अंतराळातील कचरा ही समस्या आता लांबून मजा बघण्याच्या पलिकडे गेलेली असल्यामुळे मला राहवले नाही. मी बराच विचार केला व मला दोन मार्ग दिसले ते येणे प्रमाणे-
१. अंतराळात उपग्रह सोडतांना त्याला एक वाढीव रॉकेट जोडावे. उपग्रहाचे आयुष्य संपले की, ते वाढीव रॉकेट चालू करुन त्या उपग्रहाला आकाशगंगेच्या दिशेने गति द्यावी.
२. येथून पुढे उपग्रह पृथ्वीभोवती न फिरवता चंद्राभोवती अथवा मंगळाभोवती फिरवावे. तेथून ते पृथ्वीचे निरीक्षण करतील अशी व्यवस्था करावी.
आपल्यालाही जर काही अभिनव उपाय सुचत असतील तर जरुर येथे द्यावेत. मिपावर अंतराळविज्ञानातील शास्त्रज्ञ असतील तर त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला हा लेख वाचायला द्यावा व ह्याची दखल घेण्यास भाग पाडावे.
कळावे.
प्रतिक्रिया
24 Jul 2009 - 8:50 pm | सूहास (not verified)
:O
:O :O :O :O :O :O :O :O :O :O
सुहास
24 Jul 2009 - 9:17 pm | अमृतांजन
नाही. असे निशब्द राहून कसे चालेल? आपण भारतीय किती "दूरवरचा" विचार करतो हेच त्यांना दाखवून देऊ.
25 Jul 2009 - 3:19 am | Nile
हे अकरावितले मुलं फार विचार करतात बुवा!
अहो एकदम सोपं आहे. कालच शनीवरुन फोन आला होता, त्यांच्या कडा झिजत चालल्यात. आपण आपला कचरा फक्त शनीच्या कड्यांकडे पाठवुन दिला की काम झाले. (तो ही कमीच पडण्याची शक्यता असल्याने आपणच शनीवर रहायला जाउन वारंवार असे उपग्रह पाठवुन कचर्यात, आपलं कड्यात भर घालीत राहणे हा अंतिम उपाय)
24 Jul 2009 - 9:49 pm | टुकुल
(|: (|: (|: (|: (|: (|: (|:
अजुन पर्यंत तरी घरातल्याच कचर्याच विचार करणारा
--टुकुल.
* का हो भौ तुम्ही पण ११ वित आहात का?*
24 Jul 2009 - 11:01 pm | अवलिया
* का हो भौ तुम्ही पण ११ वित आहात का?*
लेखाच्या लांबीचा विचार करता ७-८ विता कमीच दिसत आहेत.
--अवलिया
* * * * * * * * * * * *
डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !
24 Jul 2009 - 11:11 pm | अमृतांजन
आपण एका अत्यंत महत्वाच्या अशा आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर चर्चा करत आहोत. त्याला असे फाटे कृपया फोडू नका. :-)
24 Jul 2009 - 11:17 pm | अवलिया
विसरलोच की मी... सवारी सवारी... एक डाव माफी.. प्लीज प्लीज चांदणी वाटप केंद्रात जावु नका बर का !!!
--अवलिया
* * * * * * * * * * * *
डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !
24 Jul 2009 - 11:23 pm | अमृतांजन
प्लीज प्लीज चांदणी वाटप केंद्रात जावु नका बर का !!!
हे सगळे काय आहे त्याची मला माहीती नाही. नंतर पाहीन पण सक्काळ पासुन त्या कालेजला लायनीत उभे राहून पाय तुटलेत त्यामुळे....आजतरी लायनीत उभे राहणार नाही.
आणि खरे सांगू का, मी आत्ता खूप गहन प्रश्न सोडवायच्या मागे आहे.
24 Jul 2009 - 11:26 pm | अवलिया
>>>आणि खरे सांगू का, मी आत्ता खूप गहन प्रश्न सोडवायच्या मागे आहे.
काय सांगता ? म्हणजे आजची रात्र डोक्यावर घेणार काय तुम्ही ?
सोडवा ! सोडवा ! गहन प्रश्न सोडवा... शुभेच्छा !!
--अवलिया
* * * * * * * * * * * *
डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !
24 Jul 2009 - 11:29 pm | अमृतांजन
हो. गहन इतका की, मिपावरचा तो "गमन" दुवा मला सारखा "गहन" भासतोय.
24 Jul 2009 - 11:29 pm | टुकुल
<<<आणि खरे सांगू का, मी आत्ता खूप गहन प्रश्न सोडवायच्या मागे आहे. >>> :W
हे वाक्य ह्रदयाला लागल...
अनिवे, शिवाजी विद्यापीठातुन यांष्यावर पिचडि घ्या तुम्ही !!
--टुकुल.
