घरघर!

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
18 Aug 2009 - 10:45 am

सदर लेख हा माझी बायको मंजिरी हिने लिहिला असुन आम्ही फक्त त्याचे वाहक आहोत. तिच्या रिअल इस्टेट मॅनेजमेंट व सर्व्हिसेस या व्यवसायातील अनुभवांवर आधारित आहे. मिपाकरांना आपल्या आयुष्यात घर घेताना कदाचित त्याचा उपयोग होउ शकेल.
घरघर
(मंजिरी घाटपांडे)
आयुष्यात कित्येकदा अशा वेळा येतात की जुन्या म्हणींवर अंधविश्वास ठेउन चालत नाही. ते त्याच्या जागी आपण आपल्या जागी अस वाटायला लागत. किंवा निदान त्या म्हणी त्यांचे अर्थ तपासुन तरी पहावेसे वाटतात. अशीच आयुष्यात प्रत्येकाला तपासून पहावस वाटणारी म्हण आहे- मुर्खांनी घर बांधावी आणि शहाण्यांनी त्यात रहावं!
खरच काहो असं हे आहे? खरं तर आपलं स्वत:च घर असावस वाटणं ही एक नैसर्गिक प्रेरणा आहे. मानवाने फक्त ती थोडी ताणून तिला अर्थकारणाचे विविध रंग दिले आहेत. रहाण्यापुरत एक घर झाल कि तो भविष्याची तरतुद म्हणुन दुस-या तिस-या घराची स्वप्न पहायला सुरवात करतो आणी इथुनच त्याच्या समस्यांना सुरवात होते. घर घेण्याचा विचार करताना किती किती प्रश्न सतावायला लागतात.
माझ्या एका मैत्रिणिची विचित्र केस झाली होती. तिच्या घरात तिने एक भाडेकरु म्हणजे आजच्या भाषेत लायसेन्सी ठेवला आणि एक वेळ अशी आली की त्याच्या वाण्याच्या,दुधाच्या बिलाचे पैसे भरुन तिला तो बाहेर काढावा लागला. कारण एकच कायद्याची अपुरी माहिती आणी पॆनिक होण्याचा स्वभाव! वास्तविक तिने जर व्यवस्थित नोंदणीकृत करार करुन, योग्य खातरजमा करुन भाडेकरु ठेवला असता तर महाराष्ट्र रेन्ट कंट्रोल ऎक्ट प्रमाणे लिव्ह लायसेन्स ऎग्रीमेंट पुर्ण प्रोटेक्शन मिळुन तिला पॆनिक होण्याची गरज पडली नसती.
बहुतेक महाराष्ट्रीय लोकांची एक इच्छा असते पुण्यात एकतरी घर असावं. पण ही पुर्ण करण्यासाठी एक स्व अभ्यास करण्याची मात्र फारच थोड्यांची तयारी असते. त्यासाठी हा लेखाचा प्रपंच.
पहिल्यांदा पुढील मुद्दे नक्की करायला हवेत.
*घरासाठी आपल बजेट काय?
* घर घेण्यातील उद्देश कोणता? म्हणजे आज स्वत: राहण्यासाठी,भविष्यात स्वत: राहण्यासाठी, किंवा भविष्यात भाड्याच्या उत्पन्नाचा सोर्स म्हणून किंवा भविष्यात ऎप्रिसिएशन मिळवण्यासाठी किंवा अन्य काही
* लोकेशन्स कोणती निवडावीत? यात प्राधान्यक्रम ठरवलेला असावा.
* घराचा शोध आपण स्वत: करणार कि कोणाची मदत घेणार?
* घराचे पेमेंट कसे करणार? किती पुंजी? किती कर्ज?
प्राथमिक स्तरावर या मुद्यांचा विचार झाला कि मग कायदेशीर मुद्यांचा विचार करायला लागतो.
* टॆक्स कन्सलटंटच्या सल्ल्याने घर कोणाच्या नावाने घ्यावे हे ठरवावे लागते.
* सदनिका ही मिळकत खरेदी करताना सुरवातीला पुढील कागद पत्रे आपण आपल्याच पातळीवरही तपासु शकतो.
