पांढर्‍याचं काळं.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
28 Aug 2009 - 10:08 am

त्याला खूप दिवस होऊन गेले.मी एकदा गिरगावात गेलो होतो.पॉप्युलर बूकडेपोत काही पुस्तकं चाळत होतो.विं.दा.करंदिकरांचं कवितेचं एक पुस्तक आवडलं.आलो होतो चिं.त्र्यं.च्या चानी ह्या कादंबरीसाठी.मिना साठे आणि तिचे यजमान बुकडेपोतच भेटले.माझी त्यांची फार पुर्वीची ओळख आहे.त्यानंतर आज आमची भेट झाली ती योगायोगानेच.माझी पत्नी मला म्हणाली खूप दिवस आपण खडप्यांच्या अनंताश्रमात जेवायला गेलो नाही.म्हणून आज आम्ही जायचं ठरवून आलो होतो.बाजूच्या फॅमेलीरूम मधे साठे पतीपत्नी बसली होती.साठ्यांना मासे खूप आवडतात.मीच त्यांना अनंताश्रमाची माहिती दिली होती.पापलेटची आमटी आणि तळलेल्या सरंग्याचं काप हे समीकरण त्यांना खूप आवडायचं.त्यांचा आवाज आणि ही त्यांची ऒरडर ऐकून माझी खात्री झाली होती की हे मिस्टर साठेच असणार.कुतुहल म्हणून जरा धीर करून माझ्या जागेवरून उठून कॅबिनच्या वरच्या उघड्या भागातून भित भित न्याहाळून पहाण्याचा प्रयत्न केला.आणि माझा अंदाज खरा ठरला.जेवणं झाल्यावर चहाला आमच्या घरी यायला पाहिजे म्हणून मिनाने मला निक्षून सांगितलं.साठे कुटूंब झावबाच्या वाडीत रहातात.आमची काही खरेदी करायची होती ती करून झाल्यावर आम्ही त्यांच्या घरी गेलो.

