गोपालकालाच्या शुभेच्छा !!

विकि's picture
विकि in जनातलं, मनातलं
14 Aug 2009 - 12:42 am

संस्कृतीशुभेच्छा

प्रतिक्रिया

टारझन's picture

14 Aug 2009 - 12:59 am | टारझन

सुंदर लेखण , आवडले !

-चिकि

चतुरंग's picture

14 Aug 2009 - 1:12 am | चतुरंग

गोमकाला झालेला दिसतोय! तरीही शुभेच्छा! ;)

(पेंद्या)चतुरंग

विकास's picture

14 Aug 2009 - 1:13 am | विकास

तुम्हालाही शुभेच्छा! आज एकदम जोरदार दहीहंडी फोडली गेली! असे काय?

बाकी वर चिकींनी म्हणल्याप्रमाणे मलाही, "गोपालकाला मॅनिफेस्टो" एकदम आवडला :-)

बेसनलाडू's picture

14 Aug 2009 - 4:48 am | बेसनलाडू

वावा! एकमेवाद्वितीय पद्धतीने साजरा केलेला गोपालकाला! आवडला.
एकदम प्रसंगानुरूप शुभेच्छा! पाहून/वाचून मनातल्या मनात हंडीसुद्धा फोडली.
(मानसिक)बेसनलाडू

अश्विनीका's picture

14 Aug 2009 - 1:39 pm | अश्विनीका

-गोपालकाल्या ची रेसिपी माहित आहे का कुणाला?
अश्विनी

विसोबा खेचर's picture

14 Aug 2009 - 8:45 am | विसोबा खेचर

आमच्याही शुभेच्छा..! :)

बाकरवडी's picture

14 Aug 2009 - 9:10 am | बाकरवडी

गोपालकालाच्या शुभेच्छा !!
:B :B :B बाकरवडी :B :B :B

खाव खाव खाव !
फक्त मिसळपाव !!

फ्रॅक्चर बंड्या's picture

14 Aug 2009 - 1:25 pm | फ्रॅक्चर बंड्या

वरच्या फोटोमधे प्रत्येकाच्या चड्डीचा रंग वेगळा कसा काय
अजब चित्रकार आहे

अवलिया's picture

14 Aug 2009 - 1:27 pm | अवलिया

हंडी बघा हो... चड्डी काय पहाताय?
उद्या म्हणाल चपला पण कुणी घातलेल्या नाहीत.

--अवलिया

विजुभाऊ's picture

14 Aug 2009 - 9:15 am | विजुभाऊ

गोपाळकाल्याची रेसीपी
जाड पोहे, ज्वारीच्या लाह्या , मेतकूट, साखर ,मीठ,लोणचे , आले( ठेचलेले) हे सर्व मिक्स करावे. हवी असल्यास हिरवी मिर्ची
अवांतरः गोपालकालाच्या शुभेच्छा हे शीर्शक चुकीचे आहे. यात "काला" हा शब्द कालवलेला/मिसळलेला या अर्थाने आला आहे त्यामुळे तो "काल" या शब्दासारखा "कालाच्या" असा न होता
" काल्याच्या" असा लिहायला हवा.
(उदा: ग्रहणकालाच्या दरम्यान, त्रितालाच्या , झोपाळ्याच्या , सापळ्याच्या...या सर्वात षष्ठी विभक्ती आहे)
शुद्धलेखन बाजूला राहुदेत पण निदान शब्द चुकीच्या पद्धतीने लिहिल्यामुळे त्याचा अर्थ बदलणार नाही हे लक्षात घ्यावे

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

ब्रिटिश टिंग्या's picture

14 Aug 2009 - 9:53 am | ब्रिटिश टिंग्या

अवांतर : वरील पाककृतीला फोडणी द्यायची नाही का? ;)

पक्या's picture

14 Aug 2009 - 2:53 pm | पक्या

दही हंडी आणि कृष्णजन्माष्टमीच्या सर्वांना शुभेच्च्छा.

