नमस्कार,
मी प्रथमच मि.पा. वर स्वतंत्र लिहीत आहे, अपेक्षा आहे की तुम्हाला आवडेल.
गेले काही दिवसापासुन मी नियमित मि.पा. वाचत आहे
त्यातला विडंबन हा प्रकार मला खुप आवडला
खाली जी कविता आहे ती माझी आहे.मला ह्या वरती विडंबन करुन हव आहे.
माझ्या माहिती प्रमाणे केशवसुमार आणि चतुरंग ह्यांची नावे मी विडंबनासाठी प्रसिद्ध आहेत अस लक्षात आले आहे.
क्रुपया अवांतर तद्यासाठी.......हवा असल्यास स्वतंत्र धागा काढुया.... (ह.घे.)
कोसळणारा तो धुंद पाऊस,
नेहमीच म्हणतोस तु नको जाऊस..
ओली चिंब झाली झाडे
मन ही ओले चिंब झाले
तुझ ते हळुवार हसण
माझ्याकडे टक लावुन बघण
आणि हळुच इशारा करण
आणि माझ मन चिंब चिंब होण
झालय नेहमीचच गाह्राण
नेहमीच अस टक लावुन बघतोस
आणि मला झुरवतोस
तुझ बघण आणि माझा झुरण
झालय आता नेहमीचच मला
कधी कळणार रे माझ्या मनातील भावना तुला?
प्रतिक्रिया
28 Jul 2009 - 11:43 am | विशाल कुलकर्णी
घ्या, आता बोला ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
28 Jul 2009 - 12:27 pm | Nile
वा! कवि लोकांना प्रियकर्/प्रेयसी, देव, निसर्ग अन काय काय प्रेरणा देउन जातात इथे तर विंडबनानेच यांना प्रेरणा दिली! वा वा! :)
28 Jul 2009 - 5:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बरळणारा तो मित्र खडूस
नेहेमीच म्हणतो तू (ओरिजीनल) नको लिहूस
बाष्कळ बडबडी तु वेडे
संपादक तरीही मित्र बोले
तुझं ते टोचून बोलणं
मला वारंवार सल्ले देणं
आणि हळूच पिन मारणं
आणि मी विडंबन लिहीणं
झालय नेहमीचच गाह्राण
नेहमीच अशा पिना मारतोस
आणि मला चढवतोस
तुझं चढवणं आणि माझं लिहीणं
झालय आता नेहमीचच मला
कधी कळणार रे माझा बालिशपणा तुला?
(बिका, ह.च घे रे; नायतर लावशील कात्री!)
अदिती
28 Jul 2009 - 5:09 pm | बिपिन कार्यकर्ते
अरे!!! माझी कात्री कुठे गेली, आँ?
बिपिन कार्यकर्ते
28 Jul 2009 - 8:18 pm | श्रावण मोडक
संपादक तरीही मित्र बोले
तुझं ते टोचून बोलणं
मला वारंवार सल्ले देणं
आणि हळूच पिन मारणं
एखादा संपादक असं करतो ना तेव्हाच त्याच्या हातून कात्री निसटलेली असते.
इतरांच्या स्वानुभवाचे बोल आहेत हे.
29 Jul 2009 - 11:24 am | राधा१
हेच म्हणते मी....!!!
अनुभव...केव्हाही मोठच ठरतो..!!!
28 Jul 2009 - 5:10 pm | ब्रिटिश टिंग्या
या वेळेसचं विडंबन संपादकीय आहे का :?
28 Jul 2009 - 5:27 pm | बहुगुणी
घोळणारा साखरेत तो मधूर ऊस,
नेहमीच म्हणतोस तू नको खाऊस
झाली थोडीशी खिळखिळीत हाडे
म्हणून असे मला काय झाले
तुझं ते मट्कन बसणं
माझ्याकडे भीतीने बघणं
डॉक्टरला फोन करणं
आणि माझं घामाने चिंब चिंब होणं
झालंय नेहमीचंच गाह्राणं
नेहमीच असं घाबरतोस
आणि मला टरकवतोस
तुझ घाबरणं आणि माझं वजन वाढणं
झालंय आता नेहमीचच मला
कधी कळणार रे माझ्या मनातील भावना तुला?
28 Jul 2009 - 5:34 pm | सूहास (not verified)
=)) =)) =)) =))
बहुगुणी आहात..
सुहास
28 Jul 2009 - 6:40 pm | अनिल हटेला
बहुगुणी राव सॉल्लीडच विडंबन :-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
29 Jul 2009 - 11:25 am | राधा१
आवडल...!!!
28 Jul 2009 - 6:55 pm | टारझन
आहाहा !@! काय सुरेख कविता आहे !!
अशा परफेक्ट आणि अफलातुन कवितेचं चपखल (आणि हिणकसंही) विडंबण करणे फारंच अशक्य आहे ... तुम्ही असं स्वतःहुन विडंबणाला आमंत्रण देणं काळजाला भिडून गेलं !! हृदय हेलावून गेलं ,,,, कवितांचे विडंबणकार सक्रिय आहेत म्हणून ते विडंबण पाडतील .. ते ही "वा!! छाण !!! " असेलंच ..
इथे आलेली २ विडंबणही "वा !! छाण !! " आहेत ..
सगळ्यांचच कौतुक वाटत!!
आम्हाला तर बाबा .. विडंबणं येतंच नाहीत ... :(
- टारझन
29 Jul 2009 - 11:21 am | राधा१
हबिणंदण वगैरे ठीक आहे हो....ह्रुदय वगैरे भी हेलकावु शकत...गेला बाजार डोक सुदिक...पन श्रावण असल्यामुळे हे चान्सेस कमी हायती...!!!
आम्हाला तर बाबा .. विडंबणं येतंच नाहीत ...
तुम्हाला जे जमत...ते त करा की राव....ते बॅचलर का मॅरीड...साबुदान्याची थालीपीट..तर लावु शकता न व...ते करा...!!!म्हनजी झाल.....म्हजी ज्यानी येवढी जी विडंबण लिहीली आहेत...ते पन खुश...कि टारु भाईंना....पण..येतय....!!!