अल्लड तुझे ते वागणे
करते गुन्हा... मुग्ध मुग्ध रे
सावध कटाक्ष टाकणे
करते पुन्हा... लुब्ध लुब्ध रे
अजूनही... अजूनही....
कधी गंध देती वार्यासही
तुझ्या मोकळ्या केसांच्या बटा
कधी कुंद करती तार्यासही
तुझ्या बोलक्या डोळ्यांच्या छटा
मकरंद अधरी तोलती
सखये तुझे... शब्द शब्द रे
अजूनही... अजूनही....
तुझी कंकणे झंकारती
सप्तसुरांच्या अलवार ताना
तुझी पैंजणे नादावती
अधीर मनाच्या स्पंदनाना
प्राजक्तापरी हासणे
झुलती सुखे... बद्ध बद्ध रे
अजूनही... अजूनही....
ही देहबोली वेडावते
वना श्रावणी पिपासा जणू
अस्तित्वाचे नभ व्यापते
इंद्रधनुचा उसासा जणू
फिरत्या जगाचे पाळणे
होती मुके... स्तब्ध स्तब्ध रे
अजूनही... अजूनही....
प्रतिक्रिया
29 Jul 2009 - 11:52 am | विशाल कुलकर्णी
सुंदर !
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...