नेटावर सर्च केल्यावर पुढील रेसिपी मिळाली.
गोपालकाला

भिजवलेले पोहे, खोवलेला नारळ, काकडी - हि. मिरच्या आणी आलं बारिक चिरून , दही , जिरे , मीठ, साखर, फोडणी साठी तूप.
तूपाची फोडणी करुन त्यात जिरे , मिरच्या, आले घालणे. ही फोडणी पोह्यांवर ओतणे. त्यात दही , काकडी आणि खोवलेला नारळ घालणे, चवी नुसार मीठ व साखर घालणे. सर्व जिन्नस चांगले मिक्स करुन घेणे.

गोपालकाल्याच्या अजून वेगळ्या काही रेसिप्या असतिल तर येऊ द्यात.

क्रान्ति's picture

14 Aug 2009 - 7:07 pm | क्रान्ति

ज्वारीच्या लाह्या, साळीच्या [तांदळाच्या] लाह्या, पोहे थोड्या ताकात ओलसर होतील असे भिजवून घ्यावे, त्यात काकडी, पेरू, सफरचंद अशा फळांच्या बारीक फोडी, डाळिंबाचे दाणे [ऐच्छिक] घालावे, लिंबाचे आणि आंब्याचे लोणचे घालावे, खोवलेला नारळ, मीठ, साखर चवीनुसार घालावे, हिरव्या मिरच्या वाटून घालाव्या, म्हणजे चांगली चव येते. अगदी बशा भरतेवेळी किंवा वाटप करायच्या वेळी वरून दही घालावे, सगळे पदार्थ चांगले मिसळावेत आणि हिंग, जिरे-मोहरी घालून तेलाची किंवा तुपाची फोडणी आवडीप्रमाणे द्यावी. फोडणीत हळद मात्र घालू नये.
आमच्याकडे अनंतचतुर्दशीला गणपतीविसर्जनाच्या वेळी काल्याची खिरापत असते, त्यावेळी गौरीपुढे मांडलेली खूप फळं शिल्लक असतात, ती काल्यात घातली, म्हणजे सगळ्यांना प्रसादही मिळतो, आणि काल्याची वेगळीच मजा येते. फक्त केळी मात्र घालू नयेत.
चुरमुरे आणि भाजके पोहे पण मस्त लागतात काल्यात.

[एवढा एकुलता एक पदार्थ मनापासून करणारी ;) ] क्रान्ति
अग्निसखा
रूह की शायरी

मी लहान असताना आमच्या भागातल्या बायका आपापल्या घरी गोपालकाल्याचा कार्यक्रम आयोजीत करायच्या. त्यात सुरवातीला कृष्णाची पुजा, गवळणी गाण्याचा कार्यक्रम उरकला की मग गोपालकाला तयार करायला घ्यायचे. जी कुणी बाई होस्ट असेल ती आधीपासूनच बरीच तयारी करून ठेवत असे. गोपालकाल्यासाठी पोहे, चुरमुरे, लाह्या, ताक, दही, साखर, लोणचे (आंब्याचे, लिंबाचे), हिरवी मिरची, भिजवलेली हरबर्‍याची डाळ, शेंगदाने वगेरे वगेरे साहित्य तयार असायचे. कार्यक्रमाला येणार्‍या बायकासुद्धा घरून एका डब्यात वरील साहित्या पैकी काहीतरी घेऊन येत असे. पाणी साठवायच्या स्टीलच्या मोठ्या पिपात घरचे आणि येणारे साहित्य भरत रहायचे. आणि मग ताक, दही, लोणचे घालून गोपालकाला तयार करायचा. सगळ्यांना वाटायचा आणि सगळ्याचे डबे भरून द्यायचे.
खूप मजा यायची.

अजूनही हा प्रकार होतो, पण पुर्वी जेवढा व्हायचा तेवढा नाही!

-अनामिक