टायटल

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
7 Aug 2009 - 10:04 am

अरे चोच्या बोलतोय
डॉक्टर आहे का?
"आज इतक्या वर्षांनी आठवण काढलीत मालक गरीबाची. डॉक्टर ५ दिवसासाठी बाहेर गेले आहेत"
डॉक्टर आणि सुट्टी, अशक्य
"सुट्टी नाही रे. लेक्चर ला गेले आहेत. पुर्ण महाराष्ट्राचा दौरा आहे. वॉर अगेन्स्ट एच. आय. वी वर"
आयला ह्याला पण भिकेचे डोहाळे लागेल की काय? एवढी मोठी प्रॅक्टिस सोडुन हे गावभर फिरतय.
" क्लिनिक मुलगा बघतोय. हुशार आहे. डॉक्टर फक्त कॉम्प्लिकेटेड केस असेल तरच येतात"
पॅनेल सोडले काय?
" एक वर्ष झाले. पॅनेलचा अध्यक्ष 'भारतीय संस्कृती' वाला निघाला. डॉक्टरच्या प्रेझेंटेशन मधली काही वाक्ये त्याला न सांगता वगळली. भडकला. शिव्या देत राजीनामा देउन बाहेर पडले"
च्या मारी, सॉलीड अथॉरीटी होता यार.
" हो. अजुन तुझी आठवण काढतो. अविनाश आणि तुझ्याबरोबर काढलेला फोटो अजुनही बाळगतो. त्या दिवसाची आठवण काढली की इमोशनल होतो"
डॉक्टरचा काउंट काय रे?
"१ लाखानंतर त्यांनी काउंट सोडुन दिला. आता आत्मचरित्र लिहीणार म्हणताहेत. तुझ्यावर एक फुल चॅप्टर"
हां यार टीम च तशी होती.
" बोल काय काम काढलस"
लेटेस्ट डेटा कुठल्या सालचा आहे.
"२००७"
काही बदल
"फ्रॅक्शनल"
मग एवढ्या सगळ्या कँपेन्सचा काहीही फरक नाही?
"ते तु ठरव. कुठला रेफरन्स आहे ते सांग"
९ ते १५ अर्बन
"काहीही फरक नाही. तुझ्या वेळेला नउ वर्ष ५ महीने -२० आठवड्याचा गर्भ"
आज पण तेच चालु आहे."
अजुनही ह्या ग्रुप मधे सर्व गर्भधारणा फक्त बलात्काराने होतो हा समज.
" अगदी तसाच"
१५ ते २१ मधे काय?
"२५% अनमॅरीड प्रेग्ननसी चे प्रमाण ७८ मधे होते तसेच आहे. आणि आता करीयर ओरीयंटेशन मुळे २२ ते २८ ग्रुप पण आलाय. ह्या ग्रुप मधे मात्र रीमार्केबल इंप्रुवमेंट आहे. इथे अवेयरनेस प्रोग्राम्स चा इफेक्ट जाणवतो"
म्हणजे ९ ते २१ ग्रुप तसाच ओपन अँड वलनरेबल.
"हो. पालक आजही संवाद साधु शकत नाहीत. बाचकतात. मोकळ्या चर्चेपासुन पळतात. ७५ चे टॅबुज अजुनही तसेच आहेत."
अर्ली एक्स्पोजर चे प्रमाण?
"आपण समजतो त्यापेक्षा कितीतरी जास्त. अक्रॉस ऑल कास्ट क्रीड रिगार्डलेस फायनान्शियल कंडीशन"नंबर वाढला आहे म्हणुनच % मेंटेन होते आहे."
हम्म. डॉक्टरला भेटायला पाहीजे.
"कधी येतोस ते सांग. माझा पोरगा आता अकरावीत गेलाय. त्याची धुलाई पण तुच कर. अगदी डॉक्टरच्या पोराची केली होतीस तशी"
ठीक आहे. डॉक्टरला त्याच्या पुस्तकाचे टायटल मी सुचवतो.
जाता जाता: काय असावे बरे टायटल?

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

महेश हतोळकर's picture

7 Aug 2009 - 10:24 am | महेश हतोळकर

गोल्ड क्लास!
-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------

अवलिया's picture

7 Aug 2009 - 10:25 am | अवलिया

तीच तीच माहिती ...तोच तोच काथ्या...
सगळे तेच तेच परत परत परत परत
बोर झालोय मी आता... तुम्हाला कंटाळा नाही येत?

अति झालं अन हसु झालं...

चालु द्या !

--अवलिया

विनायक प्रभू's picture

7 Aug 2009 - 10:33 am | विनायक प्रभू

तर आहे.
असो.
त्यानिमित्ताने आपण हसलात हे ही नसे थोडके

गोगोल's picture

7 Aug 2009 - 10:31 am | गोगोल

मी लय भारी
मी लय भारी
मी लय भारी
मी लय भारी

सहज's picture

7 Aug 2009 - 10:48 am | सहज

समजुन न घेणार्‍याला पुन्हा पुन्हा विदा देतच रहावे लागते.

पुन्हा एकदा लिहल्याबद्दल धन्यवाद मास्तर.

टारझन's picture

7 Aug 2009 - 11:07 am | टारझन

टायटल - सोनाटा

:)

अनामिक's picture

7 Aug 2009 - 11:29 am | अनामिक

७८ मधे आणि आता असलेली परिस्थिती वेगळी नाही तर! मग उगाच पाश्चात्य संस्कृतीच्या नावाने खडे फोडण्यात काय अर्थ आहे?

-अनामिक

प्रमेय's picture

8 Aug 2009 - 11:14 am | प्रमेय

म्हणजे आकडे मोडले तरी फरक पडणार नाही तर...
१९७५ ला आपण 613,459,000 होतो, आता 1,147,995,904 आहोत.
पहा: सौजन्य

जवळजवळ दुप्पट झालो आहोत आपण!!!
मग, जर आकडे स्थिर राहिले तर योग्य नव्हे का?
आता यात निर्वासित धरले गेले असतील तर अजून गोंधळ!

अहो, ७५ चे टॅबूज शिल्लक असणारच ना! ही आत्ताची माणस/पालक तेव्हांचीच आहेत ना! जरा अजून पुढे गेल्यावर कमी होउ शकेल....