गप्पागोष्टीला सुरवात झाल्यावर,आमचा पिकलेले केस आणि त्यावर कलप-हेअर डाय-लावण्याच्या संवयीवर चर्चा रंगली.
मिना म्हणाली,
"डोक्याचे केस जसे दिसतात तसेच दिसावे ह्या मताची मी आहे.पण जर का केस काही सफेद आणि काही काळे असतील तर थोडे दिवस ते काळे दिसायला हेअर-डाय लावून आणि नंतर काही दिवसानी त्याचा असर कमी झाल्यावर काळे पांढरे दिसले तरी मला चालतं.कुणाच्या तरी लग्नाला जायचं झाल्यास,किंवा कुठल्यातरी पार्टीला जायचं झाल्यास माझे केस काळे असावे लागतील. असले तात्पुरते हेअर-डाय मला लावायला आवडतील.
कारण अशा प्रकारचा हेअर-डाय लावल्याने जसं मनात आपण दिसायला पाहिजे तसं तात्पूरतं दिसता येतं आणि शिवाय पूर्वी कशी होते ते कायमचं विसरायला होत नाही.दुसरं म्हणजे ते प्रकार की ज्यामुळे केस काळे किंवा सफेद दिसण्याबद्दलची मनातली विसंगती, जिच्यामुळे विरोधाभास असलेला,जटिल समस्यात अडकलेला मनुष्य प्राणी म्हणून मी दिसली जाऊं नये.थोडसं ढोंगी किंवा पाखंडी असायला काय ही हरकत नाही असं मला वाटतं.
ह्या त्तात्पुर्त्या हेअर-डायमुळे अमर्यादित मुभा असलेल्याला माझ्यासारखीला थोडीशी निर्भयता असल्यासारखं वाटतं.एक गोष्ट स्विकार करायची आता मला वेळ आली होती,की हे असंच माझ्या जीवनात आहे आणि त्यावर मला आता अवलंबून राहावं लागणार आहे आणि जरी ते केसांच्या कोशातल्या भागात्त असलं तरीही,कारण मी "मुळाला" मानते."
मिनाचं हे केसाबद्दलचं प्रांजाळ सांगणं ऐकून मी तिला म्हणालो,
"मला तरी वाटतं की निसर्ग जे ज्यावेळी देतो ते निमुटपणे स्विकारावं.नाहीतर तोंडावर सुरकुत्या आल्या आहेत.कण्याला बाक आली आहे.आणि राजेश खन्ना सारखं दिसावं म्हणून विग वापरल्यावर वयाला शोभून दिस]णार नाही.निसर्गाने दिलेलं टक्कल निमुट स्विकारावं.तुला कसं वाटतं माझ म्हणणं?"
मिना माझ्याशी पूर्ण सहमत होऊन मला म्हणाली,
"तुमचं म्हणणं मला पटतं.अलीकडे माझी आई मला सांगत असते की जे स्थित्यंतर माझ्या केसात दिसत आहे ते माझ्या आताच्या वयाला शोभूनच दिसतं.आणि मलाही माझ्या अंतरात खात्री करून घ्यायची आहे की जे मला मिळत आहे,आणि जे काही घडत आहे ते मी स्विकार करणं जास्त उचित आहे.समजा कदाचित मी माझ्या आईवडीलांच्या घरात आता पर्यंत येत जात राहिले ते मला यापुढे करता येणार नाही.कदाचित ज्या लोकांना मी माझे समजून राहत आली ते माझे राहाणार नाहीत.कदाचित माझे काळे पांढरे केस पाहून मी नाराज होत राहिन किंवा राहाणार नाही.पण हे मात्र नक्की की असेच केस माझ्या बरोबर असणार आणि त्यानेच मी यापुढे चांगली दिसत राहणार.
मी ज्याला ढोंग म्हणाले किंवा पाखंडी म्हणाले ते असं आहे.ज्या ज्या वेळी मी बाहेरच्या जगात जाते आणि विचारात पडते त्या त्या वेळी मी माझा पुनःअविष्कार करून घेते.आणि माझ्या संबंधाने ज्या गोष्टी मला परिचीत आहेत त्यांनाच मी चिकटून बसते.निर्भय असणं म्हणजे बाह्य भागाला मर्यादा आणणं असं नव्हे,तर जीवनातल्या अंतर भागालाही चिकटून असणं.आणि त्यामुळे कदाचीत संदर्भ बदलला तरी बेहत्तर.कारण अगदी प्रामाणिकपणे विचार केला तर ह्या वयात कायमचे सफेद केस ठेऊन राहाण्याचा प्रयत्न करून पाहिल्याशिवाय मी किती असाधारण दिसते हे कळणार नाही.एव्हडं मात्र नक्की एक ना एक दिवस माझे सगळे केस सफेद होणार आहेत ह्याची मला जाणीव ठेवावी लागणार आहे.
माझ्या जीवनात अविचलनीय गोष्टी घडल्या आहेत याची मला जाणीव असल्याने जगातल्या कठीण परिस्थितीला तोंड देण्याची माझी तयारी आहे.आता काय माझं वय नवतरूणीचं नाही.तसंच जूना अनुभव एव्हडा आहे की त्यावर ध्यान देणं म्हणजे जरा अती होईल. म्हणून मला वाटतं की स्थायी बदलच बरा."
"चहा घेता घेता असा एखादा निष्पाप विषय़ घेऊन चर्वीचरण करायला कुणाचं काय जातं?" असं मी मनात म्हणालो.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

सहज's picture

28 Aug 2009 - 11:23 am | सहज

मोगराबाई फूले यांचे मत जरा वेगळे होते, त्यांना आपले तरुण वय व शरीर तसेच रहायला हवे होते त्याकरता त्यांनी वेळेवेळी प्लॅस्टीक सर्जन काटदरे यांच्याकडून विविध भाग बनवुन घेतले होते.

