प्रेम

विवेकवि's picture
विवेकवि in जे न देखे रवी...
22 Feb 2008 - 6:07 pm

प्रेमात पडणं सोपं असतं
प्रेमात पडणं सोपं असतं
पण प्रेम निभावणं कठीण असतं.....
हातात हात घेउन चालणं सोपं असतं
पण तोच हात आयुष्यभर हातात घेउन
पाउलवाट शोधणं कठीण असतं,
कधी कधी एकमेकांत गुतंत जाणं सोपं असतं
पण ती गुतंवणूक आयुष्यभर जपणं कठीणं असतं
माझा तुझ्यावर विश्वास आहे हे म्हणणं सोपं असतं
पण तोच विश्वास कायम ठेवून वाटचालं
करणं मात्र कठीणं असतं
प्रेमात खुप वचनं आणि शपथा देणं सोपं असतं
पण ती वचनं आणि शपथा निभावनं
मात्र फ़ारच कठीणं असतं
प्रेमात खोटं बोलणं सोपं असतं
पण खर बोलून प्रेम टिकवनं
मात्र नक्कीच कठीणं असतं
म्हणून सांगते की प्रेमात पडणं
सोपं नसतं, सोपं नसतं, सोपं नसतं....

एक वेडा प्रेमी

प्रेमकाव्यआस्वाद

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

22 Feb 2008 - 6:15 pm | मनस्वी

जर काहीच कठीण वाटत नसेल
तरच ते प्रेम असतं
नाहीतर ते
प्रेमच नसतं, प्रेमच नसतं, प्रेमच नसतं...

मनस्वी

छोटा डॉन's picture

22 Feb 2008 - 6:25 pm | छोटा डॉन

आपण तर जास्त खोलात शिरतच नाही ....
सोपं, कठिण, अवघड , ते निभावणं अशा भानगडीत तर आपण पडतच नाही ....
कारण
"प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आमचं अगदी सेम असतं .........."

छोटा डॉन

सुधीर कांदळकर's picture

24 Feb 2008 - 12:19 pm | सुधीर कांदळकर

कठीण. म्हणूनच प्रेमात 'पडणे' असतं.