मूर्छना

शुभान्कर's picture
शुभान्कर in जनातलं, मनातलं
26 Aug 2009 - 7:03 pm

आपल्या भारतीय संगीतात मूर्छना ही एक खुपच सुंदर कल्पना आहे.

मूर्छना म्हणजे एका रागाच्या एका स्वरावरुन दुसरा राग तयार होणे.
उदा. मालकंस या रागाच्या सर्व पाचही स्वरावरुन भुप्,दुर्गा,मेघ,धानी असे राग
मिळतात.

उदा. दाखल धुंद मधुमति रात रे हे गाणे मालकंस आणि भुप या दोन्हि रागात सुन्दर
बसते. फक्त त्याचा सा बदलतो. तीच गोष्ट पन्ख होति तो उड आती रे ह्या गाण्याची.

मला ह्या मुर्छना पद्धती वर एखादे चांगले पुस्तक हवे आहे. कुणी सांगु शकेल काय?

धन्यवाद.

संगीतविचार

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

26 Aug 2009 - 7:10 pm | विसोबा खेचर

मूर्च्छना हा प्रकार तसा चांगलाच आहे परंतु त्यात सांगितिक आस्वादापेक्षा तांत्रिक करामती अधिक आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे..

अर्थात - पं अजोय चक्रवर्तीं, पं अजय पोहनकर असे काही मोजके लोक मूर्च्छना चांगली करतात. परंतु त्यातल्या तांत्रिक करामतींमुळे तो प्रकार फार वेळ चांगला वाटत नाही...

तात्या.

प्रदीप's picture

26 Aug 2009 - 7:48 pm | प्रदीप

एका रागाच्या एका स्वरावरुन दुसरा राग तयार होणे.

म्हणजे नेमके काय हे जरा विशद करून सांगाल का? धन्यवाद.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Aug 2009 - 8:59 pm | बिपिन कार्यकर्ते

असेच म्हणतो...

बिपिन कार्यकर्ते

मिसळभोक्ता's picture

26 Aug 2009 - 10:48 pm | मिसळभोक्ता

एक राग घ्या. (अ)
त्या रागातला (सा वगळून) कुठलाही दुसरा स्वर घ्या. (ब)
त्या स्वराला सा माना. (क)
आता (अ) मधल्या स्वरांचे (क) मधल्या स्वराला सा मानल्यास मॅपिंग करा (ड)
हा जो कोणता राग झाला आहे, तो म्हणा. (इ)
म्हणजे (फ) होईल.

वरच्या तात्याच्या प्रतिसादाशी सहमत आहे.

-- मिसळभोक्ता

प्रदीप's picture

27 Aug 2009 - 11:01 am | प्रदीप

सहज, नीट समजावून दिल्याबद्दल धन्यवाद.

घाटावरचे भट's picture

26 Aug 2009 - 11:00 pm | घाटावरचे भट

मूर्च्छनेद्वारे एका रागाच्या स्वरांवरून दुसरा राग तयार होण्यासाठी त्या रागाचा आधारभूत षड्ज बदलावा लागतो. उदा. चंद्रकंस राग घेतला तर त्याचे स्वर असे आहेत -

सा ग् म ध् नी सां (गंधार आणि धैवत कोमल, मध्यम आणि निषाद शुद्ध)
(अनुस्वार म्हणजे तार सप्तकातला स्वर)

आता त्यातल्या मध्यमाला (म) आधार स्वर किंवा सुरुवातीचा स्वर मानला तर एक सप्तक पूर्ण करण्यासाठी आपल्याला खालचा म ते वरचा म यातले स्वर असे लिहिता येतील.

म ध् नी सां ग्ं मं
(पुन्हा अनुस्वार म्हणजे तार सप्तकातला स्वर)

वरच्या प्रत्येक दोन स्वरांमधले अंतर असे आहे

म (दीड स्वर) ध् (दीड स्वर) नी (अर्धा स्वर) सां (दीड स्वर) ग्ं (एक स्वर) मं

आता सा पासून तेच अंतर ठेवून स्वर घेतले तर पुढील स्वर मिळतात

सा ग् म॑ प नि सां (गंधार आणि निषाद कोमल, मध्यम तीव्र)

हे मधुकंस रागाचे स्वर आहेत. अशा रीतीने मूर्च्छनेचा आधार घेऊन खरोखरच काही नवीन राग 'निर्माण' केले गेले आहेत . पण एका रागाचा षड्ज बदलून वेगवेगळे राग दाखवणे ही एकूणातच तांत्रिक करामत असल्याने मैफिलीत/कार्यक्रमात सादरीकरणाच्या दृष्टीने त्याचे मूल्य तितकेसे नाही. ते एक करामत म्हणून २-३ मिनिटेच ठीक वाटते.