मोगराबाई जेव्हा धाकले पाटील जानराव यांना भेटल्या व घडू नये ते घडले. प्रकरण उघडकीस येइल, सप्तपदी घालाव्या लागतील या भितीपोटी जानरावांनी मोगराबाईंचे तुकडे तुकडे केले व टाकून दिले.

जेव्हा पोलीसांना असे तुकडे मिळाले ते काहीच ओळखू शकले नाही ना दात शाबुत होते की डॉ. दंताडे यांच्याकडील माहीतीवरुन कळेल की बोटे सुस्थीतीत नव्हती की ठशांवरुन काही कळेल. पण मोगराबाईंचे स्वतःच्या शरीराचे "दोन" अवयव "उन्नत" करण्याकरता केलेल्या शस्त्रकियेमुळे सरकवलेल्या कृत्रीम इम्प्लांटने शेवटी आपली किमया दाखवली. प्रत्येक इम्प्लांटला एक विशिष्ट क्रमांक असल्याने त्यावरुन कधी बनला, कुठे बनला, कोणी वापरला ही सर्व इत्यंभूत माहीत असल्याने पोलीसांना कळले हे छिन्नविछिन्न तुकडे मोगराबाईंचेच.

त्यामुळेच म्हणतो की ज्याला / जिला आपल्या शरीराचे, रुपाचे जे करावेसे वाटते ते तिने / त्याने जरुर करावे. कुठलीच मनापासुन केलेली क्रिया निरुपयोगी ठरत नाही.

माझ्या जीवनात अविचलनीय गोष्टी घडल्या आहेत याची मला जाणीव असल्याने जगातल्या कठीण परिस्थितीला किंवा कुठल्याही कथेला तोंड देण्याची माझी तयारी आहे.

मोगराबाई फुले व जानराव यांची सत्य घटना इथे

मुळ पात्र परिचय -
जस्मीन फिओरे = मोगराबाई फुले
रायन जेनकिन्स = धाकले जानराव

अवांतर - मिना साठे पुन्हा कोणालातरी घरी कधीच बोलावणार नाही आहे म्हणत होत्या. आसमंत आसमंत असे काही तरी पुसटसे ऐकू आले.

लिखाळ's picture

28 Aug 2009 - 4:49 pm | लिखाळ

हा हा हा ...
माझ्या विचलित झालेल्या दातावर मी परवाच एक धातुचे आवरण बसवून आलो आहे. आता खंबीर दाताचा अनुभव मला मौलिक ठरणार खास.
सहजरावांचा प्रतिसाद आणि सामंतकाकांचा लेख आवडला.

-- लिखाळ.
आम्ही पैशामागे पळत नाही. त्याला आम्ही दामटून खिशात भरून ठेवतो. ;)

मिसळभोक्ता's picture

28 Aug 2009 - 11:49 pm | मिसळभोक्ता

सहज राव,

बाई होती म्हणून ओळख तरी पटली हो. पुरुष असता तर कशी ओळख पटली असती ?

युयुत्सुला दाखवली का ही बातमी ? पुरुषांची पिळवणूक कशी होते, हे लगेच सांगेल तो.

-- मिसळभोक्ता

मीनल's picture

28 Aug 2009 - 6:07 pm | मीनल

काही वेळा चेहरा तरूण दिसतो पण केस पांढरे. मग ते नाटकातल्या तरूणीने म्हातारीचे भूमीका केल्या सारखे वाटते. या वेळी केस जरूर काळे करावेत.
या उलट ही होत कधी कधी. माझी मावशी असेल ७५ वर्षाची किंवा अधिक. केस म्हणाल तर एखादाच पांढरा. तो ही शोधावा लागतो काळ्या भोर केसात. अजूनही केसांना वाढ निट आहे. पण चेहरा मात्र वय सांगून जातो. सर्व जण मनात समजतात की म्हातारी नखरेल आहे, अजूनही रंगवून घ्यायची आवड आहे.एकीने तर सल्ला. दिला , " आजी केस रंगवयला जाता ना तेव्हाच चेह-याच फेशीअल करून घ्या".

मीनल.