प्राजु ताईंची सुंदर कविता " थांब ना " http://misalpav.com/node/8842 वाचुन हे सुचले
सर्द आहे खाट माझी, तू जरासा थांब ना
दाटले रे मूक मय हे, सोबतीला थांब ना
साठली गर्दी दुचाक्यांची चहू बाजूस या
सापडे एखाद 'घर' ते, पाहूनी तू थांब ना
एवढाही रेट नाही सांग ते रे मजकडे
पाहुनी तारुण्य माझे, आज थोडा थांब ना
रात्रवेळा होत आली, झोपल्या या बावळ्या
भास्कराची माय निजली, रात्र तू रे थांब ना
राहिले सारेच व्यापारी जगी हे पाहिले
सापडे "फंटूश" येथे, या ठिकाणी थांब ना
रंगल्या खाणा खुणा या, थुंकणार्याच्या जरी
मोगरा/घोगरा सांगेल सारी, ही कहाणी थांब ना
चेतन