25 Jul 2009 - 3:14 pm | अमृतांजन
नाही आम्ही उत्तुंग क्षमताशील विद्यापीठातूनच पिच डी करणार.
प्रोप्रा- आर्यभट्ट साटेलाईट सर्व्हीसेस
25 Jul 2009 - 2:59 am | अमृतांजन
चांदणी प्रकर्णाची थोडीशी माहीती मिळाली. पण मुळात धागाच जर चांदणीप्रमाणीत प्रतिसाद निर्मितीसाठी ओवला असेल तर कोण कोणाला का चांदणी देणार?
24 Jul 2009 - 10:57 pm | अवलिया
मिपावरचा कचरा कमी करण्याची तात्यांनी अभिनव योजना आखल्याचे ऐकिवात आहे. त्या अनुभवाचा काही उपयोग होत असेल तर आम्ही स्वखर्चाने तात्यांना नासा किंवा जिथे आवश्यक असेल तिथे अंतराळ कचरा कमी करण्यास मदत म्हणुन पाठवण्यास तयार आहोत.
कचरा कुठलाही असो साफ व्हायलाच हवा. कसे ?
--अवलिया
* * * * * * * * * * * *
डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !
25 Jul 2009 - 12:19 am | आनंदयात्री
+१ सहमत आहे .. असेच म्हणतो !!
-
आपलाच
कचरु मुळे उर्फ अवांतरयात्री
24 Jul 2009 - 10:58 pm | पिवळा डांबिस
हा धाग्याचा दुर्बिटणेबाई योग्य तो परामर्ष घेतीलच! तेंव्हा त्यांच्या कुरणात जास्त न चरता आम्ही दोन शब्द टाकून आमच्या कुरणात (पुण्यात स्वाईन फ्ल्यू!!) जातो...
१. अंतराळात उपग्रह सोडतांना त्याला एक वाढीव रॉकेट जोडावे. उपग्रहाचे आयुष्य संपले की, ते वाढीव रॉकेट चालू करुन त्या उपग्रहाला आकाशगंगेच्या दिशेने गति द्यावी.
वा!! म्हणजे आपला कचरा दुसर्याच्या अंगणात!!!
:)
२. येथून पुढे उपग्रह पृथ्वीभोवती न फिरवता चंद्राभोवती अथवा मंगळाभोवती फिरवावे. तेथून ते पृथ्वीचे निरीक्षण करतील अशी व्यवस्था करावी.
आणि मग भूस्थिर उपग्रहांचं काय? सेलफोन नाही वाटतं तुमच्याकडे? की मंगळावर स्थायिक व्हायचा प्लान आहे?
:)
* का हो भौ तुम्ही पण ११ वित आहात का?*
हे मात्र जबराहा!!! अस्सल मिपाकरी अभिप्राय!!!!
:)
24 Jul 2009 - 11:06 pm | अमृतांजन
आणि मग भूस्थिर उपग्रहांचं काय?
भूस्थिरता चंद्रावरुनही साधता येईल. आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसते. सगळे उपग्रह त्याच बाजूला ठेवायचे. चंद्र फिरतो आणि त्यामुळे पृथ्वी स्क्यान होईल.
द्या टाळी!
24 Jul 2009 - 11:28 pm | पिवळा डांबिस
प्रकाटाआ
24 Jul 2009 - 11:18 pm | पिवळा डांबिस
टाळी कसली मागतांय?
तुम्हीच तुमचं अमृतांजन द्या थोडं, चोळतो डोक्याला!!!
काय शॉट लागलाय डोक्याला!!!!!
:)
आजपासून तुम्ही मिपाचे आर्यभट्ट!!!!
:)
24 Jul 2009 - 11:19 pm | अवलिया
आजपासून तुम्ही मिपाचे आर्यभट्ट!!!!
अनुमोदन ! अनुमोदन ! अनुमोदन !
=D> =D> =D> =D> =D>
--अवलिया
* * * * * * * * * * * *
डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !
25 Jul 2009 - 1:41 am | एक
हे कसं काय? हां तो सॅटेलाईट चंद्राच्या "भू" सापेक्ष "भूस्थिर" होईल. पण पृथ्वीच्या भू सापेक्ष? :?
(ऑन सेकंड थॉट..)
अरे हो शक्य आहे..त्या सॅटेलाईटचा पृथ्वीवर जो ट्रॅन्स्मिटर-रिसीव्हर आहे तो चंद्राच्याच कोनीय गती प्रमाणे पृथ्वीवर फिरता ठेवायचा..अरे हाय काय अन नाय काय? #:S
25 Jul 2009 - 2:55 am | अमृतांजन
सृजनशील धोरण असेच म्हणता येईल. ह्यावर अधिक काय बोलणार?
25 Jul 2009 - 4:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पिडाकाकांनी माझा इथे उल्लेख केल्यामुळे मला इथे प्रतिसाद देणं भाग पडलं नाहीतर अशा प्रक्षोभक धाग्यांवर लिहायचं नाही असं मी ठरवलं होतं.
