भूमिका

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
11 Aug 2009 - 8:12 pm

पाठ वार्‍याने फिरविली ती दिशा माझीच होती
मूक, हळवी, दीन, शापित नायिका माझीच होती

दैव दुबळे; शाप माझा भोगते जन्मांतरी मी
राम तो नव्हता, अहिल्येची शिळा माझीच होती

एकही नव्हता दिवा, ना काजवा होता कुठेही
चांदणे ना चंद्र, अवसेची निशा माझीच होती

भंगले फुलताक्षणी का स्वप्न माझे मोहराचे?
वादळाने मोडलेली वाटिका माझीच होती

संशयाने गोठल्या संवेदना माझ्याच होत्या,
जाळली क्रोधाग्निने ती संहिता माझीच होती

काळजाला विंधणार्‍या आप्तस्वकियांच्या विषारी
बोलण्यावर चालली उपजीविका माझीच होती

ज्या कथेला वाचता आले तुझ्या डोळ्यांत पाणी,
काय सांगू? ती खरी आख्यायिका माझीच होती

राख झाल्या भावना फासून पिंगा घालणार्‍या
सावल्यांनी वेढलेली ती चिता माझीच होती

मी कधीही अढळपदि ना राहिले, उल्काच झाले,
नेहमी पडत्या फळाची भूमिका माझीच होती

करुणगझल

प्रतिक्रिया

धनंजय's picture

11 Aug 2009 - 9:32 pm | धनंजय

लांब बेहर घेतला की गुंतागुंतीच्या कल्पना मांडता येतात, त्याचे चांगले उदाहरण आहे.

छान, करुण गजल.

प्राजु's picture

11 Aug 2009 - 9:38 pm | प्राजु

मस्त!!!
खूपच सुंदर शब्द रचना. शेवट तर कळस आहे.
:)
हॅट्स ऑफ!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू's picture

11 Aug 2009 - 11:28 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

अवलिया's picture

11 Aug 2009 - 10:55 pm | अवलिया

सुरेख.. मस्त.. अप्रतिम :)

--अवलिया

राघव's picture

12 Aug 2009 - 1:04 am | राघव

अप्रतीम रचना! नेहमीप्रमाणेच!!
आता एक आशादायी विचारही मांडा पुढच्या गझलेत.
आम्हाला त्याचे कौतुक करायला जास्त आवडेल. :)

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी..
सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा!

क्रान्ति's picture

13 Aug 2009 - 9:04 pm | क्रान्ति

नक्कीच आशावादी असेल पुढचं काव्य!

क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी

फ्रॅक्चर बंड्या's picture

12 Aug 2009 - 11:12 am | फ्रॅक्चर बंड्या

मस्त आहे

यशोधरा's picture

12 Aug 2009 - 11:23 am | यशोधरा

क्रांती, सुरेख लिहिली आहेस गं गझल! सुरेख!
एकेक द्विपदी सुरेख!

सागर's picture

12 Aug 2009 - 12:23 pm | सागर

क्रांतिजी .. अप्रतिम कविता

खास करुन ह्या दोन ओळी जीवाला घोर लावून जातात
राख झाल्या भावना फासून पिंगा घालणार्‍या
सावल्यांनी वेढलेली ती चिता माझीच होती

अशाच छान कविता लिहित रहा
(कविताप्रेमी कवी) सागर

मदनबाण's picture

12 Aug 2009 - 1:23 pm | मदनबाण

ज्या कथेला वाचता आले तुझ्या डोळ्यांत पाणी,
काय सांगू? ती खरी आख्यायिका माझीच होती

ए वन...
मी कधीही अढळपदि ना राहिले, उल्काच झाले,
नेहमी पडत्या फळाची भूमिका माझीच होती

व्वाह वाह्ह....

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

दिपक's picture

13 Aug 2009 - 9:44 am | दिपक

असेच म्हणतो. सुंदर शब्दरचना :)

ऋषिकेश's picture

13 Aug 2009 - 9:37 am | ऋषिकेश

मी कधीही अढळपदि ना राहिले, उल्काच झाले,
नेहमी पडत्या फळाची भूमिका माझीच होती

अप्रतिम शेर... अप्रतिम गझल

ऋषिकेश
------------------
सकाळचे ९ वाजून ३६ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक करूण गीत "भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी..."

क्रान्ति's picture

13 Aug 2009 - 9:05 pm | क्रान्ति

धन्यवाद मंडळी!

क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी

विसोबा खेचर's picture

16 Aug 2009 - 8:58 am | विसोबा खेचर

मी कधीही अढळपदि ना राहिले, उल्काच झाले,
नेहमी पडत्या फळाची भूमिका माझीच

होती

वा!

तात्या.