भूमिका
लेखनविषय:
काव्यरस
पाठ वार्याने फिरविली ती दिशा माझीच होती
मूक, हळवी, दीन, शापित नायिका माझीच होती
दैव दुबळे; शाप माझा भोगते जन्मांतरी मी
राम तो नव्हता, अहिल्येची शिळा माझीच होती
एकही नव्हता दिवा, ना काजवा होता कुठेही
चांदणे ना चंद्र, अवसेची निशा माझीच होती
भंगले फुलताक्षणी का स्वप्न माझे मोहराचे?
वादळाने मोडलेली वाटिका माझीच होती
संशयाने गोठल्या संवेदना माझ्याच होत्या,
जाळली क्रोधाग्निने ती संहिता माझीच होती
काळजाला विंधणार्या आप्तस्वकियांच्या विषारी
बोलण्यावर चालली उपजीविका माझीच होती
ज्या कथेला वाचता आले तुझ्या डोळ्यांत पाणी,
काय सांगू? ती खरी आख्यायिका माझीच होती
राख झाल्या भावना फासून पिंगा घालणार्या
सावल्यांनी वेढलेली ती चिता माझीच होती
मी कधीही अढळपदि ना राहिले, उल्काच झाले,
नेहमी पडत्या फळाची भूमिका माझीच होती
वाचने
3151
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
छान
मस्त!!! खूपच
In reply to मस्त!!! खूपच by प्राजु
सहमत आहे
सुरेख..
अतिशय सुंदर!
In reply to अतिशय सुंदर! by राघव
नक्कीच!
मस्त आहे
क्रांती,
अप्रतिम कविता
ज्या कथेला
In reply to ज्या कथेला by मदनबाण
+१
मस्त
धन्यवाद!
मी कधीही