री-टायर

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
12 Aug 2009 - 5:01 pm

"तु आता लुंगी घालत जाउ नकोस. लाँग शॉर्टस घालत जा. (कित्ती विरोधाभास)
चालेल. लुंगी संभाळणे जरा अवघडच जाते मला.पण हे लाँग शॉर्ट्स म्हणजे काय?
गुढग्यापर्यंतच्या हाफ पँटस म्हणजे लाँग शॉर्टस.
बर बर.
"जरा गाणे पण शिकुन घे"
मी आणि गाणे? ते का बरे?
"शास्त्रीय नको. जरा हलके फुलके असले तर पुरे. तसा तुझा आवाज काही वाईट नाही. गणपतीत तुझे ' नको देवराया' हे गाणे सर्वांना आवडते."
बर बर.
"जमल्यास गिटार पण शिकुन घे?"
मी आणि गिटार? खुळावलीस काय?
"काही नाही ,शिकल्यास सर्व काही येते?"
अग, पण हे कशासाठी?
तुझे काही रीटायर्मेंट प्लान आहेत की नाहीत.
हो आहेत. पण लाँग शॉर्ट्स घालुन गिटारवर गाणे म्हणुन पैसे मिळवणे हा नक्की नाही.
हीहीही
हे बघा आता बेबी(मुलगा) आता नोकरीला जायला लागला की मी मोकळी होईन.
ठीक आहे. त्याचा लोंग शॉर्टस ,गिटार आणि गाण्याचा काय संबंध?
मला भरपुर वेळ असेल.
आता नीट काय ते सांगतेस का? का 'नको देवराणी गाणे 'म्हणू?
"अहो आपण गोव्या ला हॉटेल काढू. शॅक सारखे.
मी जेवण करेन.
बहीण सप्ल्याय संभाळेल.
तुम्ही गल्ल्यावर बसा.
आणि कधी कधी गिटार वाजवुन गाणे म्हणुन आलेल्या कस्टमरचे मनोरंजन करा. मोठ्या मोठ्या हॉटेलात करतात तसे."
हे माझ्या बाळाच्या आई तु धन्य आहेस.
मंडळी तुमचे काय रीटायर्मेंट चे प्लान आहेत का?
जाता जाता: मी नाय रीटायर होणार. नविन टायर बसवुन घेईन.
कमाल आहे,लाँगशॉर्ट्स घालुन गिटार वर गाणे?

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

महेश हतोळकर's picture

12 Aug 2009 - 5:04 pm | महेश हतोळकर

मी रीटायर होणार (३०-३५ वर्षांनंतर) आणि खूप पुस्तकं वाचणार!

-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------

टारझन's picture

12 Aug 2009 - 11:59 pm | टारझन

वेळ जात नाहीये का मास्तर ? ह्यावेळी बुधवारीच ? आहो गुरुवार उद्या आहे ;)

असो ..

- भयानक भुभु

पर्नल नेने मराठे's picture

12 Aug 2009 - 5:09 pm | पर्नल नेने मराठे

मी अजुन ५ वर्शानी होइन .... झाले कि पाक्क्रुती टाकेन मिपावर नविन नविन ;)
चुचु

सन्दीप's picture

12 Aug 2009 - 5:11 pm | सन्दीप

मंडळी तुमचे काय रीटायर्मेंट चे प्लान आहेत का?
हो नक्किच आहेत पण लाँगशॉर्ट्स घालुन गिटार वर गाणे नक्किच नाही. मस्त खाणे पिणे आणी आराम करणे.

सन्दीप's picture

12 Aug 2009 - 5:12 pm | सन्दीप

मंडळी तुमचे काय रीटायर्मेंट चे प्लान आहेत का?
हो नक्किच आहेत पण लाँगशॉर्ट्स घालुन गिटार वर गाणे नक्किच नाही. मस्त खाणे पिणे आणी आराम करणे.

सन्दीप's picture

12 Aug 2009 - 5:12 pm | सन्दीप

मंडळी तुमचे काय रीटायर्मेंट चे प्लान आहेत का?
हो नक्किच आहेत पण लाँगशॉर्ट्स घालुन गिटार वर गाणे नक्किच नाही. मस्त खाणे पिणे आणी आराम करणे.

सन्दीप's picture

12 Aug 2009 - 5:16 pm | सन्दीप

मंडळी तुमचे काय रीटायर्मेंट चे प्लान आहेत का?
हो नक्किच आहेत पण लाँगशॉर्ट्स घालुन गिटार वर गाणे नक्किच नाही. मस्त खाणे पिणे आणी आराम करणे.

गणपा's picture

12 Aug 2009 - 5:26 pm | गणपा

वाह प्रभुसर बाळाच्या आईने चांगल सल्ला दिलय की.. :))

अपना तो एकिच सपना है .
मस्त गावाला जायच.
चतकोर जिमीनीचा तुकडा आहे त्यात थोडी झाड, भाज्या स्वतःपुरत्या लावायच्या .
संध्याकाळी, समुद्रावर एक चक्कर टाकयची, जाताना सोबत एक मासे पकडायचा गळ न्यायचा.

आहाहा.. आत्ताच रिटायर व्हावस वाटाया लागल मास्तर.
मस्त धागा जियो..

अवलिया's picture

12 Aug 2009 - 5:28 pm | अवलिया

सगळीकडे 'फिल्टर' लावुन फिरा मास्तर... स्वाईन फ्ल्यु जोरात आहे.

