विजय मल्या - खरे भारतीय !

सचीन जी's picture
सचीन जी in जनातलं, मनातलं
30 Aug 2009 - 7:32 pm

स्टार न्युज वर आत्ताच पाहीलेली बातमी -
फोर्स इंडिया टीमच्या फिशीकेलाने पोल पोझिशनने सुरवात करत बेल्जियम फॉर्म्युला वन ग्रां प्रीत दुसरे स्थान मिळवले.
फोर्स इंडिया ही किंग फिशरचे किंग विजय मल्या यांची फॉर्म्युला वन टीम आहे. फॉर्म्युला वनमधे हे भारतीयांचे पहिले यश आहे.
फॉर्म्युला वन सारख्या महागडया खेळात स्व:ताची टीम तयार करुन, परदेशी ड्रायव्हर पदरी ठेउन यश मिळवत या खेळात भारताचे नाव
उज्ज्वल केल्याबद्दल विजय मल्या यांचे अभिनंदन! फोर्स इंडियाच्या गाडीबरती, फिशिकेलाच्या पोशाखावरती इतकेच नाही तर विजय मल्या
यांच्या हेडफोनवरही तिरंगा विराजमान आहे.
माझ्यामते आज क्रीडादीनी बेल्जियमधे तिरंगा लेहरावणारे विजय मल्या हे खरे भारतीय आहेत!

अगदी याच वेळची आज तकवरची बातमी -
फॉर्म्युला वन खेळाचा प्रसार भारतात व्हावा या उद्देशाने सुरु झालेल्या ४५०० कोटीच्या प्रकल्पात भ्रष्टाचाराची आशंका -
सुरेश कलमाडींवर आरोप!

जय हो!
सचीन जी!

समाजविचार

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

30 Aug 2009 - 7:36 pm | मदनबाण

हो आत्ताच पाहिली ही बातमी. :)
जय हो !!!!!!!!!!!!!!

(एन एफ एस क्रेझी)
मदनबाण.....

Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

विसोबा खेचर's picture

31 Aug 2009 - 12:04 am | विसोबा खेचर

विजय मल्या - खरे भारतीय !

बापूंच्या वस्तू परदेशातून सोडवून आणायची वेळ आली तेव्हा मल्ल्याच पुढे झाला एकटा!

तात्या.

वि_जय's picture

31 Aug 2009 - 4:53 pm | वि_जय

बापूंच्या वस्तू परदेशातून सोडवून आणायची वेळ आली तेव्हा मल्ल्याच पुढे झाला एकटा!

हे बापूंचे दुर्दैव कि देशाचे???
ज्या बापुंनी आयुष्यभर मद्यबंदी चळवळ केली त्या बापूंच्या वस्तू आणण्यासाठी एका मद्यसम्राटाचीच मदत घ्यावी लागली.

बापुंचे नाव घेत जोगवा मागणार्‍या काँग्रेसवाल्यांना जरासुध्दा शरम वाटू नये?

मिपावरील राजकीय मुत्सुद्यांना काय वाटते?

आशिष सुर्वे's picture

31 Aug 2009 - 1:21 am | आशिष सुर्वे

विजय मल्यांचे अभिनंदन!!

-
'WRC' चा भक्त असलेला..
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

भडकमकर मास्तर's picture

31 Aug 2009 - 2:55 am | भडकमकर मास्तर

" त्ये राँवराँव आवाज करत गाड्या पळवण्याचा कस्ला हो खेळ?
.. पेट्रोल नासायचे धंदे... भारत देशात परवडतं वाटतं हे? .. आणि हो, ते खरे भारतीय तर मग आम्ही एकसूत्री शर्यती न पाहणारे काय खोटे भारतीय काय?""
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

चतुरंग's picture

31 Aug 2009 - 4:27 am | चतुरंग

हा प्रतिसाद मात्र एकदम र्‍हुदयाला भिडला बरं का मास्तर! ;)

