काही क्षण...

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
13 Jul 2009 - 8:19 pm

काय हरवले ? कसे सांगू काय हरवले ते ! काही क्षण...
तुझा स्पर्श.. तुझा गंध... व कोठे तरी तुला देखील..

*

हे असेच असते माहीत असून देखील अनोळखी मार्गावर मी नेहमीच पाऊल टाकतो काय मिळते मला काय माहीत पण सुखाच्या काही क्षणासाठी मी माझे प्राण देखील टाकतो.. वाटेवर.. सरळ चालणे मला जमतच नाही.. काय करु जन्माची खोड.. आता सुटेल लवकरच.. असाच कुठला तरी क्षण मला ही घेऊन जाईल बरोबर जशी तु गेलीस.. कळत नकळत.

*

कधी तरी असाच ... ग्लास हाती घेऊन बसतो मी.. कुठले तरी गाणे पीसीवर चालू असते... व कळत न कळत आश्रु डोळ्यातून. सवय आहे आजकाल मला त्याची.. सुखाची सावली असो वा दुखःची झळ... माझ्यासाठी तूच.. मला माहीत आहे तुला मी आठवणे अशक्य आहे... ! पण कधी वाटते... अशीच तु देखील बसलेली असशील संध्याकाळी.. काहीतरी निवडत.. तांदुळ साफ करत.. डोळ्यावर येणा-या केसांना दुर सारत... बागड्यांचा किणकिटाट.. होत असेल.. तेव्हा कधी तरी.. तुला मी आठवत असेनच.. काही क्षणतरी नक्कीच... शक्यतो नाही देखील...माहीत आहे..

*

सर्व काही विसरणे तुला शक्य आहे हे मला माहीत आहे.. तशी तु मनाने खुप खंभीर.. पण तरी ही परवा तुला माझी आठवण आलीच असेल नाही.. तुझ्या लग्नाचा वाढदिवस... कितवा.. आठवत नाही आता.. पण तुला मी नक्कीच आठवलो असेल.. जेव्हा तुझ्यासाठी तो आनंदाचा दिवस तेवढाच माझ्यासाठी देखील.. तुझं लग्न व माझा वाढदिवस.. ! एकाच दिवशी. म्हणून तर मी म्हणत असे तुला की तु मला असे काही देणार आहेस जे मला जन्मभर लक्ष्यात राहील.. भेटलं मला ते... एक भळभळती जख्म... अशीच जर रक्त वाहत नसेल तरी ही मी स्वतःच्या नखाने.... !

*

मला वाटले होते तुला विसरणे सहज शक्य आहे.. असेच काही क्षण निघून जातील एवढाच वेळ मला हवा.. पण आता वर्षानु वर्ष गेली.. पण तुला विसरणे सोड... प्रत्येक नवीन जख्म पण तुझीच आठवण करुन देते... ! प्रेमाला बंध नाही हे मला ही माहीत आहे.. तु माझ्यापासून दुर आहेस हे माहीत आहे मला... फक्त सात पाऊले.. तरी ही ... ती सात पाऊले माझ्यासाठी सात जन्माची आहेत.. हेच मी विसरु शकत नाही आहे... !

*

खुप जणांनी प्रयत्न केला बरोबर चार पाऊले चालण्याचा.. कधी नशीबाने तर थट्टा केली... तर कधी मध्येच निसटुन जाणा-या हातांनी.. चालायचेच.. ! सगळ्यांना तुझी सर येणे शक्य आहे काय... काही प्रश्नांची उत्तरे मला माहीत आहेत.. तरी ही मी त्या प्रश्नाना मी सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न करतो.. प्रत्येक वेळी.. नवीन उत्तर... ! हरकत नाही.. चालेल मला.. पण कधी तरी सात पाऊले तुझी संपल्यावर आठवण ठेव... मी उभा असेन असाच कोठे तरी.. तळपत्या उन्हामध्ये.. तुझी वाट पाहत.. नेहमी प्रमाणेच !

कल्पित

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

Dhananjay Borgaonkar's picture

13 Jul 2009 - 8:27 pm | Dhananjay Borgaonkar

:) मला वाटलेल मीच एक वेडा आहे..
कंपनी दिल्या बद्द्ल धन्यवाद....