अंतराळात कचरा करणार्यांचा निषेध! काय होतं की तुम्ही (एनाराय, पक्षी अमेरिकास्थित भारतीय) लोकं फिरायला म्हणून जाता अंतराळात आणि कचरा टाकून येता. तुमच्या देशात तुम्ही कचरा असाच फेकून देता का? शिवाय तुमच्याकडे दुसर्या दिवशी पाऊस पडणार म्हणून आदल्या दिवशी साफ होतो तशी सफाई अंतराळात काय कारणास्तव करणार म्हणून तुम्ही ती कारवाई होऊच देत नाहीत! (हुश्श, एक लांबलचक वाक्य टंकून बोटात लचक भरली.) तो कचरा आम्हां लोकांच्या पोटावर पाय आणतो (हा पाय तो धाग्यातला नाही, कृपया गैरसमज नकोत. हा पाय मराठीतलाच ...) कारण तुम्ही अनिवासी लोकं कचरा सोडून परत येता आणि मग आकाशातल्या ज्या गोष्टींच्या अभ्यासासाठी आम्हाला पैसे मिळतात त्या गोष्टीच दिसेनाशा होतात.
आणि मग पर्यावरणवाल्यांना निष्कारण काम मिळतं. निष्कारण त्यांना पैसे मोजून "हा कचरा साफ कसा करता येईल" ते विचारावं लागतं. याला माझा व्यक्तीश: आणि अ-व्यक्तिशः साफ विरोध आहे.
आता हा कचरा साफ कसा करायचा ही गोष्ट माझ्या अभ्यासाची आणि आवडीचीही नाही. पण तरीही इथे मतं मांडण्याचा शिरस्ता आहे (कोण रे ते पच्चकन पिंक मारण्याच्या गोष्टी करत आहे?) म्हणून मीही माझं मत मांडत आहे. हा कचरा साफ करण्यासाठी आणखी काही उपग्रह सोडावेत. त्या उपग्रहांना चुंबक (धातूंचे, इतर विचार केल्यास अपमान होईल) लावावेत आणि मग तो कचरा उपग्रहाकडे येईल. जर तो कचरा फेरोम्याग्नेटीक नसेल, तर आधी त्यावर लोखंडाचा स्प्रे मारावा आणि मग चुंबकाचा प्रयोग करावा.
फेरोम्याग्नेटीक म्हणजे काय ते मलाही माहित नाही, पण जड शब्द वापरले की मग आपणही दिग्गज लोकांच्या यादीच्या जवळ सरकतो.
(चतुर चांदणी) अदिती
25 Jul 2009 - 4:10 pm | श्रावण मोडक
सुसाट सुटलीये गेल्या चार दिवसांपासून. सूर्य ग्रहणानंतरचं हे स्थित्यंतर दिसतंय. :)
25 Jul 2009 - 4:20 pm | Nile
दुर्बिटणे बाईंशी बर्याच बाबतीत असहमत आहे. हे सगळ्याचं खापर आमच्या डोस्क्यावर मारायची या लोकांची जुनी सवय आहे.
मुळात जर तिथे आम्हाला पेपर नॅपकीन्स, डीस्पोजेबल चमचे, प्लेट्स वगैरे गोष्टी मिळणार असतील तर आम्ही इथुन घेउन जाउच कशाला? अन मग तिथे कचरा करुच कशाला?
बरं आता तिथे आम्ही गेलो तर आमच्या मुलभुत गरजांकडे लक्ष नको का द्यायला कुणी तरी, खरं तर आमची अमेरीका दर वेळी करतेच ना? Mirबांधलंच ना आम्ही?
आता आम्ही सध्या जरा मंदीत आहोत तर तिथे या सुधारणा करण्याचे तुम्ही लोक (पक्षी: तिसरे जगवाले) का नाही मनावर घेत?
काही सार्वजनिक स्वच्छतागृहे, हॉलिडे रिसॉर्ट्स, एक फुट्बॉलचे मैदान, बार्बेक्यु करता सुविधा, (छे हो या शिवाय कसली ती सुटी?) वगैरे बनवा म्हणजे झाले, अन कचर्याकरिता एक रिसायकलींग प्लांट टाका! अरे हाय काय अन नाय काय?
25 Jul 2009 - 6:16 pm | अमृतांजन
पिडाकाकांनी माझा इथे उल्लेख केल्यामुळे मला इथे प्रतिसाद देणं भाग पडलं नाहीतर अशा प्रक्षोभक धाग्यांवर लिहायचं नाही असं मी ठरवलं होतं.
तुमचे उपाय लक्षणीय आहेत तसेच आक्षणीय (actionable) आहेत; तुम्ही संबंधीत अधिकार्यांना ह्या सगळ्या उपायांवर लक्ष देण्यास सांगावे.
