न तांबडा न हिरवा , मी एक सिग्नल पिवळा
कायम गोंधळलेला ,मी एक सिग्नल पिवळा
तांबड्यापेक्षा कमी अन हिरव्यापेक्षा जास्त
स्वत:ची किम्मतच माहीत नसलेला ,मी एक सिग्नल पिवळा
कुणी पाळला , कुणी तोडला
कुणी स्वत: माझ्यासारखाच गोंधळलेला, मी एक सिग्नल पिवळा
माझे सांगणे काहीच नाही , तसेही ऐकायला कोणीच नाही
गर्दीत असुनही नसलेला , मी एक सिग्नल पिवळा
मला द्यायचे काही नाही , आणि घ्यायचे काही नाही
सगळ्यांशी संबध तोडलेला , मी एक सिग्नल पिवळा
भारत जिंकला , भारत हरला , कुणी जगला , कुणी मेला
कशाचे सोयर-सुतक नसलेला , मी एक सिग्नल पिवळा
माझ्याकडे प्रेमही नाही आणि द्वेषही नाही
भावनांचा सागर आटलेला , मी एक सिग्नल पिवळा
असेच का ? अन तसेच का ?
स्वता:चे ठाम मत नसलेला ,मी एक सिग्नल पिवळा
जीव आहे म्हणुन जगतो , का जगतो म्हणुन मरणार
माझ्या मरणाशीही घेणे-देणे नसलेला , मी एक सिग्नल पिवळा
प्रतिक्रिया
17 Aug 2009 - 6:58 pm | अवलिया
मस्त :)
(पिवळा शिग्नल) अवलिया
17 Aug 2009 - 6:58 pm | चिरोटा
पिवळ्या सिग्नलवर कविता!!. आवडली.रात्री १० नंतर पहाटेपर्यंत हिरवा आणि तांबडा झोपी जातात आणि ह्या बिचार्याला कामाला लावतात.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
17 Aug 2009 - 6:58 pm | सूहास (not verified)
सू हा स...
17 Aug 2009 - 7:07 pm | बिपिन कार्यकर्ते
:?
बिपिन कार्यकर्ते
17 Aug 2009 - 7:38 pm | मदनबाण
व्वा,एका वेगळ्याच विषयावर एक वेगळीच कविता... :)
(इष्ट्मन कलरवाला)
मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo
17 Aug 2009 - 9:07 pm | अनिल हटेला
असेच का ? अन तसेच का ?
स्वता:चे ठाम मत नसलेला ,मी एक सिग्नल पिवळा
सही रे !!!
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
17 Aug 2009 - 10:45 pm | पिवळा डांबिस
छान कविता!
आवडली!!