दशानन's picture

13 Jul 2009 - 9:18 pm | दशानन

:S

दशानन's picture

13 Jul 2009 - 9:15 pm | दशानन

आखरी.. दुवा मेरी
आस ना रहो पास ना रहो.. !
बस्स एक बार दिल को पुछो...
जो गया जोगी था या योगी...
प्यार में पागल रांझा था या मजनु

टारझन's picture

13 Jul 2009 - 9:51 pm | टारझन

वा छाण !! लेख आवडला
आणि हो ,

तुझं लग्न व माझा वाढदिवस.. ! एकाच दिवशी.

हे वाक्य हृदयाला भिडले ..

आणि हो ... हे भयताड प्रेमात पुर्ण "पागल" झालंय ,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jul 2009 - 10:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजे, आठवणीत रमणे चांगले असले तरी बाहेर पडा यातून आता !
तिच्या लग्नाचा दिवस तो तुमचा जन्मदिवस, पाहा त्या देवाची कमाल. :)
छान लेखन आहे, लिहित राहा....!

-दिलीप बिरुटे

विनायक प्रभू's picture

13 Jul 2009 - 10:28 pm | विनायक प्रभू

ह्याच्या जन्माचे सेलिब्रेशन वेगळ्याच प्रकाराने की काय?

प्राजु's picture

13 Jul 2009 - 10:57 pm | प्राजु

राजे,
दारूतून बाहेर पडणे सोपे पण आठवणींतून अवघड. पण तरीही.. त्यांना गाडून टाका आता. एकदा सोडलेला दारूचा ग्लास आणि गाडलेली आठवण.. यांना पुन्हा जवळ करू नये असे अनुभवी लोक सांगतात.
गेट वेल सुन!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दशानन's picture

14 Jul 2009 - 1:42 am | दशानन

=))

नक्क्कीच.

अवलिया's picture

13 Jul 2009 - 11:06 pm | अवलिया

राजे ! आवरा स्वतःला !!

--अवलिया
=============================
सत्य आणि भास यात फरक काय? भासातले सत्य भास असु शकते. भासातला भास हा सत्य असु शकतो. सत्यातल्या भासात सत्य असु शकते. सत्यातले सत्य भास असु शकते. तेव्हा सत्य आणि भास हे भास आणि सत्य पण होवु शकतात.

टुकुल's picture

14 Jul 2009 - 1:45 am | टुकुल

बर आहे क्रमश: पेक्षा..
बाकी अजुन काय बोलनार.. मात्तब्बर आणी अनुभवी वर बरच लिहुन ठेवले आहे..

--टुकुल

प्राची's picture

14 Jul 2009 - 9:41 am | प्राची

बर आहे क्रमश: पेक्षा.. :)

सहज's picture

14 Jul 2009 - 9:45 am | सहज

कल्पित शब्द क्रमशःच्या जागी पाहून हायसे वाटले होते पण राजे ह्या सदस्याची वाटचाल पहाता तो इथे काही थांबत नाही बघा.आधी येउन तो खाली उपप्रतिसादात गडाबडा लोळेल बघा

Nile's picture

14 Jul 2009 - 10:57 am | Nile

राजे 'तुमची कल्पना' लईच त्रासदायक आहे हो! दारु तुम्हाला धीर देवो! ;)

विमुक्त's picture

14 Jul 2009 - 12:07 pm | विमुक्त

असल्या काहि क्षणा मुळं.... आयुष्यातले बरेच चांगले क्षण जगायचे, अनुभवायचे राहुन जातात... जुन्या आठवणी पासुन आनंद मिळत असेल तर भारि... नाहि तर कश्याला उगीच कुढत राहायच.... कात टाकुन पुढे जायच....

लवंगी's picture

14 Jul 2009 - 10:22 pm | लवंगी

१००% सहमत.

विजुभाऊ's picture

14 Jul 2009 - 12:31 pm | विजुभाऊ

. एकदा सोडलेला दारूचा ग्लास आणि गाडलेली आठवण.. यांना पुन्हा जवळ करू नये असे अनुभवी लोक सांगतात.

थोडासा बदल .
एकदा सोडलेला दारूचा ग्लास आणि गाडलेली आठवण.. यांना पुन्हा जवळ करताना स्वच्छ धुवून मगच जवळ करावी

सूहास's picture

14 Jul 2009 - 5:06 pm | सूहास (not verified)

=))

सुहास