हेरंबा... आरंभा... वंदन विघ्नेशा
शिवसुता मज तुझी कृपाभिलाषा
अष्टौप्रहरी चित्ती तव नामघोषा
नतमस्तक श्रीचरणी भक्त सर्वेशा
जय देव जय देव जय बुद्धीदाता
ओवाळू आरती विश्वाच्या नाथा || जय देव||
साजिरी गोजिरी मोहक मुर्ती
चराचराची चैतन्यस्फुर्ती
गजमुख ज्ञानेश्वरा तू इच्छापुर्ती
अंतरी उधाण मांगल्यभरती
जय देव जय देव जय बुद्धीदाता
ओवाळू आरती विश्वाच्या नाथा || जय देव||
विराजे मंचकी आदी अंतिमा
चतुर्भुज सुशोभित प्रतिमा
तेजाने ओजाने दग्ध काळिमा
दिव्यप्रभांकीत मुखचंद्रमा
जय देव जय देव जय बुद्धीदाता
ओवाळू आरती विश्वाच्या नाथा || जय देव||
वक्रतुंडाहाती मोदक ज्ञानाचा
परशू करी नाश अवघ्या विघ्नांचा
हर्ता अंकुश धारी षडरिपूंचा
शुभाय आशिष देई सौख्याचा
जय देव जय देव जय बुद्धीदाता
ओवाळू आरती विश्वाच्या नाथा || जय देव||
प्रतिक्रिया
31 Aug 2009 - 11:17 am | नाना बेरके
विश्वाच्या नाथा, तुज नमो
तुज नमो, तुज नमो
31 Aug 2009 - 11:27 am | प्रमोद देव
एक दोन ठिकाणी मात्रा कमी जास्त झाल्यासारखे वाटतंय.
पण एकूण रचना मस्त झालेय.
चाल लावावी काय? :?
विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
1 Sep 2009 - 9:45 am | विशाल कुलकर्णी
गणपती बाप्पा मोरया !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"