(फॉर्म्यूला)चतुरंग

सुधीर काळे's picture

31 Aug 2009 - 4:59 pm | सुधीर काळे

१०० टक्के सहमत!
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

बापूंच्या वस्तू परदेशातून सोडवून आणायची वेळ आली तेव्हा मल्ल्याच पुढे झाला एकटा हे मात्र १०० टक्के पटलं! दुर्दैवाने सधन गुजराती समाज व गुजरात-गौरव नरेनभाई पण पुढे आले नाहींत. (अर्थात नरेनभाई व गांधीजींचे विळ्या-भोपळ्याचेच सख्य). पण एक कासरगोडचा मल्ल्या पुढे आला यासाठी त्याची करावी तितकी तारीफ कमीच!
पण "राँवराँव आवाज करत गाड्या पळवण्या"च्या खेळाबाबत भडकमकर मास्तरांशी १०० टक्के सहमत.
भडकमकर मास्तरांचे "Formula-1"चे "एकसूत्री शर्यती" हे मराठीकरणही आवडले
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

पाषाणभेद's picture

31 Aug 2009 - 8:41 am | पाषाणभेद

ते मजा करतात हो. मोठे लोक ठरवून काही लगेच करत नाही. त्यांचे पिए ठरवतो कोणते कपडे घालायचे, काय बोलायचे ते. आणि असल्या घाई गर्दीत त्या टोप्या, कुडते देतात ते घालावेच लागते. प्राईस सेरेमनी ला वेळ लागत नसतो. वेळ कमी असतो तेथे.
त्यामुळे "आमूक आमूक क्रिकेटरच्या टोपीवर भारताचा तिरंगा नव्हता" या टाईपच्या बातम्या येतच असतात. केवळ तिरंगा आहे म्हणून भारतीय हा समज चुकीचा आहे. आता मी तिरंगा केवळ १५ ऑगस्ट व २६ जानेवारी ला हातात घेतो ते पण माझ्या पोराला विकत घेतांना म्हणून मी काय अभारतीय होतो काय ईतर वेळेला?

हां, बाकी त्यांना परवडते म्हणून ते असले महागडे खेळ खेळतात, बाकी काही नाही. परवडते म्हणून बापूंच्या चपला घेतात, परवडते म्हणून टिपू ची तलवार घेतात, परवडते म्हणून दरवर्षी मस्त मस्त ललनांना घेवून कॅलेंडरं काढतात. मजा करतात. आपण दरवर्षी कॅलेंडरं काढू का?

हं! काहीतरीच आपल.

ऋषिकेश, आता "नव्या वर्षांचं चल काढू या कॅलेंडरं" हे गाणं एकवा बुवा. पण लक्षात ठेवा: -"दोन वाहनांमध्ये सुरक्षीत अंतर राखा."

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

आशिष सुर्वे's picture

31 Aug 2009 - 12:15 pm | आशिष सुर्वे

वरील सर्व प्रतिक्रिया वाचून सहज मला 'तरूण तुर्क, म्हातारे अर्क' ह्या नाटकातले 'मोहन जोशीं'च्या तोंडचे एक वाक्य आठवले.

''या, ह्या जवानीची दिवाळी साजरी होतेय, आतषबाजी चालू आहे.
अरे नाही स्वत:ला एखादा फटाकडा फोडता येत.. बाकीचे फोडतायत, कमीतकमी ताळ्या तर वाजवा!''

ह्यातला गाभार्थ लक्शात आला तरी पुरे!!
-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

सखाराम_गटणे™'s picture

31 Aug 2009 - 12:27 pm | सखाराम_गटणे™

विजय मल्याचे नको, सगळ्या दारुड्यांचे अभिनंदन करा.
कारण दारुडे आहेत म्हणुन विजय मल्या आहे.

ऋषिकेश's picture

31 Aug 2009 - 1:25 pm | ऋषिकेश

बातमी कालच लाईव्ह पाहिली होती :)
एका भारतीय व्यक्तीच्या कंपनीची झेप बघुन खूपच बरे वाटले. मल्ल्या यांचे अभिनंदन!
(एफ१ टीम एखाद्या देशाचे प्रतिनिधित्त्व करत नसते त्यामुळे केवळ त्या कंपनीचे भारतीय मालक मल्ल्या यांचे अभिनंदन)

ऋषिकेश
------------------
दूपारचे १ वाजून २३ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुवचन "कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला.. थांबला तो संपला| धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे...."

