सारे कसे नवे नवे वाटते
सारे कसे नवे नवे वाटते
तुझ्या प्रितीने काहूर मनी दाटते || ध्रु ||
फुलतात फुले, सुगंधतात मने
हरघडी वसंत बहरतसे || १ ||
राग नवा आळवू चल गोड नवी गाणी बोल
बोल कानात माझ्या गूंजते || २ ||
साथ माझी घे हात हाती दे
चालत जावू दोघे लांब रस्ते || ३ ||
-पाषाणभेद
प्रतिक्रिया
26 Aug 2009 - 8:47 am | पाषाणभेद
धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.
आपल्याला ही रचना ईतकी आवडली की प्रतिक्रीयेसाठी शब्दही सुचेना झाले व आनंदाचे भरते येवून काही फुटकळ शब्दही टंकन करण्याकरता थरथरवे लागले. चेहर्यावरचे भाव (स्मायली) सुद्धा टंकन करण्यासाठी कमीत कमी कळा बडवाव्या लागू नये म्हणून केवळ रिकाम्या ओळी ही टंकन कराव्या लागल्या हे तर मह्तभाग्य.
(आत्ता लगेच एका ओळीचा धागा/ कौल टाकतो आणि बघू काय होते ते.)
रस्त्याने चालतांना नेहमी कंपू जाणार्या दिशेनेच चालावे, त्यामुळे समोरच्या वाहना धडक झाली तरी समोरच्याच वाहनाचे नुकसान होवू शकते.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या