प्रेम - चार ओळीत

पुष्कराज's picture
पुष्कराज in जे न देखे रवी...
25 Aug 2009 - 7:09 pm

मी गेल्यावर स्मरशील का रे?
आठवणींनी व्याकूळ होउन
सांग कधी तू रड्शील का रे ?

या प्रश्नाला काय म्हणावे.
आत्म्याने देहास पुसावे
मी गेल्यावर जगशील का रे ?

शृंगारकविता

प्रतिक्रिया

दशानन's picture

25 Aug 2009 - 7:13 pm | दशानन

:|

खुप गहन अर्थ असलेल्या सहा ओळी !

आवडल्या !

अनिल हटेला's picture

25 Aug 2009 - 7:42 pm | अनिल हटेला

अर्थपूर्ण सहा ओळी................

क्या बात है......:-)

:-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

विकास's picture

25 Aug 2009 - 7:39 pm | विकास

एकदम सुंदर भावपूर्ण ओळी! थोडक्यात खूपकाही!

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Aug 2009 - 7:44 pm | बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते

प्राजु's picture

25 Aug 2009 - 7:39 pm | प्राजु

ओळी आवडल्या.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रमोद देव's picture

26 Aug 2009 - 8:29 am | प्रमोद देव

मस्त!

माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे......
गात पुढे मज जाणे

सागर's picture

26 Aug 2009 - 12:51 pm | सागर

प्रेमात कोणी पडत नाही
...ते आपोआप होते
कधी होते ते कळत पण नाही
आणि कळते तेव्हा काही सुचत नाही

~सागर
अवांतर : शीर्षक चार ओळींचे आणि कविता सहा ओळींची ... बात कुछ हजम नही हुई ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Aug 2009 - 9:28 pm | llपुण्याचे पेशवेll

अर्थपूर्ण ४ ओळी.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

विकि's picture

25 Aug 2009 - 9:42 pm | विकि

सुंदर कविता. ओळी मन लावून वाचल्या आणी मनावर अचानक दडपण जाणवले का ते सांगू नाही शकत.
आपला
सध्या प्रेमामध्ये पडलेला

राघव's picture

26 Aug 2009 - 3:32 pm | राघव

आणखी एक -

सरेल कशी ही जीवनसरिता..
स्फुरेल कशी मम मनांत कविता..
तुझ्या संगतीवाचून आता..
सांग कसा मी जगू एकटा!

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी..
सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा!

बन्या बापु's picture

26 Aug 2009 - 8:11 pm | बन्या बापु

मी पण एक .....
कोणीही उठुन कराव , इतक का प्रेम स्वस्त असत !
गम्मत जम्मत आणि गाणी इतके का ते मस्त असत..

चुक भुल द्यावि घ्यावि...

बन्या बापु