शुभेच्छा!
आशाताई : खेळत आहेत - ७६