निखिल देशपांडे's picture

31 Aug 2009 - 2:04 pm | निखिल देशपांडे

(एफ१ टीम एखाद्या देशाचे प्रतिनिधित्त्व करत नसते त्यामुळे केवळ त्या कंपनीचे भारतीय मालक मल्ल्या यांचे अभिनंदन)

हा मुद्दा मान्य आहे... पण जेव्हा एखादी टिम पहिल्या स्थानावर असते तेव्हा बक्षिस वितरणाच्या समारंभात त्या टिमच्या देशाचे राष्ट्रगीत वाजवण्यात येते. ह्याचा अर्थ काल जर फिस्सिकेला पहिला स्थानावर आला असता तर त्या गाडीचे कन्स्ट्रकक्टर म्हणुन फॉर्स इंडिया ला सुद्धा बक्षिस मिळाले असते. जर मल्याचा संघाने त्यांचा देश म्हणुन भारताचे नाव घेतले असते तर नक्कीच भारतचे राष्ट्र्गीत वाजले असते.
असो ह्यावर अजुन माहिती काढत आहे. जर काही चुकिचे असेल तर भर टाकावी.

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आलयावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

ऋषिकेश's picture

31 Aug 2009 - 2:45 pm | ऋषिकेश

जर काही चुकिचे असेल

तुमचे बरोबर आहे. तसे झाले असते तर (काश!!)भारताचेच राष्ट्रगीत वाजले असते. (आणि म्हणून मला आनंद झालाच)
फक्त ह्या खेळात एखादा देश भाग न घेता एक व्यावसायिक कंपनी भाग घेते त्यामुळे मी अभिनंदन त्या कंपनीचं व त्या कंपनीच्या भारतीय मालकाचं केलं, इतकंच :)

-ऋषिकेश

निखिल देशपांडे's picture

31 Aug 2009 - 3:00 pm | निखिल देशपांडे

मी मुद्दा आधीच मान्य केला आहे :-)
फक्त आपल्याला आनंदी व्ह्यायला कारण काय??? हे शोधत होतो म्हणुन काही तरी स्पष्टीकरण ;)
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आलयावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

शाहरुख's picture

1 Sep 2009 - 12:58 am | शाहरुख

मध्यंतरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा संघ म्हणजे भारत देशाचा अधिकृत क्रिकेट संघ नव्हे असा गदारोळ झाला होता..संघाचे नाव-बिव बदलण्यासाठी कुणीतरी याचिका दाखल केली होती..

एक जेन्युअन प्रश्नः- जनहित याचिका दाखल करणे ही सरकारने मोफत दिलेली सोय आहे का ?

ऋषिकेश's picture

1 Sep 2009 - 9:43 am | ऋषिकेश

एक जेन्युअन प्रश्नः- जनहित याचिका दाखल करणे ही सरकारने मोफत दिलेली सोय आहे का ?

ही सोय सरकारने दिलेली नसून घटनेने प्रत्येक भारतीय नागरीकास दिलेली आहे. इतकेच नव्हे तर कोर्ट गरज वाटल्यास वृत्तपत्रांतील बातमी, न्यायाधीशांना लिहिलेले पत्र हे दस्तऐवज स्वतःहून जनहित याचिका म्हणून दाखल करून घेऊ शकते.
अर्थात जर एखाद्याला ही याचिका दाखल करायची असेल तर काहि चौकटीत ती बसणे आवश्यक आहे. तसेच नाममात्र कोर्ट फी त्यावर बसते त्यामुळे पूर्ण मोफत म्हणता येणार नाहि.

-ऋषिकेश

दिपक's picture

31 Aug 2009 - 1:43 pm | दिपक

विजय मल्ल्या यांचे अभिनंदन! :)

विजय मल्या - खरे भारतीय ! हे आयर्लंडचा ध्वज असलेल्या कठड्यापाशी काय करतायत?

