जन उडाण संपाचे

कौतुक शिरोडकर's picture
कौतुक शिरोडकर in जे न देखे रवी...
6 Aug 2009 - 1:28 pm

मायेच्या हिरव्या वाढीने मिटते,
वाट्यांच्या मोहात धुंद ओसरते
जन उडाण संपाचे, नित्य पावसाते,
का होते बेफाम, कसे चळवळते !

आवाजी नेत्यांच्या हरपून भान उठती,
गुरगुरत्या हाकेला कधी रोखठोकच भिडती
बोंबलती, कोकलती, उडती, धडपडती का लढती ?
कधी आयोगी मागण्यांवर जन हे वेडे झुलती
जन सवंग होऊन रस्त्यावरती फिरती
अन्‌ गळ्यात फलका आवर्जूनी धरती !
जन उडाण संपाचे, नित्य पावसाते,
का होते बेफाम, कसे चळवळते !

गडगडती, बडबडती, कधी फोडती, अडवती
कधी धरणे मोर्च्याच्या नादात पार चिडती
वळवळती सारखे शासना सहजच ना ते भुलती
कधी मोक्याच्या चार अटींना जन हे अडून बसती !
जाणती परी ते नित्य नेमे का पिडती ?
त्रासवी तरी त्यागाचा आव ही वरती
जन उडाण संपाचे, नित्य पावसाते,
का होते बेफाम, कसे चळवळते !

(कुणाकुणाची माफी मागू.... ???)

हास्यविडंबन

प्रतिक्रिया

विकास's picture

6 Aug 2009 - 7:50 pm | विकास

माफी कसली मागताहात! वास्तव दाखवले आहेत. याला विडंबन म्हणवत नाही.

दशानन's picture

6 Aug 2009 - 7:51 pm | दशानन

सहमत.

प्राजु's picture

6 Aug 2009 - 9:53 pm | प्राजु

वास्तव आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विशाल कुलकर्णी's picture

7 Aug 2009 - 10:25 am | विशाल कुलकर्णी

कौतुका,
किती करु कौतुका....

(कशी करु स्वागता..च्या चालीवर!) :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...