एका बोकडाची टक्कर कथा

अन्वय's picture
अन्वय in जनातलं, मनातलं
7 Aug 2009 - 8:51 pm

पुण्यात चारचाकी गाडी चालविणे म्हंजे एक दिव्य गोष्ट झाली आहे. गेल्या चार महिन्यात माझ्या तीन चार मित्रांनी गाड्या घेतल्या; परंतु चार महिनेही त्या गाड्यांची लकाकी टिकली नाही. एक गाडी मागच्या बाजूने चेपलेली, दुसरीच्या दरवाजाला भला मोठा कोचा, तिसऱ्या गाडीला मागचे चाक ते पुढचे चाक असा पाच फुटांचा मोठा स्क्रॅच...
तुमच्या लक्षात आलेच असेल... ही सर्व उदाहरणे पुण्यातील वाढत्या ट्रॅफिकचे दृश्‍य परिणाम आहेत. पुण्यात चार चाकी आणि दुचाकी वाहनांची संख्या भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे एका गाडीला दुसऱ्या गाडीचा ठोसा, हे प्रकार घडतच राहणार. परंतु अन्य गाड्यांचे ठोसे चुकवूनही तुमची गाडी सुरक्षित राहीलच, अशी खात्री काही देता येणार नाही. हे माझे गृहितक खरे ठरविणारा एका प्रसंग मला आज याचि डोळा पाह्यला मिळाला....
बायकोच्या स्कूटीची सर्व्हिसिंग बऱ्याच दिवसांपासून रेंगाळली होती. आज करू, उद्या करू, असे करत आज योग आला. सकाळी लवकर उठून मी स्कूटी सर्व्हिसिंगला टाकली. माझ्या घरापासून सर्व्हिस सेंटर सुमारे आठ किलोमीटर, पर्वती पायथ्याशी आहे. गाडी देऊन पायपीट करीत मी सिंहगडरोडवर आलो. एखादी सिक्‍स सिटर पकडून घर गाठावे, असा विचार मनात होता. पण बऱ्याच दिवसात चालणे झाले नव्हते म्हणून तसाच चालत पुढे निघालो...
दांडेकर पूल ओलांडून पुढे चालू लागलो. मधेच चकचकीत लाल रंगाच्या एका अलिशान मोटारीने माझे लक्ष वेधून घेतले. त्याची दोन करणे होती. एक तर ती पार्किंगमध्ये नव्हे; तर रस्त्याच्या कडेला थांबविलेली होती. दुसरे म्हंजे, अगदी कोरी करकरीत होती ती. आठ-नऊ लाखांची नक्कीच असेल! कुणीही यावे आणि तिच्या रंगात पाहून तोंडाला पावडर लावून जावे, असा तिचा थाट होता. म्हटलं, किती छान मोटार आहे. आपल्या नशिबात "अशी' केव्हा येणार कोण जाणे?... जरा तिच्या जवळून जावं म्हणून चालू लागलो, तर एक बोकड ऐटीत त्या गाडीकडे निघाला होता. माझ्या आधी जाऊन तो गाडी जवळ थबकला. त्याला पाहून माझी पाऊले संथ झाली. मी थांबलो. त्याच्याकडे पाहत होतो. तो म्हंजे बोकड कुणाचीही तमा न बाळगता गाडीला हुंगत होता. जरावेळानं त्यांनं गाडीच्या मागच्या दरवाजकडे निरखून पाहिले. काही वेळ तो पाहात होता. का कोण जाणे पण नंतर तो मागे सरला आणि मुंडी खाली घालून त्याने दरवाजाला जोराची धडक दिली. अशा चारपाच धडका त्याने दिल्या. कदाचित त्याचे प्रतिबिंब त्याला त्या चकचकीत रंगात दिसत असावे.
आता बोकडच तो. त्याच्या धडकेने गाडीचा दरवाजा पार चेमटून गेला होता. विचार केला, या गाडीचा मालक कुठे असेल आता. तो हजर असता, तर त्याने नक्कीच या बोकडाला गोळ्या घालून रात्री मित्रांना बोकड पार्टी दिली असती.
म्हटलं, बरं झालं आपल्याकडे फोर व्हीलर नाहीये. फोर व्हीलर नसल्याचा आनंद मी अनुभवला होता. या आनंदातच मी बराच वेळ चालत राहिलो....

वावरअनुभव

प्रतिक्रिया

टुकुल's picture

7 Aug 2009 - 10:37 pm | टुकुल

त्या बोकडाच्या तर....
मालक जवळ असता तर त्याची अवस्था काय झाली असती? :-)

--टुकुल.

यशोधरा's picture

7 Aug 2009 - 10:41 pm | यशोधरा

अर्रर्रर्र...

टारझन's picture

8 Aug 2009 - 12:11 am | टारझन

हाहाहा !! कुठे मिळाला हो हा बोकड ?
आम्ही मात्र इतकी वर्ष चालवतोय गाडी .. साधा स्क्रॅच नाही हो :)
असो ,

(बोकडाला टक्कर मारणारा) टारझन

उमराणी सरकार's picture

8 Aug 2009 - 2:01 am | उमराणी सरकार

याला म्हणतात झ@* बोकड उरावर घेणे. मला एकदा सोलापूर रोड वर एका सरदारजीने सक्काळी सक्काळी धडक मारली होती. सदर प्राजी काळाशार चश्मा घालून गाडी चालवत असल्याने, त्यांना मी दिसलो नाही असा त्यांचा दावा होता.
उमराणी सरकार

न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे

टारझन's picture

10 Aug 2009 - 2:59 pm | टारझन

सरदारजी ? =))
ह्याला म्हणतात झ#तं गाढव ढुं*णावर घेणे !
हॅहॅहॅ कल्जी घेणे !!

(पंजाबी गाढव) टारझन शिंग

च्यायला आमचाच प्रतिसाद कसा उडतो बॉ? उडतो तर उडतो .. तो का आला ह्याचं मुळ तसंच (दोन्ही प्रतिसाद उडले असते तर वाईट वाटलं नसतं .. असो ) ... फक्त आमचाच प्रतिसाद उडवणार्‍या निनामी संपादकाचा निषेध !!

विशाल कुलकर्णी's picture

10 Aug 2009 - 1:26 pm | विशाल कुलकर्णी

लहानपणी वाचलेल्या टारझनकथांवरुन टारझन हा प्राणीमित्र होता. त्याला प्राण्यांची भाषा अवगत असे. त्यामुळे बोकडाशी त्याची मैत्री (?)असणे साहजिकच आहे. कदाचित त्या बोकडाला भिती वाटली असेल , "आपल्या टकरीवरुन टारुभौंनी एखादा हिण आणि हिणकस शेरा जर मारला तर ते आपल्याला केवढ्यात पडेल?" घाबरला बिचारा ! ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

घोडीवाले वैद्य's picture

10 Aug 2009 - 5:52 pm | घोडीवाले वैद्य

टारूभाऊ बघा एवढे
आपण नसते बुवा ऐकून घेतले.

अवलिया's picture

8 Aug 2009 - 11:01 pm | अवलिया

हॅ हॅ हॅ
बोकड भलताच भारी की हो !!

--अवलिया

अन्वय's picture

9 Aug 2009 - 7:56 pm | अन्वय

चालता चालता कधी काय पाह्यला मिळेल याचा नेम नाही.