अतुलचा भयगंड

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
21 Aug 2009 - 7:00 am

आमच्या शेजारच्या बिल्डिंगच्या तळमजल्यावर पूर्वी खाडिलकर राहायचे.नंतर ती जागा विकून ते गोरेगांवला राहायला गेले.खाडिलकरांचा एकुलता एक मुलगा अतुल तेव्हा खूपच लहान होता.त्याचे आईवडिल त्याला खूपच जपायचे.मी खाडिलकरांच्या जेव्हा घरी जायचो तेव्हा नेहमीच ते अतुलच्या घाबरून रहाण्याच्या संवयीबद्दल काळजी करीत असत.
"ह्याचं पुढे कसं होणार?"
ही त्यांची नेहमीचीच काळजी.
मला आठवतं मी त्यांना नेहमी म्हणायचो,
"जसा तो मोठा होईल तसा सुधारेल"
अतुलच्या वडीलांना हे ऐकून बरं वाटायचं.मला म्हणायचे,
"तुमचं म्हणणं बरोबर आहे.मी उगीचच काळजी करीत असतो.सर्व अंगावर पडल्यावर त्याला जबाबदारीने वागावं लागेल."
इतर मुलांच्याबरोबरीने अतुल खरंच जरा काळजी करण्यासारखा वागायचा.मागे मागे रहायचा.आपल्याला हे जमणार नाही असं त्याला प्रयत्न करण्यापूर्वीच वाटायचं.
पण तो त्यावेळी लहान होता.काल मी बर्‍याच वर्षानी गोरेगांवला खाडिलकरांच्या घरी गेलो तेव्हा माझं अतुलनेच स्वागत केलं. हाच अतुल हे मी ओळखलंच नसतं.
"अतुल कोण आलंय रे?"
असा नामनिर्देश करून आतून प्रश्न विचारला गेला,त्यामुळे हा अतुल हे मी ओळखलं.
मला पाहून अतुलला त्याचं लहानपण आठवलं असावं.
आमच्या गप्पा चालू झाल्यावर मला तो म्हणाला,
"आपण खूप वर्षानी भेटतोय.पुलाखालून बरंच पाणी निघून गेलंय. माझ्या जीवनातल्या भूतकाळात डोकाऊन पाहिल्यावर काही गोष्टी माझ्या लक्षात येऊ लागल्या.
काही घटना उत्साहित करतात नव्हेतर आनंदही देतात.
काही घटना मला खूप बेचैनही करतात. जेव्हा माझ्या लक्षात येतं, की मी माझ्या सुरवातीच्या आयुष्यातला समय जवळ जवळ सर्व बाबीबद्दल घाबरून राहण्यात

व्यय केला तेव्हा मला खूपच वाईट वाटतं.तसंच त्यावेळचा काही उरलासुरला वेळ मोठ्या चलाखीने माझ्या मनातली भिती इतरांपासून कशी लपून छपून ठेवायची हे शिकण्यात घालवला तेव्हा ही वाईट वाटतं.
हे सर्व लक्षात आल्यावर सहाजीक मी बेचैन होतो,कारण मी भयहीन होतो असं इतराना अगदी साफ साफ हानिरहित दिसणारं भ्रमात टाकणारं माझं कृत्य मलाच शेवटी भ्रमात टाकून गेलं होतं."
मी त्याला म्हणालो,
"जेव्हा कुणी स्वतःला भयभीत स्थितीत ठेवतो तेव्हा त्याच्या विशिष्ट स्वरूपाच्या जीवनातून संपूर्ण आयुष्याच्या अर्थाला आणि वैधतेला योगदान देण्याचा त्याला मिळालेला मोका तो निष्फळ करून टाकतो. "
अतुल म्हणाला,
"माझ्या जीवनातला एव्हडा मोठा हिस्सा भितीने व्यापला ह्याचा जेव्हा मला एकाएकी पडताळा आला त्याने मला बरंच धक्कादायक वाटलं,कारण जेव्हडं म्हणून माझ्या जीवनावर मी प्रेम करावं तेव्हडं मी केलं आणि अशावेळी मनापासून मानलं होतं की ते जगण्यात मी प्रयोगशील होतो."

