(आज काय्तरी लिहावस वाटतय म्हणुन लिहतोय. फार्स काय छान भारी अस काय नाय).
परवाच्याला एक जोक एकला. कि आपन सग्ळे लोक देवाच्या समोर आप्ली पाप लिहायला बसलो होतो. मी लिहायाला सुरवात करतच होतो त तू जोरात कोपर्यातन ऑरड्लास "सप्लिमेंट प्लिज". आधी त काय जोक कळलाच नाय पण कळ्ला तेवा हसाय्ला आल. :D
मग आठवल, आपण लोक परीक्शेच्या टायमाला कस टोच्यान (कंपासन) सप्लिमेंटाला भोक पाडाय्चो आणि मग कसा दोरा लावायचो.
थोडेसे दोरे घरी पन आनायचो. उगाचच काय त्याचा उपयोग नसाय्चा तरी पन. आता स्टुडन्ट लोक स्टेप्लर वापरतात पन दोर्याची मजा वेगलिच होती.
हि सप्लिमेंट त म्हन्जे कॉपी करायच पर्मिट होत. पेपर लिहताना पहिल्यान थोडफार लिहाय्च आणि मग सप्लिमेंट मागायची आनी मग पास करायची मागल्या बाकावर्ल्याला.
नायतर खोडलबरवर आन्सर लिहुन पास करायचा. आता आठवन आली तरी पन हसायला येत.
प्रतिक्रिया
21 Aug 2009 - 9:15 pm | टारझन
बा दवबिंदू... शाळेत जाऊन आलो यार !!
खरंच सप्लिमेंटचे दोरे पळवून आणायचो खरं !!
कधी शाळेच्या खिडकीतुन आत घुसुन पुरवण्याही पळवल्यात , बाकांच्या फळ्या सुताराकडे नेउन बॅटी बणवल्यात !! रंगीत खडू ढापून आणल्याचं अचानक आठवलं !! कोणत्या मास्तर आणि म्याडमचं बदामात नाव लिहीताना एखाद करोड जुगारात लावल्यासारखं थ्रील आलेलंही आठवलं !
फारोळ्या बाईंच कार्टून फळ्यावर गुपचुप काढलेलं , पोरं दिवसभर हसलेली आणि त्याच मॅडमनं माझं पेकाट लाल केल्याचं आठवलं !
अजुन बरंच काही रे ... १० -१५ वर्ष मागे घेउन गेलास बघ !! तुझ्या एका पुरवणीच्या दोर्याला धन्यवाद !
-( अंमळ हळवा ) टारझन
21 Aug 2009 - 11:03 pm | अवलिया
मस्त लेखन !!
आता माझ्या सप्लिमेंटच्या आठवणी काही सांगत बसत नाही ..
(काही काही ) लोक मला इथे सज्जन समजतात.. ;)
रेप्युटेशन जायला नको ! कसे ? :)
लिहित रहा !! :)
--अवलिया
21 Aug 2009 - 11:21 pm | विजुभाऊ
अवलीयाशेठ वोईच बोल्या मै
हमारे ह्यां गंगावन कु सप्लीमेन्ट बोल्तेहै
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
22 Aug 2009 - 12:14 am | वेदश्री
दवबिन्दु,
लेख खूपच आटोपशीर झालाय पण आठवणींना तजेला आणायला पूरक ठरल्याने खूप भावला. पुलेशु.
पुरवणी म्हटल्यावर मला तात्काळ आठवली ती एकच आठवण.. दहावीच्या प्रिलिममधल्या भूमितीच्या पेपरची! ऑप्शनल प्रश्नांसकट अख्खा पेपर सोडवायचा ( ७ पैकी ५ प्रश्न सोडवा असे असले तरी सर्व ७ही प्रश्न सोडवायचे असा ) स्वतःशीच चंग बांधला होता. बीजगणितात डोके लावून गणिते सोडवत नुसते लिहायचेच काम असते त्यामुळे त्यात जमले वेळेत पेपर पूर्ण करणे पण भूमितीला आकृत्यांमध्ये वेळ गेल्याने शेवटचा प्रश्न अर्धवट राहिला आणि वेळ संपली.. इत्तक्का राग आलेला मला स्वतःचाच की बस्स.. एकच दणका मारला बेंचवर आणि सगळ्या (१३ की १४ झाल्या होत्या!) पुरवण्या माझ्या बाकड्याभोवती पसरल्या. दोन्ही हातात तोंड खुपसून नुसती रडारडा चालू होती माझी. सुपरव्हीजनवर असलेल्या वादेमॅडमनी समजवायचा खूप प्रयत्न केला पण उंहू.. शेवटी मॅडमनी स्वतःच पुरवण्या लावायला घेतल्या तर मी पुरवण्यांवर नाव, वर्ग, तुकडी, विषय, तारीख आणि मुख्य म्हणजे पुरवणी क्रमांक वगैरे काहीच टाकले नव्हते... त्यात वेळ जायला नको म्हणून! झालं.. समजवणे राहिले बाजुलाच..... मॅडमनी तू असा मूर्खपणाचा चंग कसा करू शकतेस असे ओरडायला सुरूवात केली. त्यांच्या ओरड्याला घाबरून रडू आवरले (तात्पुरते) आणि पेपर-पुरवण्या गोळा करून नीट क्रमाने लावून (क्रम क्रमांक पाहूनच ठरवता येतो असे नाही.. ) कर्कटकाच्या टोकावर दोर्याचे टोक ठेवून खूपसून नीरगाठ मारून त्यांच्या हवाली केला आणि सटकले वर्गाबाहेर!
22 Aug 2009 - 12:32 am | टारझन
व्वा !! हृदयाला भिडले हे वेदश्री जी !
- ( ऋग्वेद श्री ) टारझन
22 Aug 2009 - 8:16 am | दशानन
=))
लै भारी... !
22 Aug 2009 - 8:17 am | विश्वेश
आमच्या ज्युनियर कॉलेज मधे तर मेकनिकल च्या वर्कशॉप मधून लोकानी बराच माल ढापून भंगार वाल्याला विकला आणि वडापाव ची पार्टी केलि होती वार्षिक परिक्षेनंतर
22 Aug 2009 - 1:42 pm | पर्नल नेने मराठे
8|
चुचु