ऋषिकेश's picture

31 Aug 2009 - 3:36 pm | ऋषिकेश

ध्वज अभारतीय (इटालियन) आहे कारण फिस्सी त्या देशाचा आहे. चित्रातील ध्वज हा (नाव, नंबर वगैरेबरोबर) त्या खेळाडूचे राष्ट्रीयत्त्व दाखवत आहे.

ऋषिकेश
------------------
दूपारचे ३ वाजून ३३ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "झंडा उंचा रहे हमारा...."

पाषाणभेद's picture

31 Aug 2009 - 2:49 pm | पाषाणभेद

म्हणजेच स्टार न्युज वर दाखवलेल्या बातमीत हाच आयर्लंडचा ध्वज होता की काय?

तसे असेल तर आपला पोपट केला सगळ्यांचा. आयर्लंडचा ध्वज व आपला ध्वजाचे रंग जवळपास सारखेच आहेत. त्यामूळे नजरबंदी झाली असेल धागालेखकाची.

काय लेखकराव खरे आहे का? स्टार न्युज वर दाखवलेल्या बातमीत
दाखवल्याप्रमाणे फोर्स इंडियाच्या गाडीबरती, फिशिकेलाच्या पोशाखावरती इतकेच नाही तर विजय मल्या
यांच्या हेडफोनवरही तिरंगा विराजमान आहे का?
-----------------------------------
"दोन वाहनांमध्ये सुरक्षीत अंतर राखा."

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

दिपक's picture

31 Aug 2009 - 3:02 pm | दिपक

इथे अजुन काही क्षणचित्रे आहेत.
http://www.formula1.com/news/headlines/2009/8/9854.html

http://www.formula1.com/gallery/race/2009/817/general/sunday.html

संजय अभ्यंकर's picture

31 Aug 2009 - 8:29 pm | संजय अभ्यंकर

फिजिकेला ने पोल पोझिशन घेतल्यावर सुद्धा धकधुक होती.

परंतु त्याने शेवट पर्यंत, रायकोनेन वर दबाव कायम ठेवला व दुसरा क्रमांक राखला. फेरारिची कर्ब कंट्रोल टेक्नॉलॉजी या शर्यतीत यशस्वी झाली, अन्यथा फोर्स इंडीयाचा पहीला क्रमांक येता.

बर्‍याच दिवसांनी फॉर्मुला वन बघताना मजा आली (ब्राऊन जीपी व रेडबुल संघ प्रथम स्थानी पाहून वैतागलो होतो).

शूमाखर निवृत्त झाल्या नंतर बर्‍याच दिवसांनी रेसचा आनंद लुटला.

फोर्स इंडीया टीम आपल्या वेळापत्रकाच्या अजूनही मागे आहे.

गेल्या सिझनला मधल्या गटात (Middle Order Performer) यायचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु फेरारी इंजीनाचे आणी फो.इं. चे गणीत जमत नव्हते.

ह्या सिझनला विजय मल्ल्यांनी मर्सिडीज इंजीन घेतले. तसेच त्यांच्या तंत्रज्ञांनी, टप्प्या टप्प्याने कार मध्ये अनेक तांत्रिक सुधारणा केल्या त्याचा परिणाम बेल्जियमच्या विजयाने दिसुन आला.

अ‍ॅड्रीयन सुटील हा फिजीकेला पेक्षा धाडसी ड्रायव्हर आहे, येत्या शर्यतीं मध्ये त्याच्या कडून फार अपेक्षा आहेत.

फोर्स इंडीया टिमला माझ्या शुभेच्छा!

जाताजाता: विजय मल्ल्या एक चतुर व धाडसी व्यवसाईक आहे. सुंदर पोरींच्या घोळक्यात त्याला पाहून कोणी त्याला प्ले बॉय समजू नये, तो त्याच्या धंद्याचा एक भाग आहे. मल्ल्याने जेथे जेथे पाउल टाकले, तो तो व्यवसाय त्याने यशस्वी केला.