"खरं आहे तुझं म्हणणं, नुसतंच जगायचं असं ठरवल्यास कुणावरही एक जबरदस्त जबाबदारी येते,आणि ती जबाबदारी केवळ स्वतःपूर्तीच नसून एकमेकावरचीही असते."
माझा हा विचार ऐकून अतुल म्हणाला,
"मला वाटतं,अशा भयभीत परिस्थितीत असल्यानेच आपण असहिष्णुता आणि पूर्वग्रह मनात ठेवण्याचा अपराध करतो. त्यापलिकडे जाऊन मला वाटतं,कदाचीत सगळ्यात दुःखद आणि गंभीर अपराध म्हणजे परिवर्तनाला-बदलावाला- आपला विरोध असणं.मी हेच करण्यात माझी भलाई आहे असं बरीच वर्ष समजत राहिलो."
"हा परिवर्तनाचा तुझा मुद्दा मला आवडला. परिवर्तन हे ज्ञान मिळवण्याचं आणि विकास करून घेण्याचं नैसर्गिक लक्षण आहे आणि ते उत्तम लक्षणही आहे.आपण नेहमी जे परिचित असतं त्याच्याशी जखडून बसतो.कारण ते परिचित आहे म्हणून ते निःशंक आहे असं आपल्याला वाटत असतं.आपण एका फटक्यात जे अपरिचित आहे त्याचा निकाल लावतो आणि जे न्याय्य आहे त्याचाही निकाल लावतो."
माझं हे बोलणं ऐकून अतुल पुन्हा आपल्या भयभीतीच्या मुद्याकडे वळला.म्हणाला,
"भयभीत झाल्याने आपण आपल्यापुरतंच प्रेम मिळवण्यच्या प्रयत्नात असतो.मात्र आपल्यात असलेल्या प्रेमाचा शोध करायला आपण विसरतो.भितीमुळे आपण आपल्या श्रद्धेमधे एक निराळीच विचार-शैली आणतो. आणि एव्हडंच नाही तर देवावर आपली श्रद्धा बळावते. देव निवडण्यात असं तादात्म्य स्थापित करतो की जीवनात आपल्या ज्या काही आवश्यकता असतात, श्रद्धा ठेवण्याचा आपला जो प्रयास असतो आणि आपलेच हित साधण्यासाठी आपल्यात जी क्षमता असते त्याहीपेक्षा देवाचं महत्व आपल्याला जास्त वाटायला लागतं."
माझ्या मनात आलं की अतुलला ह्याच वेळी आपल्या अनुभवातून दोन शब्द उपदेशाचे सांगावे.मी म्हणालो,
"अतुल,तू माझं मान किंवा नको मानूं, माझा विश्वास आहे की येणार्‍या उद्यात आशा ठेवून राहिलं पाहिजे. एव्हडा जर येणार्‍या उद्यामधे तुझा विश्वास असेल तर तू भितीग्रस्त होऊन तो आजच्यापेक्षा निराळा असावा असं समजून चालणार नाही.मला वाटतं तुला जे काही माहित आहे ते मानण्यापासून सुरवात करून आणि जे माहित नाही त्याबद्दल यत्किंचीतही भिती न बाळगून पुन्हा कधीही भितीग्रस्त होणार नाही अशी अटकळ मनात ठेवून राहिलं पाहिजे."
अतुल चांगला पोक्त झाला आहे.त्याला चूका आणि दोष,जबाबदारी आणि अवलंबून राहणं ह्याचा अर्थ चांगलाच कळला असणार.मी उठता उठता मला म्हणाला,
"प्रत्येकाला आपल्यात असलेला दोष ज्ञात असतो.तसंच प्रत्येकजण एकाकी असतो.मला वाटतं दोषी आणि एकाकी असे आपण सर्वच इकडे मिळुनमिसळूनच असतो."
मी त्याची पाठ थोपटीत म्हणालो,
"अगदी लाखातलं एक बोललास."

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

21 Aug 2009 - 8:36 am | मदनबाण

"प्रत्येकाला आपल्यात असलेला दोष ज्ञात असतो.तसंच प्रत्येकजण एकाकी असतो.मला वाटतं दोषी आणि एकाकी असे आपण सर्वच इकडे मिळुनमिसळूनच असतो."
व्वा. सामंत काका तुमचा आजचा हा लेख फार सुरेख आहे...
हा लेख वाचुन एका श्लोकाच्या ओळी आठवल्या :---
भयाचे जे भय भक्ता दे अभय | ते हे दत्तात्रेयपाय वंद्य

मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

प्रकाश घाटपांडे's picture

21 Aug 2009 - 9:57 am | प्रकाश घाटपांडे

.आपण नेहमी जे परिचित असतं त्याच्याशी जखडून बसतो.कारण ते परिचित आहे म्हणून ते निःशंक आहे असं आपल्याला वाटत असतं.आपण एका फटक्यात जे अपरिचित आहे त्याचा निकाल लावतो आणि जे न्याय्य आहे त्याचाही निकाल लावतो."

वा वा सामंत काका! पुर्वदुषित वा पुर्वपोषित ग्रह असेच तयार होतात. आमच्या विषयी असे पुर्वग्रह नाहीत अशी आशा करतो ;)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विजुभाऊ's picture

21 Aug 2009 - 10:54 am | विजुभाऊ

सामन्त काका तुमच्या लिखाणात हल्ली पूर्वीईतका सोपेपणा राहीला नाहिय्ये.
जे लिहिता ते वाचायला जरा जड जाते. कदाचित स्वच्छ शब्द फार जास्त प्रमाणात वापरले जात असावेत.

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

अवलिया's picture

21 Aug 2009 - 11:47 am | अवलिया

शुद्धिचिकित्सक लावुन लिहिले असाव काय?

--अवलिया

श्रीकृष्ण सामंत's picture

22 Aug 2009 - 7:19 am | श्रीकृष्ण सामंत

कारण,
"कुछ तो लोग........
........... कहीं बीत ना जाए रैना"

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com