सोसायटी रजिस्ट्रेशन, सोसायटी शेअर सर्टिफिकेट, बिल्डर्स बरोबरचे प्रथम ऎग्रिमेंट,कार्पोरेशन टॆक्स बिल- शेवटचे भरलेले, विजेचे बिल -शेवटचे भरलेले, इंडेक्स॥, महापालिकेकडील मंजुर नकाशा, पुर्णत्वाचा दाखला/ कमेन्समेंट सर्टिफिकेट. भोगवटा पत्र इ.
* मुळ मालकाचे काही कर्ज असल्यास त्याची कागदपत्रे
* भुखंड मिळकत असल्यास ७/१२, फेरफार,एन ए ऒर्डर इत्यादी
कायदेतज्ञांच्या मदतीशिवायही वरील कागदपत्रे तपासल्यानंतर आपणास पुन्हा एकदा उद्दिष्टांकडे यावे लागते. जर आपण स्वत: राहणार असु तर बाजारपेठ, बस/रिक्षा स्टॆंड, शाळा, रुग्णालय या सुविधांची जवळपास असणारी उपलब्धता पहावी लागते आणि जर भाड्याने देण्याचा उद्देश असेल तर महत्वाची माहिती हाताशी असावी लागते- ती म्हणजे त्या विशिष्ट ठिकाणी असलेली भाड्याच्या घरांची मागणी.
असा सर्व अभ्यास करुन एकदाचे घर निश्चित झाले कि मग व्यवहाराच्या पद्धतीचा आराखडा बनवावा लागतो.
उदा. रिसेल फ्लॆट घेताना-
* सुरवातीला सर्व उपलब्ध कागदपत्रांच्या प्रती मागवणे
* त्याच्या योग्य छाननीनंतर विसार/ टोकन रक्कम देणे
* पुर्ण व्यवहाराचा कालावधी निश्चित करणे
* किंमत उभयपक्षी मान्य करुन घेणे
* किंमतीची फोड ठरवणे- म्हणजे अमुक फर्निचर साठी इतके,ग्रिलवर्क साठी इतके,पेंटिंग साठी इतके इत्यादी. हा मुद्दा विशेष काळजीपुर्वक व लेखी ठरवल्यास पुढचे वाद टाळता येतात.
* कर्ज घ्यायचे असल्यास आपल्या संस्थेकडुन सर्वप्रथम कागदपत्रांची छाननी करुन नंतरच पुढे जाणे इष्ट ठरते.
* सोसायटी ट्रान्फर फी, वकील फी, मुद्रांक शुल्क,नोंदणी शुल्क, कागदपत्रांच्या पुर्ततेसंबंधाने होणारे सर्व खर्च कोणी करायचे हे सर्व लिखित स्वरुपात आधीच ठरवल्यास नंतरची कटुता टाळता येते.
* व्यवहार पुर्तीनंतर प्रत्यक्ष ताबा केव्हा द्यायचा / घ्यायचा हे दोन्ही पक्षांनी चर्चा करुन मान्य करुन ठरवुन घ्यावे.
* तसेच घेणा-यांच्या काही प्रतिनिधींना पुन्हा पुन्हा घर पहावयाचे असल्यास त्याची कार्यपद्धती निश्चित करुन घेणे दोन्ही पक्षांना फायद्याचे ठरते. जसे कि फक्त शनिवार-रविवार यावे, फक्त सकाळी १० ते १ यावे इत्यादी यामुळे कालांतराने उद्भवणार इगो प्रॊब्लेम टाळता येतात.
* जास्तीतजास्त पारदर्शकतेने व्यवहार पुर्ण करण्याकडे दोन्ही पक्षांनी जास्तीतजास्त कल ठेवल्यास व्यवहार अतिशय सुरळीतपणे पार पडतो.
* योग्य मध्यस्थाची जरुर तर मदत घ्यावी.
या संपुर्ण व्यवहारांमध्ये योग्य, अभ्यासु मध्यस्थ शोधले असता नक्की सापडतात. दरवेळी ते २% कमिशन घेतात असे नाही. कधी आपल्या गरजा मोकळ्यापणे सांगितल्यास त्यानुसार कमीजास्त फी मध्ये विश्वासपुर्वक काम करणारे शांतपणे त्यांचा व्यवसाय करीत असतातच की.
इतके सर्व सव्यापसव्य करुन घर घेणारे किंवा बांधणारे यांना मुर्ख तरी कसे म्हणावे? ते नक्कीच शहाणे असतात, डोळस असतात, भविष्याचा योग्य वेध घेणारे व्यवहार कुशल असतात हे नक्कीच.म्हणुन तर सुरवातीलाच म्हटलय कधी कधी म्हणींचा पुनर्विचार करण्याची वेळ नक्कीच आलेली असते.