माझे आजवरचे निरिक्षण असे की मल्ल्या नेहमी भव्य स्वप्ने पहातो आणी ती प्रत्यक्षात आणण्यासाठी तो जीवाचे रान करतो.

गेल्या वर्षी रसातळाला असलेली बँगलोर रॉयल चॅलेंजर टी२० टिम यंदा फायनलला नेली. टी२० चालू असताना तो बँगलोर संघा बरोबर दिसायचा, तर दुसर्‍या दिवशी तो आपल्या फॉर्म्युला वन टिम बरोबर असायचा. बँगलोरहून तातडीने युरोपात पोहोचायचे व आपल्या संघांचे मनोबल वाढवायचे, ह्याला प्रचंड ऊर्जा मांणसात असावी लागते.
आपल्या व्यवसायाशी इतकी प्रामाणीक माणसे फार क्वचीत पहाण्यात येतात.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

निखिल देशपांडे's picture

31 Aug 2009 - 8:41 pm | निखिल देशपांडे

वरच्या प्रतिसादात एक बदल सुचवु ईच्छितो....
फेरारिची कर्ब कंट्रोल टेक्नॉलॉजी या शर्यतीत यशस्वी झाली, अन्यथा फोर्स इंडीयाचा पहीला क्रमांक येता.

आपल्याला येथे कर्स (Kinetic Enerey Recovery System) म्हणायचे असेल. बाकी आपण रेसचा उत्तम वृत्तांत दिला.

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आलयावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

संजय अभ्यंकर's picture

31 Aug 2009 - 8:53 pm | संजय अभ्यंकर

टंकण्यातील चूकी बद्दल क्षमस्व!
चूक नजरेत आणल्याबद्दल निखिलभाऊंचे आभार!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

संजय अभ्यंकर's picture

31 Aug 2009 - 8:53 pm | संजय अभ्यंकर

टंकण्यातील चूकी बद्दल क्षमस्व!
चूक नजरेत आणल्याबद्दल निखिलभाऊंचे आभार!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

संजय अभ्यंकर's picture

31 Aug 2009 - 8:32 pm | संजय अभ्यंकर

फिजिकेला ने पोल पोझिशन घेतल्यावर सुद्धा धकधुक होती.

परंतु त्याने शेवट पर्यंत, रायकोनेन वर दबाव कायम ठेवला व दुसरा क्रमांक राखला. फेरारिची कर्ब कंट्रोल टेक्नॉलॉजी या शर्यतीत यशस्वी झाली, अन्यथा फोर्स इंडीयाचा पहीला क्रमांक येता.

बर्‍याच दिवसांनी फॉर्मुला वन बघताना मजा आली (ब्राऊन जीपी व रेडबुल संघ प्रथम स्थानी पाहून वैतागलो होतो).

शूमाखर निवृत्त झाल्या नंतर बर्‍याच दिवसांनी रेसचा आनंद लुटला.

फोर्स इंडीया टीम आपल्या वेळापत्रकाच्या अजूनही मागे आहे.

गेल्या सिझनला मधल्या गटात (Middle Order Performer) यायचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु फेरारी इंजीनाचे आणी फो.इं. चे गणीत जमत नव्हते.

ह्या सिझनला विजय मल्ल्यांनी मर्सिडीज इंजीन घेतले. तसेच त्यांच्या तंत्रज्ञांनी, टप्प्या टप्प्याने कार मध्ये अनेक तांत्रिक सुधारणा केल्या त्याचा परिणाम बेल्जियमच्या विजयाने दिसुन आला.

अ‍ॅड्रीयन सुटील हा फिजीकेला पेक्षा धाडसी ड्रायव्हर आहे, येत्या शर्यतीं मध्ये त्याच्या कडून फार अपेक्षा आहेत.

फोर्स इंडीया टिमला माझ्या शुभेच्छा!

