कविता लिहिताना!

गोगट्यांचा समीर's picture
गोगट्यांचा समीर in जे न देखे रवी...
6 Aug 2009 - 8:01 pm

लिहीताना विचार करू नये लिहीत जावं
अनेक चुका होतात पण पुढे जाव

विचार करायची वाट का बघायची
येत नसेल तर कविता का करायची ?

अगदीच हट्ट असेल कशीतरी यमके जुळवायचा
तर असाच कसा तरी शब्दाला शब्द मिळवायचा

अहो सुंदर कविता का सगळ्याना जमते
आपण म्हणावं प्रत्येक कविता सुंदर असते

पण कधी कधी काहीच सुचत नाही
म्हणुन का आम्ही कविताच करायची नाही ?

अरे हट , नाही जमले तरी बेहत्तर!
कोण वाचेल हा विचार करू नंतर

चला एक प्रयत्न .........
अनुत्तरित प्रश्न तर मनात साचलेले असतात
उत्तरे मिळवताना आपले केस पिकतात!

अरे वा सुरुवात तरी बरी(च) झाली
म्हणता म्हणता माझीही कविता तयार झाली..!

हास्यकविता

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

6 Aug 2009 - 11:47 pm | विसोबा खेचर

अरे वा सुरुवात तरी बरी(च) झाली
म्हणता म्हणता माझीही कविता तयार झाली..!

मस्त रे! :)

तात्या.

विमुक्त's picture

7 Aug 2009 - 10:16 am | विमुक्त

लगे रहो... आणि कोणीतरी म्हंटलच आहे...

राजहंसाचे चालणे जगी झाले शहाणे, म्हणून काय कवणे चालोची नये...

प्रशांत उदय मनोहर's picture

7 Aug 2009 - 10:51 am | प्रशांत उदय मनोहर

छान प्रयत्न. लगे रहो.

आपला,
(शुभेच्छुक) प्रशांत

क्रान्ति's picture

9 Aug 2009 - 3:53 pm | क्रान्ति

अनुत्तरित प्रश्न तर मनात साचलेले असतात
उत्तरे मिळवताना आपले केस पिकतात!

वा! सहीच कविता आहे.

क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी

प्रमोद देव's picture

9 Aug 2009 - 7:09 pm | प्रमोद देव

सहज सुंदर आणि ओघवती कविता.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

मस्त कलंदर's picture

9 Aug 2009 - 7:19 pm | मस्त कलंदर

सहज सोपी नि छान आहे...

अवांतरः शरदिनीतैंची कविता वाचल्यानंतर जिचा अर्थ कळतो ती कविता छानच वाटते!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मदनबाण's picture

9 Aug 2009 - 7:59 pm | मदनबाण

समिर भाऊ कविता लयं भारी हाय बघा. :)

(रति चा मदन) ;)
मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

प्राजु's picture

9 Aug 2009 - 8:01 pm | प्राजु

सह्ही!!
कवितेचा विषयच मस्त आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/