26 Jul 2009 - 12:22 am | पिवळा डांबिस
काय होतं की तुम्ही (एनाराय, पक्षी अमेरिकास्थित भारतीय) लोकं फिरायला म्हणून जाता अंतराळात आणि कचरा टाकून येता.
आम्ही अंतराळात फिरायला जात नाही. आम्ही जर रॉकेटमध्ये जाऊन बसलो तर आमच्या वजनाने ते रॉकेट उडेल तरी का? उगाच काहितरी....
:)
आणि उपग्रहीय कचरा करण्यात इस्रोही सामील आहेच की...
त्यात नुकतंच चंद्रावर देखील एक डबडं टाकून आलो ना आपण!!!
:)
बाकी चुंबकीय उपग्रहांची कल्पना आवडली!!! त्यातही चुंबकीय उपग्रहांपेक्षा काही चुंबकीय उपग्रहिणी सोडल्या तर हे सगळे उगाच तरंगणारे आळशी उपग्रह त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतील काय?
मिपावरच्या जाणकारांनी प्रबोधन करावे....
26 Jul 2009 - 1:03 am | बेसनलाडू
त्यातही चुंबकीय उपग्रहांपेक्षा काही चुंबकीय उपग्रहिणी सोडल्या तर हे सगळे उगाच तरंगणारे आळशी उपग्रह त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतील काय?
चुंबकीय उपग्रहिणी की चुंबनीय उपग्रहिणी? ;) 'फ्युचरामा' बघितल्यापासून भविष्यात बेन्डरच्या कुळातले यंत्रमानवही - आणि पर्यायाने उपग्रह, उपग्रहिणी वगैरे - मानवी भावभावना बाळगणारे असू शकतात, असे मानण्यास प्रत्यवाय नसावा. तसे झाले तर चुंबकीय उपग्रहिणी चुंबनीयही असू शकतील ;)
(पर्यायी)बेसनलाडू
26 Jul 2009 - 5:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बेलाशेट, फक्त प्रश्न असा आहे की या कचर्यातल्या इलेक्ट्रॉनिक कचर्याला तिकडे पॉर्न म्हणणार का? ;-)
=)) =))
ओ पिडाकाका, माजी राष्ट्रपतींच्या कल्पनेबद्दल तुम्ही काय बोलता हे, शेम शेम शेम शेम ...
अदिती
26 Jul 2009 - 5:51 pm | पिवळा डांबिस
कल्पना कुणाची का असेना....
ते डबडं आता अनंत काळपर्यंत तिथे पडून रहाणार हे तर खरं?
मला वाटत नाही की इस्त्रोची ते रिकव्हर/ रिसायकल करण्याची काही योजना आहे!!!
:)
24 Jul 2009 - 11:34 pm | विकास
या गंभिर प्रश्नाची थट्टा होत आहे हे पाहून अस्वस्थ झालो आहे. #:S
कुणालाच कसे कळत नाही, जर कचरा असाच वाढत गेला तर पृथ्वी भोवतालच्या वातावरण कचर्याने आच्छादीत होईल मग रात्री चांदण्या कशा दिसणार? :?
मग बसा म्हणत, "घरात हसरे तारे असता..."
24 Jul 2009 - 11:40 pm | अवलिया
>>मग रात्री चांदण्या कशा दिसणार?
असे होणार हे माहित होते म्हणुन सरकारी स्तरावर चांदण्या वाटप कार्यक्रम आखला गेला आहे. आपल्याला सांगायला विशेष आनंद होत आहे की या कार्यक्रमाची सुरवात आपल्या गावापासुनच म्हणजेच मौजे मिपावाडी पासुन करण्यात आली आहे. सरपंचांनी उद्धाटनातच ब-याच चांदण्या मिळवल्या असे ऐकले आहे.
--अवलिया
* * * * * * * * * * * *
डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !
24 Jul 2009 - 11:42 pm | ब्रिटिश टिंग्या
त्यासाठी मालकांनी चांदणी वाटप केंद्र सुरु केलं आहे....
लवकर त्यास भेट द्या अन् भविष्यातील काळजी वर्तमानातच दुर करा. :)
- टिंग्या
25 Jul 2009 - 12:02 am | निखिल देशपांडे
हम्म गंभीर प्रश्न आहे खरे हा???
एक काम करायचे का??? आपण काही क्लिन आप मार्शल्स नेमुया जे लोक आतंराळात कचरा करत आहेत त्यांचा कडुन पैसे वसुल करता येईल.... आणी कचरा साफ करायला क्लीन उप हिरवे रॉकेट सोडता येवु शकतात... मला तर एवढेच सुचते
(११ वीतला मिपाकर)निखिल
================================
25 Jul 2009 - 1:38 am | अमृतांजन
येस्स! सर्व शक्यता गृहीत धरुनच आपल्याला पुढील वाटचाल करावी लागेल असे वाटते.