राहती जागामाहिती

प्रतिक्रिया

झकासराव's picture

18 Aug 2009 - 2:26 pm | झकासराव

संपुर्ण व्यवहारांमध्ये योग्य, अभ्यासु मध्यस्थ शोधले असता नक्की सापडतात>>>>>..
हे काम बाकी कठीण आहे.
ह्या व्यवसायात मिळणार्‍या पैशांमुळे कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्या तसे मध्यस्त उगवले आहेत. उगाच एखाद्या पानटपरीवर पान खाता खाता विषय जरी काढला तरी तो पानटपरीवाला देखील म्हणतो की मीच एजंट आहे. भाडेतत्वावर घर घेताना एजंटचा अनुभव घेतलाच आहे एकदा. तो फारसा चांगला नाहिये.
लेखामध्ये सगळे मुद्दे चांगल्या रितीने मांडले आहेत. :)

(अजुनही पिंपरी चिंचवड मध्ये बजेटमध्ये बसणार घर शोधणारा) झकास

प्रकाश घाटपांडे's picture

18 Aug 2009 - 2:57 pm | प्रकाश घाटपांडे

झकासराव खर आहे. बायकोचा अनुभव तोच आहे. या व्यवसायात अनेक फटरफुटुर एजंट आहेत.म्हणुनच म्हटल कि शोधले तरच विश्वासु मध्यथ सापडतात. चांगल सेवादाता मिळणे सुद्धा लक असत. पण अशा सेवेंमध्ये पराधीन बाबी खुप असतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

कौतिक राव's picture

5 Jun 2012 - 11:01 am | कौतिक राव

आपली सेवा संस्था खराडी ला सेवा देते काय?

कुंदन's picture

18 Aug 2009 - 2:46 pm | कुंदन

धन्यवाद घाटपांडे काका.

अवलिया's picture

18 Aug 2009 - 3:17 pm | अवलिया

हेच बोलतो

--अवलिया

रेवती's picture

18 Aug 2009 - 4:15 pm | रेवती

उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद!
सगळे मुद्दे परत वाचून विचार करावा म्हणते. :)

रेवती

ऋषिकेश's picture

18 Aug 2009 - 4:18 pm | ऋषिकेश

वा! महत्त्वाची माहिती.. येणारी लेखमाला अशीच उपयुक्त ठरो.

ऋषिकेश
------------------
दुपारचे ४ वाजून १७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक बालगीत "असावा सुंदर चॉकलेटचा बंगला...."

स्वाती२'s picture

18 Aug 2009 - 6:09 pm | स्वाती२

अतिशय उपयुक्त लेख. मी प्रिंट करून घेतला. मंजिरी घाटपांडे ना प्लीज धन्यवाद कळवा.

मन's picture

18 Aug 2009 - 10:34 pm | मन

उपयुक्त माहिती...
महत्वपुर्ण सल्ला.

धन्यवाद प्रकाश राव.

आपलाच,
मनोबा

सहज's picture

19 Aug 2009 - 9:45 am | सहज

वाचनखुण साठवली आहे.

अधुन मधुन किस्से, किंमती देत राव्हा. स्वप्न काय सततच पडत असतात. हॅ हॅ हॅ.

आपली सेवा संस्था चिंचवड ला सेवा देऊ शकते काय?

चिंचवड मध्ये फ्लट भाड्याने द्यायच्या विवंचनेत..

नाद खुळा

वैशाली१'s picture

5 Jun 2012 - 2:52 pm | वैशाली१

आम्ही ६ महिन्यापूर्वी हिंजेवाडी वाकड या परिसरात गुंतवणुकी साठी घर शोधत होतो . शोधाशोध केल्यावर एका एजेंट तर्फे
घर विकत घेतले. आत्ता ते भाड्यानेही दिले आहे . माझी ओळख झालेली एजेंट मराठी मुले होती . कोणाला माहिती हवी असल्यास मी त्यांचा no. देते उपयोग होतो का बघावे.
अमित ०९८२२४४७४१०

अंतरा आनंद's picture

11 May 2015 - 3:00 pm | अंतरा आनंद

पागडी सिस्टीम ही कायद्याला मान्य आहे का? यातील समस्या कश्या असतात म्हणजे पागडीने घर घेताना कोणते रिस्क फॅक्टर असतात?