हृदयाच्या अंतर्हृदयाला....

सृष्टीलावण्या's picture
सृष्टीलावण्या in जे न देखे रवी...
18 Feb 2008 - 10:41 am

कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला
काय बोचते ते समजेना
हृदयाच्या अंतर्हृदयाला ।।

येथे नाही तेथे नाही,
काय पाहिजे मिळावयाला?
कुणीकडे हा झुकतो वारा?
हाका मारी जीव कुणाला?

मुक्या मनाचे मुके बोल हे
घरे पाडिती पण हृदयाला
तीव्र वेदना करिती, परि ती
दिव्य औषधी कसली त्याला !

- बालकवी

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

18 Feb 2008 - 3:36 pm | आनंदयात्री

बर्‍याच दिवसांनी बालकवींची ही कविता वाचली. नाव फक्त "दिव्य औषधी कसली त्याला " असे आहे असे स्मरते.

विसोबा खेचर's picture

18 Feb 2008 - 6:39 pm | विसोबा खेचर

मुक्या मनाचे मुके बोल हे
घरे पाडिती पण हृदयाला
तीव्र वेदना करिती, परि ती
दिव्य औषधी कसली त्याला !

वा! छान आहे कविता...

अवांतर -

मिसळपाववर बालकवी, कुसुमाग्रज, भाईकाका आणि इतरही अनेक प्रतिभावंताच्या/दिग्गजांच्या साहित्याचे स्वागत आहेच हे प्रथम नमूद करतो. परंतु त्याचबरोबर सभासदांनी खास त्यांचे स्वत:चे असे काही लेखन येथे केल्यास ते मिसळपावला अधिक आवडेल, किंबहुना मराठी मंडळींना त्यांचे स्वत:चे साहित्यिक, वैचारिक लेखन येथे करता यावे हाच मिसळपावचा मुख्य उद्देश आहे...

हिंदी, उर्दू, संस्कृत यांसारख्या भाषेतल्या साहित्यिकांची मराठीतून ओळख तसेच त्यांच्या साहित्याच्या मराठी रसग्रहणाचे/ भाषांतर-अनुवादाचेही मिसळपाववर स्वागत आहे...

तात्या.