जाताजाता: विजय मल्ल्या एक चतुर व धाडसी व्यवसाईक आहे. सुंदर पोरींच्या घोळक्यात त्याला पाहून कोणी त्याला प्ले बॉय समजू नये, तो त्याच्या धंद्याचा एक भाग आहे. मल्ल्याने जेथे जेथे पाउल टाकले, तो तो व्यवसाय त्याने यशस्वी केला.

माझे आजवरचे निरिक्षण असे की मल्ल्या नेहमी भव्य स्वप्ने पहातो आणी ती प्रत्यक्षात आणण्यासाठी तो जीवाचे रान करतो.

गेल्या वर्षी रसातळाला असलेली बँगलोर रॉयल चॅलेंजर टी२० टिम यंदा फायनलला नेली. टी२० चालू असताना तो बँगलोर संघा बरोबर दिसायचा, तर दुसर्‍या दिवशी तो आपल्या फॉर्म्युला वन टिम बरोबर असायचा. बँगलोरहून तातडीने युरोपात पोहोचायचे व आपल्या संघांचे मनोबल वाढवायचे, ह्याला प्रचंड ऊर्जा मांणसात असावी लागते.
आपल्या व्यवसायाशी इतकी प्रामाणीक माणसे फार क्वचीत पहाण्यात येतात.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

निशांत_खाडे's picture

19 Mar 2016 - 8:43 pm | निशांत_खाडे

धागा वर आणावा काय?

नितिन थत्ते's picture

20 Mar 2016 - 5:33 pm | नितिन थत्ते

लिलावात विकला जाणारा गांधींचा चष्मा मल्ल्याने विकत घेऊन भारताची लाज वाचवली होती म्हणे......

अभिजित - १'s picture

20 Mar 2016 - 5:43 pm | अभिजित - १

कसली लाज ? कचरा मध्ये फेकला असता तरी त्याची गरज नव्हती देशाला ..

आणि पैसा कोणाचा वापरला ? अर्थात गांधी म्हणजे तुम्हाला अतिप्रिय . त्या मुळे त्याला (विजय मल्ल्या ) सौ खून माफ ? आता डोक्यावर घेऊन नाचा त्याला ..
आणि तो चष्मा लिलावात उतरवला गांधीच्या अनुयायानेच. नाही का ?

टवाळ कार्टा's picture

20 Mar 2016 - 6:35 pm | टवाळ कार्टा

popcorn

तर्राट जोकर's picture

20 Mar 2016 - 6:49 pm | तर्राट जोकर

नो टेकर्स हिअर. =))

नितिन थत्ते's picture

20 Mar 2016 - 9:45 pm | नितिन थत्ते

हा हा हा.

माझ्या प्रतिसादातलं शेवटचं "म्हणे" वाचलं नाय का?

जनवित्त अभियान पुणे.
राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतलेली कर्जे जाणीवपूर्वक बु़डविणाऱ्या बड्या उद्योगपतींचा भारतीय बँकांना विळखा पडला आहे. काळ्या पैशाची फार मोठी आंतरराष्ट्रीय चक्रे त्यामागे कार्यरत आहेत. प्रस्थापित राजकीय पक्षांचे बडे नेते आणि हे तथाकथित उद्योगपती यांचे त्यामागील कारस्थान उघड करणारा कार्यक्रम
भारतीय बँकांची कर्जबुडी- " विजय " कोणाचा ?
वक्तेः
विश्वास उटगी, बँक कर्मचारी चळवळीचे नेते आणि बँकिंग क्षेत्राचे अभ्यासक
अजित अभ्यंकर , सामाजिक कार्यकर्ते आणि अर्थव्यवस्थेचे अभ्यासक
मंगळवार दिनांक 22 मार्च 2016 , सायंकाळी- 5.30 वाजता
एस्. एम्. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन , सेमिनार हॉल, नवी पेठ, पुणे 30.
अवश्य यावे.
महारूद्र डाके

गॅरी शोमन's picture

21 Mar 2016 - 4:58 pm | गॅरी शोमन

अजित अभ्यंकर हे कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत. नुकतेच पक्ष सोडुन ते सामजिक कार्यकर्ते म्हणौन घेतात की काय?