--अवलिया

लिखाळ's picture

12 Aug 2009 - 5:46 pm | लिखाळ

वा चांगला विषय आहे चर्चेला. निवृत्तीनंतर वेळ चांगला घालवण्यासाठी आधी पासूनच मित्रसंग्रह-छंद इत्यादी पाहिजे.
गीटार वाजवत गाणी म्हणण्याचा बेत मस्त आहे :)

जाताजाता- गोव्याकडे ते एक लोकगीत आहे ना, त्यात धृ पदात उंदीरमामा असा शब्द आहे ते गाणे माहित आहे का कुणाला?

-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.

पर्नल नेने मराठे's picture

12 Aug 2009 - 6:42 pm | पर्नल नेने मराठे

उंदीरमामा आयलो :-?
चुचु

लिखाळ's picture

12 Aug 2009 - 6:54 pm | लिखाळ

आभार.
विषयांतर टाळण्यासाठी खरड लिहितो आहे.
-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक-आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.

टारझन's picture

12 Aug 2009 - 9:30 pm | टारझन

आयला ... हा चांगला मार्ग आहे राव .... पोरींना खरडायचा !!

आता लिखाळराव चुचु आजींना खरडणार हा भाग अलहिदा ...
पण असं प्रतिसादांतुन खरडवहीत ..... हा प्रवास फारच इज्जी आहे की ;)

- टिकाळ

ब्रिटिश's picture

12 Aug 2009 - 8:30 pm | ब्रिटिश

आपना खारपाडामे जानेका पान का टपरी डालने का
शाम छे बजे शटर डावन करने का आवर डायरेक शेट्टीआन्ना के आड्डेपर

देवा म्हाराजा मरेस्तोवर दारू पीता याला पायजेल बस. बाकी क नको र बाबा

मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

सूहास's picture

12 Aug 2009 - 8:51 pm | सूहास (not verified)

<<देवा म्हाराजा मरेस्तोवर दारू पीता याला पायजेल बस. बाकी क नको र बाबा>>
हमार भी ऊही पिलान है !! खुब जमेगी जब मिल बैठै॑गे यार दो..

सू हा स...

मिसळभोक्ता's picture

12 Aug 2009 - 10:53 pm | मिसळभोक्ता

आणि दिवसभर मिपा-मिपा खेळायचे सोडून काम करणार.

-- मिसळभोक्ता

भास्कर केन्डे's picture

13 Aug 2009 - 5:29 am | भास्कर केन्डे

तात्या आणि समस्त मंडळी ज्या प्रांतातलं आपल्याला काही समजत नाही अशा प्रांतातातल्या विषयावर गप्पा मारतात. त्यांना खरच काही येतं का नाही याची पडताळणी होण्याइतपत गाणं समजावून घ्यायचं... अर्थात तात्यांकडून नाही. ;)

असो...

पण मास्तर विषय लय भारी है राव!

आपला खरा पिलॅन ह्यो असा हाय... आपल्या टिचभर वावरात आर्धा दिस घाम गाळायचा. आन मंग उरल्याल्या दिसात कुणा भल्या माणसाला आडी आडचणीत काई मदत करता येत आसन त करायची न्हाईतं परभू मास्तरावानी एखांद्या देवमाणसाचा हरकाम्या मनून र्‍हायचं... आण एकाददिसी 'विठ्ठला आलो रे बाबा' मनीत पोराबाळास्नी तरास ना देता फरार व्हायचं... पण काय वो मास्तर, आमच्या मंडळीला नेता येईन का सोबत? म्हागं न्हाई पुडं न्हाई, आगदी संगट जायचं हाय वारीला. जमन का तेवडं??

छोटा डॉन's picture

13 Aug 2009 - 8:24 am | छोटा डॉन

तुर्तास माझ्यासमोर २ ऑप्शन्स आहेत रिटायरमेंटनंतर ...

१. कोकणात "खेतवाडीला" जाऊन तिथे मधल्या आळीत स्थायिक होणे व तिथे एक वॄत्तपत्र सुरु करणे विरंगुळा म्हणुन. त्यातुन मग अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सल्ले देणे, आर्थिक समस्यांवर उपाय सुचवणे, काश्मिर प्रश्नावर तोडगा सुचवणे , वगैरे सखोल उहापोह करणारे "अग्रलेख" लिहणे ...

२. खुद्द अमेरिकेत स्थायिक होणे व स्वतःची वेबसाईट / ब्लॉग सुरु करणे व त्यातुनसुद्धा उपरोक्त गोष्टीच करणे ...

बाकी मराठी संकेतस्थळे आणि त्यावरचे "चिरंतन वाद" आहेतच. मी ह्यातल्या कुठलाही ऑप्शन निवडला तरी मला भांडण उकरुन काढायची संधी आहेच.
एकंदरीत माझे रिटायरमेंट प्लान्स मजबुत आहेत, असेल हिंमत तर अडवा ;)

------
( नियोजन समर्थक )छोटा डॉन

अवलिया's picture

13 Aug 2009 - 9:22 am | अवलिया

>>> खुद्द अमेरिकेत स्थायिक होणे व स्वतःची वेबसाईट / ब्लॉग सुरु करणे व त्यातुनसुद्धा उपरोक्त गोष्टीच करणे ...

फक्त तिथे सल्ले निवासी भारतीयांना द्यायचे असे का ? ;)

--अवलिया