25 Jul 2009 - 4:37 am | विकास
११ वीतील मुलाने फक्त इंजिनियरींगचा अथवा मेडीकलच्या प्रवेशाचा विचार करावा... हे असले गंभीर विचार करत अभ्यासाकडे दुर्लक्ष केलेत तर त्या प्रवेशांचे जाउंदेत पण समुपदेशनाला पण प्रवेश मिळणार नाही :)
25 Jul 2009 - 12:38 am | विजुभाऊ
तो अंतराळातला कचरा पृथ्वीवर रात्रीच्या वेळेस पडेल अशी काही व्यवस्था करावी. पृथ्वीच्या वातावरणात येताना तो कचरा जळून मस्त उजेड पडेल. तेवढीच लोडशेडिंगवर मात करता येईल.
याचे कन्त्राट रीलायन्स देतायेईल.
अवांतरः इरीडीयम कम्पनीने त्यांचे ६५ उपग्रह अवकाशात सोडले आहेत. उपग्रहांचा माणसाच्या पत्रीकेत विचार होतो का?
( एवढ्या लांबच्या छोटुकल्या प्ल्यूटो चा विचार होत असेल तर त्यामाने जवळचे उपग्रह विचारात घ्यायला हवेतच ना)
25 Jul 2009 - 1:17 am | अमृतांजन
उपग्रहांचा माणसाच्या पत्रीकेत विचार होतो का?
ह्यावर मी आत्ता काहीच मत देऊ शकणार नाही.
25 Jul 2009 - 1:58 am | अमृतांजन
३. आयुष्य संपल्यावर विरघळून जाणारे उपग्रह ही उपाययोजनाही करता येईल असे वाटते. 'ना रहेगा बास; ना बजेगी बासुरी'.
25 Jul 2009 - 1:50 am | भडकमकर मास्तर
तुमची तळमळ पटली.
इथे खूप लोक विनोदी समजत आहेत या धाग्याला.
अशा लोकांचा खूप निषेध.
त्यांच्या डोक्यावर अंतराळातला कचरा पडो.
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
25 Jul 2009 - 2:01 am | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =))
माझं डोकं तर मगापासूनच खाजायला लागलंय. ;)
बिपिन कार्यकर्ते
25 Jul 2009 - 2:06 am | अमृतांजन
नाही हो सर, मीच हा धागा विरंगुळा ह्या सदरात टाकलाय. लोकांचा काय दोष?
कचरा करायचा आणि मग तो काढायला नव्या मोहीमा -लाँगटर्म प्लानिंग आहे.
25 Jul 2009 - 2:16 am | लिखाळ
अतिशय गंभीर आणि विचारात टाकणारा धागा.
एक उपाय सुचला आहे.
यापुढे अंतराळात जाणार्या प्रत्येक उपग्रहाला एक मोठा झाडू आणि सुपली जोडून सोडावी. उपग्रहाची कक्षा नागमोडी वगैरे ठेवावी. म्हणजे जास्तीत जास्त कचरा गोळा होईल.
-- लिखाळ.
आपण जास्त बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असा नाही. :)
25 Jul 2009 - 2:19 am | बेसनलाडू
यापुढे अंतराळात जाणार्या प्रत्येक उपग्रहाला एक मोठा झाडू आणि सुपली जोडून सोडावी. उपग्रहाची कक्षा नागमोडी वगैरे ठेवावी. म्हणजे जास्तीत जास्त कचरा गोळा होईल.
प ड लो खुर्चीवरून!
सोबतची कॉफी थोडी सांडली; थोडे पॉपकॉर्न सुद्धा. तो कचरा गोळा करायची वेळ झालीये.
(सफाई कामगार)बेसनलाडू
'या प्रतिसादाबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत' हे लिखाळ जोशींचे वाक्य आठवून गेले.
(स्मरणशील)बेसनलाडू
ऑन अ सेकन्ड थॉट्, लिखाळांनी सुचवलेला उपाय प्रत्येक उपग्रहाच्या बाबतीत न अवलंबता, खास सफाई कामगारासारखा सफाई उपग्रह ठराविक कालावधीने सोडून त्याच्या बाबतीत अवलंबावा, असे वाटते.
(पर्यायी)बेसनलाडू
25 Jul 2009 - 2:25 am | लिखाळ
ठीक आहे. TED आयडिया वर्थ स्प्रेडिंग मध्ये माझे भाषण असेल तेव्हा मी ही कल्पना मांडिन. तुम्हाला नंतर नेटावरचा दुवा देईन ;)
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)
25 Jul 2009 - 2:28 am | बेसनलाडू
तुम्हाला नंतर नेटावरचा दुवा देईन
बास्? पॅटन्टचे काय? ;)
(संधीसाधू)बेसनलाडू
25 Jul 2009 - 4:32 am | llपुण्याचे पेशवेll
>> पॅटन्टचे काय?