टीप - स्वरांमधले अंतर म्हणजे काय? संगीतात जरी सात स्वर आहेत असे आपण म्हणत असलो, तरी त्यांची शुद्ध आणि विकृत रूपे धरून एकूण स्वर बारा आहेत. ते अनुक्रमे असे :
षड्ज-कोमल ऋषभ-शुद्ध ऋषभ-कोमल गंधार-शुद्ध गंधार-शुद्ध मध्यम-तीव्र मध्यम-पंचम-कोमल धैवत-शुद्ध धैवत-कोमल निषाद-शुद्ध निषाद (आणि वर पुन्हा षड्ज. असेच चक्र पुढे चालू.)
यापैकी षड्ज आणि पंचम हे अचल स्वर आहेत, म्हणजे त्यांची विकृत रूपे होत नाहीत. वर लिहिलेल्या प्रत्येक एका पाठोपाठ असलेल्या स्वरांमधले अंतर अर्धा स्वर मानले जाते. त्यानुसार वरील स्वरांमधील अंतरे दिलेली आहेत.

चतुरंग's picture

26 Aug 2009 - 11:24 pm | चतुरंग

माझ्यासारख्या गाण्यातल्या तद्दन मठ्ठ माणसाला सुद्धा जवळजवळ सगळे समजले! :) तुझी ह्या बाबींची समज वाखाणण्याजोगी आहे! B)
(आणी शब्द 'मूर्च्छना' असा असावा हा माझा मनाशीच केलेला अंदाज बरोबर आला असे तुझ्या लिखाणावरुन दिसते.)

(कानसेन)चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Aug 2009 - 1:27 am | बिपिन कार्यकर्ते

कळले (म्हणजे असे वाटते आहे हां... :) ) ... छान समजवले आहे भटोबाने. धन्यवाद भटोबा. याचे एखादे प्रात्यक्षिक आहे का कुठे जालावर उपलब्ध? असल्यास कळवा.

बिपिन कार्यकर्ते

घाटावरचे भट's picture

27 Aug 2009 - 8:29 am | घाटावरचे भट

पं. विजय कोपरकर 'मधुरंजनी' रागाबद्दल सांगतायत. त्यात मूर्च्छनेचंही एक प्रात्यक्षिक आहे. मध्ये इथे पटदीप रागावर चर्चा झाली होती. त्याचंच हे डेरिव्हिटिव्ह आहे.

अन्वय's picture

27 Aug 2009 - 11:11 pm | अन्वय

मूर्च्छनेद्वारे एका रागाच्या स्वरांवरून दुसरा राग तयार होण्यासाठी त्या रागाचा आधारभूत षड्ज बदलावा लागतो.........

भट जी सुंदर विश्‍लेषण
भावले.

पर्नल नेने मराठे's picture

27 Aug 2009 - 11:08 am | पर्नल नेने मराठे

सारेगपधसा...........साधपगरेसा... ;;) भुप राग

चुचु

शुभान्कर's picture

27 Aug 2009 - 11:15 am | शुभान्कर

मूर्च्छना म्हणजे तांत्रिक करामत असे कुणाचे मत असेलही. मी त्यांच्या मताचा आदर करतो. परंतु तो एवढा सहज वेगळा करण्यासारखा प्रकारही नाही हे निश्चित.

जर कुणाला त्याबद्द्लच्या विस्त्रुत लिखाणाबद्द्ल माहीती असल्यास सांगावे.

JAGOMOHANPYARE's picture

27 Aug 2009 - 11:19 am | JAGOMOHANPYARE

केवळ षड्ज बदलणे म्हणजे मूर्छना की दुसरा राग तेच स्वर वापरून सादर करणे म्हणजे मूर्छना..?

उदा.. रेहमानची दोन गाणी आहेत... हम्मा हम्मा आणि वन्दे मातरम... दोन्ही गाण्यात शेवटी शेवटी एक स्वर वर सरकवून गाणे म्हटले आहे... याला देखील मूर्छना म्हणतात का ?