विझलेल्या निखार्यात्...अर्धविजली आग
गाभुळलेल्या वटवाघळाला....अवचित येते जाग
राखेतून निसटता.... फिनिक्स शिथील होतो
लोंबकळतानाच गतप्राण पादत्राण होतो.
शिंकून शिंकून बेजार होताना...अर्धी सर्दी होतो
गर्जीत वर्जीत तडीपार खोकत जातो
रक्त घाम लघ्वी थुंकी तपाशीत बसतो.
हिमोग्लोबीन च्या अभावाचा भाव पहातो.
हिरव्या राईतले गर्द रावे..
अजुनी करतात लबाड कावे
टॅहॅ टॅहॅ किर्र्रॅव बोलत गोड..
..हातात पेरूची गलीतगात्र फोड
निष्प्राण पंख पसरून चादर अंथरतो...
स्वतःच्याच स्वप्नात फोड गोंजारतो
ही जूनी खोड...लावते गोड ओढ
येईल कधी ग्रीश्म दारी....वाळेल शेवाळ परसदारी
पडेल उजेड्...अंधार द्वारी
उगवेल गारवेल्....फार नाहीवेळ
पहाट झाली....
नळा धार आली
फुर्र फुस्स....खुर्र्...फिस्स..
क्छॉ..त्र्हॉ..खबॉक खबॉक खबॉक
......( विद्वंश = विद्वानांचा वंश)
प्रतिक्रिया
10 Aug 2009 - 11:01 pm | टारझन
( विद्वंश = विद्वानांचा वंश)
=)) =)) =))
=)) =))
=))
बाकी शरदिनींच्या १% पण नाही हि कविता .. त्या बेष्ट आहेत !! त्यांना प्रणाम !!!
10 Aug 2009 - 11:23 pm | अवलिया
:S
10 Aug 2009 - 11:33 pm | मिसळभोक्ता
सुंदर कविता,
पूर्ण कळली.
(गाभूळलेला वटवाघूळ)
-- मिसळभोक्ता
11 Aug 2009 - 7:18 am | _समीर_
वटवाघूळ काकांशी सहमत!
10 Aug 2009 - 11:57 pm | योगी९००
मस्तच..
क्छॉ..त्र्हॉ..खबॉक खबॉक खबॉक
स्वाइन फ्लू..!!!
खादाडमाऊ
11 Aug 2009 - 12:18 am | विसोबा खेचर
विजूभाऊ, लैलौ भारी काव्य! :)
तात्या.
--
![](http://farm3.static.flickr.com/2526/3803188512_9bf472c83b.jpg)
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!
11 Aug 2009 - 8:54 am | दशानन
=))
=))
=))
भयानक !
***
तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
11 Aug 2009 - 11:43 am | नाना बेरके
फार सुंदर, फार सुंदर . . .
बघित्लास्का फुर्रकाव्वा . . ह्यांच्या कवितेची आठवण झाली
फुर्र फुस्स....खुर्र्...फिस्स..
क्छॉ..त्र्हॉ..खबॉक खबॉक खबॉक
ह्या ओळी विशेषकरून आवडल्या.