हे मी चुकून पॅन्टचे काय असे वाचले. :) असो.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
25 Jul 2009 - 4:43 am | बिपिन कार्यकर्ते
मीही तसेच वाचले. पण उगाच कोणाला चांदणी नको मिळायला म्हणून गप्प बसलो झालं... ;)
(अप्पलपोट्या) बिपिन कार्यकर्ते
25 Jul 2009 - 4:44 am | बेसनलाडू
तर पॅ(ट)न्ट चा(च) विचार करणे जरूरी आहेसे वाटते राव! ;)
(चांदोबा)बेसनलाडू
25 Jul 2009 - 2:22 am | अमृतांजन
यापुढे अंतराळात जाणार्या प्रत्येक उपग्रहाला एक मोठा झाडू आणि सुपली जोडून सोडावी. उपग्रहाची कक्षा नागमोडी वगैरे ठेवावी. म्हणजे जास्तीत जास्त कचरा गोळा होईल
+१ सहमत
25 Jul 2009 - 3:08 am | अमृतांजन
अतिशय गंभीर आणि विचारात टाकणारा धागा.
संवेदना (सिंपथी) दाखवल्यामुळे फार बरे वाटले.
25 Jul 2009 - 2:34 am | विकास
दुर्बीणीला ब्लोअर लावून (अथवा नुसती फुंकर मारून होत असेल तर उत्तम!) कचरा दूर लोटता येईल का?
25 Jul 2009 - 2:40 am | भडकमकर मास्तर
=)) दुर्बिणीला ब्लोअर ... अगायायाया
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
25 Jul 2009 - 2:45 am | लिखाळ
हा हा हा .. जोरदार :)
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)
25 Jul 2009 - 2:48 am | अमृतांजन
हे बाकी सगळ्यात ब्येस!
चित्रात जे पिवळे दिशाबाण दिसतायत त्याबाजुलाच लावा तो ब्लोअर. सगळे उपग्रह नार्वेत पडतील; तेथे पोत्यात भरुन घेता येतील.
25 Jul 2009 - 3:46 am | Nile
मला वाटतं होतं एकचं नॉर्वे आहे पृथ्वीवर! पण यांनी डोळ्यात अंजन घालुन पाहीले असेल म्हणुन आता उगाच शंका घेत नाही.
25 Jul 2009 - 2:41 am | पिवळा डांबिस
एक मोठा यज्ञ करावा...
यज्ञातल्या अग्नीला "उपग्रहाय स्वाहा" म्हणून तुपाची आहुती द्यावी...
म्हणजे अग्नीवर आपोआपच ते उपग्रह गिळण्याची जबाबदारी येईल....
मग पुढे तो अग्नी जाणे आणि ते उपग्रह जाणोत....
आपण आपली जबाबदारी पार पडल्याच्या आनंदात मिष्टान्न खावे....
:)
25 Jul 2009 - 2:44 am | बेसनलाडू
आपण आपली जबाबदारी पार पडल्याच्या आनंदात मिष्टान्न खावे....
जावई दशमोग्रहः सारखे ब्राह्मण दशमोग्रहः होईल मग ;)
(ब्राह्मण)बेसनलाडू
25 Jul 2009 - 2:48 am | लिखाळ
जबरी !! पिडाकाकांची कल्पना फार मस्त ! :)
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)
25 Jul 2009 - 3:23 am | अमृतांजन
म्हणजे अग्नीवर आपोआपच ते उपग्रह गिळण्याची जबाबदारी येईल....
टेक्निकल मिसटेक आहे. अग्निला तेथे वर प्राणवायू कसा मिळणार?
पण तुम्ही असे मिश्कीलतेने म्हणत असाल तर मी सहमत आहे!!
25 Jul 2009 - 3:39 am | नाटक्या
अहो सगळा धागाच टेक्नीकल मिस्टेक आहे.. एवढ्याचे काय घेऊन बसलात
:T ~X(
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
25 Jul 2009 - 3:01 pm | अमृतांजन
आम्ही मिष्टेक करायला अजिबात घाबरत नाही. मिष्टेक नाय केली तर वर्जीनल कायच तयार नाय होणार.
25 Jul 2009 - 2:48 am | बिपिन कार्यकर्ते
अरे काय चालले आहे!!!!
=)) =)) =)) =)) =))
बिपिन कार्यकर्ते
25 Jul 2009 - 2:55 am | भडकमकर मास्तर
खानोलकरांची विळखे कविता मला खूप आवडते.....
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
25 Jul 2009 - 3:47 am | Nile
मला Ayn Rand चं Fountainhead.
25 Jul 2009 - 8:18 am | अमृतांजन
अकरावीतील मुलांच्या विचारचे कौतुक करणार्या मिपावरील अनेक आजोबांना येथे भेटून आनंद झाला. त्यांचेच मार्गेदर्शन येथे मिळेल अशी अपेक्षा होती व ते मिळाले.
