खुप दिवसांनी रिकामा वेळ मिळाला.
९.३० वाजेपर्यंत झोप काढली.
दादरला जायचे होते.
पण ते दुपारी ३ नंतर.
त्यामुळे आता करायचे काय हा प्रश्न उभा राहीला.
'सर्वसाधारण गृहस्थ 'ही भुमिका निभावुया आज असे वाटले.
हातात झाडु घेतला.
घरातली जळमटे कढली.
जास्त नव्हती.
लगेच आटोपले.
संडास बाथरुम पावडर टाकली.
रद्दी विकुन आलो.
ट्युबलाईट बदली केली.
ब्रशने संडास बाथरुम साफ केले.
जवळ जवळ १० वर्षाने 'नॉर्मल हजबंड' ची कामे करताना बघुन सौ. ला कौतुकाचा पारावार उरला नाही.
लगेच उडदाच्या खिचडीवर फोडणीचे दही अशी न्याहरी मिळाली.
खिचडी खाता खाता पुढील येणार्या संकटाची कल्पना सुद्धा नव्हती.
" काय हो, तुम्हाला ते गाणे माहीत आहे का"/
कुठले?
"थोडासा बदल करुन सांगते. मी कधी अयकले नव्हते. पण काल एफ्.एम वर ३ दा कानावर पडले"
तुम जब होंगे साठ सालके
और हम होंगे पचपन की
बोलो प्रित निभाओगे ना
तब भी अपने बचपन की
इथे बचपनच्या ठिकाणी लग्नानंतरच्या पहील्या १० वर्षाच्या कालावधीबद्दल बोलते आहे.
थांब हां. ही खिचडी संपवतो आणि तुला उत्तर देतो.
तेवढाच १० मिनिटाचा वेळ मिळाला.
"प्रामाणिक उत्तर द्या"
हो
नीट विचार केला.
संपुर्ण प्रामाणिकपणा ही गोष्ट वैवाहिक जिवनात अशक्य गोष्ट आहे ह्या मताचा मी आहे.
पुढच्या वर्षी आपल्या लग्नाला २५ पुर्ण होतील नाही का? मला विचारशील तर तुझ्याबाबतीत आजही तेवढाच आदर आणि सन्मान आहे जो २५ वर्षापुर्वी होता. आता वयोमानानुसार थोडे फार इथे तिथे होते त्याचे मला फारसे काहीही वाटत नाही. राहता राहीला प्रश्न प्रामाणिक पणाबद्दल. आजपर्यंत राहीलो. शेवटपर्यंत राहीन अशी अपेक्षा तु बाळगायला हरकत नाही. आणि तसे वेगळ काही झाले तर सर्वात प्रथम तुला सांगीन. त्याला तु आक्षेप घ्यावा का नाही हे तुझ्याकडे लागले. माझ्यासारख्या "तोंडाळ" माणसाच्या बाबतीत हे अपघात कधीही होउ शकतात. आजपर्यंत झाला नाही हा निव्वळ योगायोग असेल. एखाद दुसरा पाढरा केस सोडला तर तु तशीच आहेस दिसायला. आजकालची लग्ने २ वर्षात थकतात. नाहीतर यांत्रिक होतात. तसा प्रकार काहीही आपल्या बाबतीत झालेला नाही नाही. त्यामुळे तसे काहीही होण्याचे कारण आहे असे मला वाटत नाही. काय म्हणतेस बोल?
सौ. काहीही बोलली नाही.
ऑफिसला जाताना बदामाचा शिरा मिळाला.
काय मंडळी दिलेले उत्तर बरोबर आहे ना?
तुमच्यावर हा प्रसंग आला तर तुम्ही काय उत्तर द्याल.
प्रतिक्रिया
7 Sep 2009 - 12:50 pm | विजुभाऊ
जाताना बदामाचा शिरा मिळाला ! :)
घरी आल्यावर पुरी श्रीखंडाचा नैवेद्य सुद्धा मिळेल ;)
आणि मनातून ( आलं आमचं यडं.. अजून यडंच र्हायलय बिच्चार..च च च कसं का असंना मनानं खूप प्रेमळ आहे) अशी सहानभूती असेल
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
7 Sep 2009 - 12:51 pm | प्रभाकर पेठकर
मनाची रसिकता हवी. ती असेल तर शरीर जरा जास्तच साथ देते. मनी रसिकतेचा झरा आटला असेल तर .... वाळल्या फुलात व्यर्थ गंध शोधितो पुन्हा.... अशी अवस्था व्हायची.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
12 Sep 2009 - 6:29 pm | दशानन
क्या बात है सर :)
खुप छान ओळी लिहल्या आहेत तुम्ही !
**
बाकी प्रभुसरांच्याबदल काय लिहू !
नेहमी प्रमाणेच क्रिपटिक !
7 Sep 2009 - 1:01 pm | कानडाऊ योगेशु
सर तुमचे उत्तर आवडले.
पती पत्नी एकदा मित्रत्वाचे नाते निर्माण झाले कि कुठल्याही समस्येवर यशस्वी तोडगा काढता येतो.(कुठेतरी वाचले आहे.)
..
7 Sep 2009 - 1:07 pm | प्रभाकर पेठकर
पती पत्नी एकदा मित्रत्वाचे नाते निर्माण झाले
ते तर लग्ना नंतर होतेच पण म्हणतात नं, मैत्री करणं जितकं सोप्प असतं तितकच ती टिकवणं भयंकर अवघड असतं.
आणि 'सर' काय? उगीच डोक्यात भलतीच हवा शिरायची.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
7 Sep 2009 - 1:30 pm | फ्रॅक्चर बंड्या
मस्तच
जाताना बदामाचा शिरा मिळाला हे पण मस्तच
7 Sep 2009 - 1:52 pm | अवलिया
ऑफिसला जाताना बदामाचा शिरा मिळाला.
योग्य औषधोपचार. ३० दिवस रोज पहाटे खाल्यास लेखनातला परभु टच पुढील लेखनात मिळावा.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
12 Sep 2009 - 6:47 pm | टारझन
रोज कांद्याचा ज्युस चालू ठेवा मास्तर !
शिरा वगैरे खाऊन मेद वाढू शकतो ... सुर्यणमस्कार आणि जोर-बैठकांची सवय असल्यास उत्तम
-(कांदाप्रेमी) टारोबा ज्युसर
13 Sep 2009 - 8:36 am | डॉ.प्रसाद दाढे
वा वा... बर्याच दिवसांनी जरा इंटरेस्टींग वाचायला मिळतंय.. नाहीतरी नसती भांडणं वाचून वैताग आला होता ;)
कांद्याने तोंडाला फार वास येतो रे टार्या, त्यामुळे तो 'अश्या' वळी टाळावा..'इतर' वेळी खायला हरकत नाही.. त्यापेक्षा बदामाच्या शिर्यात थोडे केशरही घालावे (आगीत पेट्रोल टाकतात तसे ;)
बाकी पु.ले.शु!!
13 Sep 2009 - 10:08 am | वेताळ
मार्गदर्शना बद्दल धन्यवाद.
वेताळ