25 Jul 2009 - 8:28 am | ब्रिटिश टिंग्या
हे शगले उपग्लह वल्ती कशे काय तलंगतात आप्पॉप? मी तल वल्ती उदी मालली की लगेच खाली पदतो.... :(
- (दुशली 'ब') टिंग्या
25 Jul 2009 - 9:47 am | शाहरुख
खि खि खि खि.....
याचे नीट उत्तर मात्र देता येणार नाही मला
25 Jul 2009 - 11:51 am | Nile
यासाठी तुम्ही दुसरा धागा सुरु करावात अशी तुम्हाला विनंती करतो. तेवढाच विरंगुळा आपलं ज्ञानात भर.
पण त्यापुर्वी, परिकथेतील राजकुमारांचा खालील प्रतिसाद वाचुन घ्या व त्यांना एकदा कल्पना द्या. नाही ते उगाच चांदण्यांत फिरुन यायचे म्हणुन म्हणतो. ;)
वि. सुचना:- याना मध्ये 'आउट्स्टँडीग' लोकांना घेउन प्रवास करु नये कचर्यात वाढ होइल ;)
(फेदरवेट)
25 Jul 2009 - 8:53 am | अमृतांजन
नाईल, पिडाकाका, लिखाळ, कर्क, अवलिया, मास्तर, बिटी, व ई मिपाकर मित्रांनो, काल रात्रीच्या ह्या विनोद-विरंगुळ्यात सहभागी होऊन मजा आणलीत. धन्यु.
25 Jul 2009 - 9:40 am | अवलिया
हा अवांतर प्रतिसाद आहे.. मला चांदणी मिळालीच पाहीजे.
(चांदणीला चटावलेला) अवलिया
* * * * * * * * * * * *
डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !
25 Jul 2009 - 11:42 am | परिकथेतील राजकुमार
नाईल, पिडाकाका, लिखाळ, कर्क, अवलिया, मास्तर, बिटी, व ई मिपाकर मित्रांनो, काल रात्रीच्या ह्या विनोद-विरंगुळ्यात सहभागी होऊन मजा आणलीत. धन्यु.
स्वतः धागा चालु करणार्या सदस्याची हि प्रतिक्रीया वाचुन अतिशय संताप आला.
आधी स्वतः धागा उघडुन गंभीर धागा, गंभीर चर्चा करा असे सदस्यांना सुचवायचे आणी स्वतःचा वेळ मजेत गेला की मग अगदी समंजसपणे त्या धाग्याला विनोद विरंगुळा म्हणुन मोकळे व्हायचे. ह्या सर्व गोष्टींची नोंद घेउन अशा सदस्यावर कारवाई व्हायला पाहिजे.
असा धागा निघाला आहे कळल्याबरोबर मी काल रात्री ४ च्या ऐवजी ६ पेग मारुन 'रॉयल स्टॅग रॉकेटलाईन्सने' चंद्राकडे प्रयाण केले. तेथील कचर्याचा आढावा घेतला. मंगळावरील मंगळुवासीयांशी चर्चा करुन मंगळ हद्दीत एखादा कचरा डेपो उभा करायची परवानगी मिळेल का ? ह्याची चौकशी केली. सलग साडे बत्तीस मिनीटे मी मंगळुंना 'कन्व्हीन्स' करायचा प्रयत्न करत होतो. उपग्रह वाहिनीवरुन आमचे हिरवट विप्र पण समुपदेशन करतच होते, शेवटी पुढच्या वेळी टार्याला घेउन येतो म्हणालो तेंव्हा कुठे यशस्वी सुद्धा झालो !
आणी आता पृथ्वीवर येउन बघतो तो इथे हा धागा विनोद विरंगुळा म्हणुन जाहीर झालेला.
मी अत्यंत कडक शब्दात ह्या सगळ्याचा निषेध करतो आणी माझी हि प्रतिक्रीया लेखी तक्रात म्हणुन मिपा ग्रामपंचायतीने दाखल करुन घ्यावी अशी विनंती करतो.
अवांतर :- कोण म्हणते अमृतांजनने डोकेदुखी जाते ? ती जाते का येते ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
25 Jul 2009 - 12:51 pm | अमृतांजन
तुमच्या ह्या निषेधाची कडकातकडक अंमलबजावणी प्रशाननाने करावी अशी मी शिफारस स्वत करत आहे.
कोण म्हणते अमृतांजनने डोकेदुखी जाते ? ती जाते का येते ?
ती येते आणिक जाते..
येताना कळा आणिते
~प्रोप्रा. मिपा साटेलाईट सर्व्हीसेस
25 Jul 2009 - 1:04 pm | मराठमोळा
>>असा धागा निघाला आहे कळल्याबरोबर मी काल रात्री ४ च्या ऐवजी ६ पेग मारुन 'रॉयल स्टॅग रॉकेटलाईन्सने' चंद्राकडे प्रयाण केले. तेथील कचर्याचा आढावा घेतला.
=)) =)) =)) =)) =))
परा, काय हे सहा पेग ईंधन पुरले काय तुला चंद्रावर जायला.. काहीतरीच.. ;)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
25 Jul 2009 - 1:04 pm | मराठमोळा
>>असा धागा निघाला आहे कळल्याबरोबर मी काल रात्री ४ च्या ऐवजी ६ पेग मारुन 'रॉयल स्टॅग रॉकेटलाईन्सने' चंद्राकडे प्रयाण केले. तेथील कचर्याचा आढावा घेतला.
=)) =)) =)) =)) =))
परा, काय हे सहा पेग ईंधन पुरले काय तुला चंद्रावर जायला.. काहीतरीच.. ;)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
25 Jul 2009 - 2:31 pm | प्रकाश घाटपांडे
क्वॉन्च ईमाईन कवा उडन आन कोन्ला किती विंधन पुरन काय सांगता यायच नाई ब्वॉ. पराला पुरन वले त्यावढ विंधन.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
25 Jul 2009 - 3:08 pm | अमृतांजन
परा, काय हे सहा पेग ईंधन पुरले काय तुला चंद्रावर जायला.. काहीतरीच.
उपग्रहांनीपण मदत केली- आपोझिट पोल आट्राक्शन-
उपग्रहांची राणीमाशी म्हणाली, "परीकथेतील राजकुमारा स्वप्नी मा़झ्या येशील का?"
:-) :० ज्योक! ज्योक!!
25 Jul 2009 - 5:48 pm | इनोबा म्हणे
ही योजना यशस्वी झाली तरी आंतरजालीय कचर्याच्या समस्येवर ही चर्चा करण्यास हरकत नाही
26 Jul 2009 - 9:35 pm | डॉ.प्रसाद दाढे
ही योजना यशस्वी झाली तरी आंतरजालीय कचर्याच्या समस्येवर ही चर्चा करण्यास हरकत नाही
बाप रे, आता परप्रांतिय कचर्यासारखाच परलोकीच्या कचर्याचा प्रश्नही मनसेने
हाती घेतलेला दिसतो.. उपग्रहांनो आपापल्या देशांना परता लवक्कर..
अवांतरः बाकी नासाच्या शास्त्रज्ञांचे समूपदेशन मास्तरांनी सुरू केल्याचे ऐकले.. (पहिल्याच कॉलमध्ये त्यांनी शरणागती पत्करल्याचे मास्तर अभिमानाने धमूला बराss च वेळ सांगत असल्याची तक्रार त्याची बायको माझ्याकडे करत होती)
भडकमकरमास्तरही अंतराळीय कचर्यावर एक कादंबरी, तीन स्फूटे, तीन समि़क्षणे (व तीनशे प्रतिसाद) आणि 'अंतराळातील स्फिंक्स' ही (खास पुरूषोत्तम करंडकासाठी) एकांकिका लिहित आहेत. (एकांकिकेची खासियतः सर्व पात्रे अंतराळातून बोलत असल्याने स्टेजवर कोणीच दिसत नाही). पार्श्वभूमीला केसूकाकांचे 'अंतराळीच्या गूढ गर्भा.. हे अंतराळगीत वाजणार आहे म्हणे!
ह्या धांदलीत विजूभाऊ अंतराळीय कचरा जपानी गादीत गुंडाळता येईल का अशी विचारणा आयुकात वारंवार करून भंडावत आहेत.
पेठकरकाका एखाद्या रिकाम्या (निकाम्या) उपग्रहात उपहारगृह खोलायची परवानगी मागायच्या तयारीत आहेत.
आता हाही कचरा पुणे मनपा आपल्या बोकांडी मारेल ह्या भीतीने उरळी कांचनमधले गावकरी उपोषणाला बसलेत सुद्धा!
ते काहीही असो..तात्या मात्र खुशीत आलेत.. एव्हढ्या महत्वाच्या प्रश्नाला मिसळपावने वाचा फोडल्यामुळे नासा त्यांचा 'सिंडी क्रॉफर्डच्या हस्ते विशेष पुरस्कार (आणि इतर 'बरंच' काही) करणार असल्याची गुप्त बातमी ते परत परत सांगत ठाण्यात फिरत आहेत
26 Jul 2009 - 9:39 pm | श्रावण मोडक
तुमचे अस्तित्त्व दिसत नव्हते. त्यामुळं तुम्हाला काका म्हणावे की काय या विचारात होतो. तेवढ्यात आलात. हुच्च प्रतिसाद अगदी.
26 Jul 2009 - 9:54 pm | अमृतांजन
एखाद्या रिकाम्या (निकाम्या) उपग्रहात उपहारगृह खोलायची परवानगी मागायच्या तयारीत आहेत.
क्या आयडीया है सरजी!